Sri Vidya – Sadhna Overview (एक आध्यात्मिक अभ्यास)

Sri Vidya – Sadhna Overview (एक आध्यात्मिक अभ्यास)

☘️◆श्रीविद्या साधना अंतर्भूत अभ्यासनिय विषय◆☘️
?परमेश्वरी निलयम ?

श्रीविद्या साधना अत्यंत विस्तृत विषय आहे , ज्यात संपूर्ण विविध अंगाने पसरलेली अध्यत्मिकता एकामध्ये विलीन होते ।
ति श्रीललिता परमेश्वरी ची साधना आहे । आपण बऱ्याच वेळा विविध लेखा मध्ये किंवा पुस्तका मध्ये श्रीविद्या साधने बद्दल माहिती वाचतो। बेसिक लेवल वर सर्वच लेखा मध्ये श्रीविद्या श्रीयंत्र , त्याची ज्याणी साधना केली ते सर्व आचार्य (इंद्र मनु कुबेर कामदेव कार्तिकेय दुर्वासा ) ही नावे तर आपन नेहमीच वाचतो । श्रीदत्तात्रेय यांचे नाव श्रीविद्या साधनेत प्रकर्षाने येते ।
आज आम्ही ज्या श्रीविद्या साधनेतील मार्गावर आहोत । त्यासाठी श्रीदत्तात्रेय , श्रीपरशुरामजी , श्री षोडशानंद , श्रीदत्तात्रेयनाथ कविराज यांचे खुप आभार ।

आजचा काल दिवसेंदिवस अतिप्रगत होत चालला आहे । प्रत्येक बदलणाऱ्या युगात पराजगता मधून स्थूल जगतात श्रीविद्या साधने च्या नियमात किंवा दृश्य-अदृश्य शक्ति मध्ये बदल घडत गेले ।
आजकाल पूर्वी जशी श्रीविद्या साधना शिकवली जाई तसे होत नाही । अत्यंत कमी कमी ठिकाणी चांगले गुरु ही विद्या योग्य व्यक्ति ला देतात ।

आजकाल मराठी लोकां मध्ये अध्यात्मिक रुचि असणारा तरुण वर्ग ललिता सहस्रनाम , त्रिशती , श्रीललिता बद्दल माहिती घेवून लेख लिहून लोका पर्यंत पोचवत आहे , हे पाहुन आनंद होतो ।
तशी अनघालष्मी व्रत करणाऱ्या ना ललिते शी परिचय वेगळा करून द्यायची गरज नाही , कारण अनघा ही ललिता च होय । श्रीदत्तात्रेय यांच्या तीव्र श्रीविद्या साधने च्या यज्ञा तुन निर्माण झालेली देवता । ति त्यांची पत्नी वगेरे नव्हे , हे लक्षात घ्या ।

तुम्ही श्रीविद्या साधने च जितका अभ्यास कराल तितका कमी आहे आणि हे सर्व खूपच किचकट आहे । म्हणून श्रीदत्तात्रेयनंदनाथ कविराज यानी आधुनिक साधकां साठी वरिवस्या ग्रन्था तुन ति सोपी करून दिली । खूपच कमी ठिकाणी अनुत्तरामनाय किंवा दक्षिण किंवा षडाम्नाय पद्धतीने श्रीविद्या साधना दिली जाते । या साधनेची जपनुक स्वतःच्या जीवा पेक्षा ही अधिक आहे त्यामुळे ही दीक्षा देण्याचे प्रमाण ही अल्प आहे ।

इथे अस नाही , की ६-७ दिवसाचे शिबिर लावले आणि श्रीमहागणपति पासून नवावर्ण पूजे पर्यंत सर्व पूर्ण केले । काही ठिकाणी ७ दिवसात ही सर्व पूर्ण करतात , यात अनेक विदेशी लोक पन साधना शिकायला येतात।
पन वास्तविक आपण कस पुढे जायच आहे ।
एक शिक्का हवाय की विद्या आत्मसात करण्याची दृष्टि !
अश्याच काही गोष्टी ची माहिती नवोदित श्रीविद्या साधना शिकणाऱ्या ला हवी ।

श्रीविद्या साधने मध्ये पहिले प्रश्न पडतात की ,  ति कोणत्या मार्गाची आहे ? गुरु परंपरा काय आहे ? गुरूपादुका काय आहे ? पूर्णदीक्षा किंवा पूर्णभिषेक झालाय का ?
……. आता थोड़ आधुनिक होऊन विचार करा ,
मला श्रीविद्या साधनेतून मोक्ष मिळेल का ? जी , गुरु परंपरा श्रीविद्या मध्ये मी फॉलो करणार , त्यातून माझे गुरु मला खरा मोक्ष-मुक्ति मार्ग दाखवू शकतात का ?  श्रीयंत्र भेदन क्रिया मध्ये आंतर पद्धति काय आहे ? पँचमवेद काय आहे ?
काय तुमाला असे प्रश्न पडतात ?

