Sri Vidya – Mahi Vidya (मही विद्या)

Sri Vidya – Mahi Vidya (मही विद्या)

श्रीविद्या साधना आणि क्रिया योग याना जोड़नारी
” मही विद्या “…

श्रीदत्तात्रेय यांच्या कडून श्रीपरशुरामजी याना कल्पसूत्र मधून ज्या ज्या साधना देण्यात आल्या त्यात एक श्रीविद्या साधनेतील क्षिप्रा अर्थात श्रीमहागनपति साधना आहे. श्रीविद्या साधक जेव्हा नेहमी या साधनेची सुरुवात करतात तेव्हा एका ठिकाणी ” महि ” आणि ” महिपति ” हा शब्द येतो. महि म्हणजे ही मही विद्या आहे.
श्रीशंकराचार्य यांच्या सौन्दर्यलहरी मध्ये एक श्लोक आहे ,
महीं मूलाधारे कमपि मणिपूरे हुतवहं,
स्थितं स्वाधिष्ठाने हृदि मरुतमाकाशमुपरि,
मनोऽपि भ्रूमध्ये सकलमपि भित्त्वा कुलपथम्,
सहस्रारे पद्मे सह रहसि पत्या विहरसि।।
यात जो महि आहे तो त्यानी मूलाधार चक्रास उद्देशुन म्हटल आहे , हे योगसाधनेतील विशेष गूढ़ गुपिता पैकी एक आहे की इथे आदि शंकराचार्य यानी महीं शब्द वापरला आहे. श्रीमहावतार बाबाजीं च्या कृपेने योग साधनेत पुढे जात या विशेष गूढ़ ज्ञानाला राखत ते कौशल्यवान बनले. मूलाधार चक्रावर प्रभुत्व मिळवन्याचे ते तंत्र आहे. ( आदिशंकराचार्य यानी श्रीविद्या आणि क्रिया योग यांचे एकत्रीकरण केले होते आणि ते त्याचे साधक ही होते. )
सर्व ज्योतिर्विद्यान्चे आधारपीठ महि विद्या आहे. लं बीज म्हणून पृथ्वी आणि तीच समानार्थी शब्दाने महि आहे. जोपर्यंत पहिल्या पायरी वर प्रावीण्य मिळवता येत नाही तोपर्यंत पुढे जाता येत नाही किंबहुना पुढील मार्गातिल देवतां साधकास स्वीकार करत नाही.
कलियुगातील काही धोक्यांचा गंध ओळखून भूतकालातील महान गुरुनी एखाद्याच्या जीवापेक्षा ही जतन करून ठेवले , ईश्वराच जो संदेश होता त्याची काळजी घेत.
मनुष्य हिच महि ओलांडून पुढे जाउ शकत नाही कारण त्याचे मन सदैव या तत्वात अधिक ओढलेले असते. भौतिकता की ज्याने मनाला संमोहन करणाऱ्या अनेक गोष्टि निर्माण केल्या आणि एक निष्पाप आत्म्यला पापकर्मात बाँधून टाकले. कुल-कुलाचार-पितृदेवता जे मनुष्याचा मुख्य आधार आहे , आणि त्यांच्या संकल्पाने मनुष्याचा जन्म त्या त्या कुळ-घरण्यात होतो , ति प्राथमिक संकल्पपूर्ती करन्यास अनेक जन विसरतात. तिथे अडकलेले दोष हे निघाले पाहिजे , कारण तो एक चिकट विषय आहे की जो मनुष्यास कधीही पुढे आरोहण करू देत नाही.
म्हणून जसे योग साधनेत मूलाधार चक्रावर भर दिला जातो तसच श्रीविद्या साधनेत त्याच आदिपराशक्ति ने श्रीमहागनपति च्या साधनेच्या रुपात तो मार्ग पहिलाच आखला आहे.
कारण तो मुलारम्भ आहे अर्थात तो गणपती आहे , त्याच गनपती मध्ये दोन ब्रम्ह संकल्पाचा समावेश असतो. हे दोन ब्रम्ह सङ्कल्प कोणते? ते मोठे गूढ़ गुपित आहे की जेव्हा गुरुच्या मार्गात असता टप्पया टप्पयाने त्याची उकल होते. तिथे साधकाला पूर्ण मन गुरुच्या चरणी राखावे लागते.
विनायकाचा संकल्प हाच ब्रम्ह संकल्प आहे. तो गजानन म्हणजे जगानन होय. जगानन या शब्दात अत्यंत खोलवर गूढार्थ आहे. कारण आध्यत्म हे उलटया मार्गाने चलनार चाक आहे आणि सगळ्या शास्त्रात त्याची दिशा सरळ आहे आणि अनेकजन त्याचच अनुकरण करतात , ज्याने त्यातील गुपित ही गूढच राहतात.
शरीराला आणि त्याला अनुसङ्गाने चालणाऱ्या कार्यात दहा वायुन्चा मोठा भाग आहे. योगसाधनेत त्याला अत्यंत महत्व दिले आहे. प्राण-अपान-उदान-व्यान-समाना-नाग-कूर्म-कुकुर-देवदत्त-धनंजय या सर्व वायुन्चे वशीकरण मूलाधार चक्रात होते. उदान वायु जो कुंडलीचे मानवी रुपात उभे आरोहण घडवून आनतो , तो इडा-पिंगला-सुषुम्ना या तिहेरी फेरीत ब्रह्मबिळा पर्यन्त जिथे सुमेरुश्रृंग सारखे छिद्र आहे तेच बाह्य ब्रम्हांडाच्या (दूसरे ब्रम्हांड) भूतका मध्ये उघड़ते. हे समजने सामान्य व्यक्तीच्या बुद्धिच्या पलिकडील गोष्ट आहे जी गुरुच्या आशीर्वाद आणि कृपेने समजते.
म्हणून श्रीविद्या साधने मध्ये श्रीमहागनपति साधने मध्ये ” ग्लौं ” हे बीज वराह आणि भूमि चे प्रतीक आहे जे संपूर्ण विश्वाची प्रतिकता दाखवते आणि ” वशमानय ” हा या या दसवायुना मुलाधारात केंद्रित करण्याची क्षमता दाखवतो.

 || Sri Matre Namah ||

Contact us to learn Sri Vidya Sadhna: 09860395985

 Subscribe to our Youtube Channel !!

Join us on Facebook !!

Share

Written by:

213 Posts

View All Posts
Follow Me :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
× How can I help you?