★ सर्वप्रथम श्रीविद्या म्हटल्या वर ” भोग-मोक्ष ” दोन्ही आले । ‘ भोग ‘ म्हटल्यावर तुमाला जीवनात भौतिक अडचणी ज्या आहेत त्या संपूण आर्थिक मानसिक आरोग्य याने एक समाधान मिळणे होय । तुमाला प्रश्न पडला असेल की या साधनेने हे खरच मिळत का ?
पन हे सत्य आहे , श्रीविद्या मध्ये त्यासाठीच प्राथमिक अवस्थेत श्रीमहागणपति अर्थात क्षीप्रा गणपति साधना अगदी त्यासाठीच आहे। काही तीव्र शापित दोष यातून दूर नाही झाले , तर श्रीविद्या अंतर्गत श्रीमातंगी श्रीवाराही देवते ची ही साधना आहे ।  पूर्वजा नी साधनेच व्यवस्थित नियोजन करून च श्रीविद्या क्रम बनवला आहे।
यांचे अनुभव घेवून च इथे लिहित आहे । लेख मोठा होईल , म्हणून सर्वच इथे लिहत नाही।

आता , ‘ भोग ‘ झाला पण , मोक्षाच काय ?

बऱ्याच श्रीविद्या शिकवणाऱ्या ठिकाणी श्रीविद्या मोक्षकारक आहे , म्हटली जाते ।
पन तो मिळतो कसा याबद्दल कुणीही भाष्य करत नाही । तुम्ही म्हणाल श्रीविद्या मध्ये नुसते पंचदशी आणि षोडशी मंत्रानुष्ठान केल्याने मोक्ष मिळतो , पण हे सत्य नाही आहे ।

माझाच श्रीविद्या साधनेतील एक अनुभव सांगायच तर मला ही श्रीविद्या दीक्षा घेताना असे मार्गदर्शन केले गेले की , ….
साधक श्रीविद्या अंतर्गत तीव्र साधने मधून श्रीयंत्र मधील बिंदु पर्यंत पोचल्यावर अंतिम अवस्था येते तेव्हा साधकाच्या मनात विचार येतो की आता देवी दर्शन देईल । पन तिथे देवी दर्शन देत नाही , एक आरसा असतो आणि त्यात आपन च आपला चेहरा बघतो जो ललिते प्रमाणे दिसतो , म्हणजे माझी आत्मा च श्रीललिता आहे अस वाटने … हा आभास होतो। आणि हाच मोक्ष आहे , अस मानले जाते ।

या वाक्यावर बरच संशोधन केले , त्यानंतर दैवयोगाने श्रीविद्या साधनेत पुढे मार्गदर्शन करणारे गुरु भेटले । ….. आणि वरील वाक्याला सुधारत माझी सुरुवात झाली ति श्रीकृष्ण याने अर्जुनास संगीतलेल्या एका श्लोकाने ,

ऊर्ध्वमूलमधः शाखमश्वत्थं प्राहुरव्ययम्‌ ।
छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्‌ ।1।

वरील श्लोक म्हणजे श्रीविद्या , ब्रम्हांड , किंवा सर्वच देवीदेवता यांच एन्ड किंवा मोक्ष ई आहे ।
विस्तार भयासत्व सर्वच लिहू शकत नाही , कारण काही ज्ञान घेण्यापूर्वी की पचवन्यापूर्वी साधना हवी आणि आपल्या मन-बुद्धि ची अवस्था पशुभावा तुन दिव्यभावात ठेवावी लागते । आणि ही क्रिया लगेच लगेच घडत नाही ।

इथे देण्याचा उद्देश्य इतकाच की ” मोक्ष-मुक्ति ” जे म्हणतो ति कल्पना खऱ्या अर्थाने समजने ।

★ दूसरा विषय म्हणजे गुरुपरंपरा आणि गुरूपादुका  …….
श्रीविद्या साधनेत गुरुपरंपरा लागते हे नक्कीच । आपन अनेक लेखात याबद्दल वाचले असेल ।

गुरु परंपरा कश्या साठी आहे? एक शिक्का साधकावर बसावा म्हणून ?
श्रीविद्या शिकताना एक गोष्ट कायम लक्षात हवी की सर्वच आत्मे हे परमात्मा स्वरूप असले तरी , ‘ ति ‘ अवस्था गाठत असताना , एक भेद लक्षात घ्यावा…

गुरु-गुरु मध्ये भेद आहे , गुरु-सतगुरु मध्ये भेद आहे , सतगुरु – सतगुरु मध्ये ही भेद आहे ।
गुरुतत्व एकच असल तरी आत्मज्ञान मिळवताना कुणाला खरा सतगुरु मानायच , हे लक्षात हव । अन्यथा सतगुरु तुमच्या समोर आहे आणि तुमाला समजनार ही नाही ।
जस ११-१२वी सायन्स शिकवनारा प्रोफेसर प्राथमिक-माध्यमिक शालेय शिकवत नाही आणि प्राथमिक-माध्यमिक शिक्षक ११-१२ वी सायन्स शिकवत नाही । योग्य वेळी त्या त्या ठिकाणी गुरु बदलावा लागतो।
….. असच या साधना मार्गात आहे। जगात तुमाला श्रीविद्या साधना न करता किंवा तुमाला ति माहित ही नाही आहे , तरीही पुढील मार्ग दाखवनारे सतगुरु मिळू शकतात ।
त्यामुळे , आपल्याला साधनेतील डावपेच बरकाई ने लक्षात आले पाहिजेत।

म्हणूनच श्रीविद्या साधनेत गुरु परंपरा याला महत्व का आहे की ,
श्रीविद्या दीक्षा देणारा गुरु तुमाला स्थूल सूक्ष्म आणि परा जगताच ज्ञान देतो ,
सोबतच पंचदशी ची १५ तत्व आणि षोडशी च १६ व तत्व , आणि संपूर्ण श्रीविद्या रुपी संकल्प नष्ट करणारी त्याही पुढील ३६ तत्वाची विद्या आणि ३६ तत्वाच्या अतिब्रम्हाण्ड स्वरूपी गोळ्या ला भेदनार पँचमवेद च ज्ञान किंवा शिवाने सांगितलेला तुंकार ज्ञान ई. च अखेर पर्यंतचा प्रवासच ज्ञान गुरु देतो ।
इथे हे सगळ कॉम्प्रेस करून सांगितले आहे ।

त्याआधि श्रीविद्या साधकाला गुरु ,   साधना चालवायची कशी आणि श्रीविद्या मधून पराजगतात जाऊन , तिथली पराश्रीविद्या ज्ञान आत्मसात कसे करायचे याची ही तालीम देतो ।
पहिल्या प्रथम श्रीविद्या साधनेतून अतिंद्रिय शक्ति किंवा दिव्य दृष्टि खुली झाल्यावर जे दिसायला सुरुवात होते त्यातून साधका च मृत्यु ही घडू शकतो किंवा मानसिकता बिगड़ू शकते ।
याच काय कारण ?

मनुष्य जीवा मध्ये , फक्त त्याला आवश्यक तितक्याच गोष्टी बघू शकेल , काम करू शकेल इतकेच दिल आहे।
म्हणजे मानसा मध्ये असणारी यूनिवर्सल चिप किंवा प्रोग्राम बेसिक रुपात एक्टिव आहे । म्हणून तुमाला अंगावर किंवा आजुबाजुला असणारे नैनो किंवा माइक्रो माइक्रो बेक्टेरिया दिसत नाहीत , की ज्याची संख्या किती आहे , देव जानो ।
आता हे जर सामान्य माणसा च्या अंगा खांद्यावर ,  सामन्य दृष्टिला दिसले तर माणूस आत्महत्या करणार नाही का ?

असच अदृश्य असणाऱ्या शक्ति बद्दल ,
ही दृष्टि प्राप्त झाली तर तुमाला समजेल की माणसाच्या आजुबाजुला कित्येक प्रकारचे पिशाच जिन प्रेत यांच्या टोळी च्या टोळी आहेत , आणि त्या प्रत्येकक्षणी मनुष्यास विविध प्रकारे शोषण करून मानसिक भ्रमात टाकतात ( रोज पेपर मध्ये जे वाहन अपघात वाचतो त्यातले अधिकतर अपघात हेच पिशाच घडवतात)।  आता हे प्रत्यक्ष मनुष्यास दिसले तर ?
हे सांगायच उद्देश्य की , श्रीविद्या शिकवनारा गुरु किंवा गुरु संप्रदाय किंवा गुरु परंपरा ज्याला म्हणतात , त्यात तो गुरु इतक बारीक बारीक ज्ञान आणि दृष्टि तुमच्यात ट्रांसफर करत असतो।
इतक खोलवर विचार करून सांगनारी गुरु परंपरा किंवा श्रीविद्या गुरु या जगात आहे का ?  आणि असला तरी तो दुनिये पासून अलिप्त च राहिल। आणि जरूरी नाही की हे ज्ञान तुमाला श्रीविद्या गुरु कडूनच भेटेल , एखादा सिद्ध सतगुरु भेटला ज्याच्या श्रीविद्ये शी काही संबध नाही , तो ही साधकाला पुढे नेवु शकतो।
शेवटी परमेश्वरी तीव्र परीक्षा बघते आणि योग्य गुरु त्या त्या अवस्थेत साधुन देतो।

हेच पवित्र ज्ञान ग्रन्थात लिहिल्या प्रमाणे पूर्वीच्या काळी गुरु परंपरा – गुरुकुला मध्ये दिल जायचे आणि एक गुरु मधून दूसरा गुरु निर्माण व्हायचे । आज खरच तिच परंपरा चलत आहे का ….. ?

गुरु परंपरा म्हणजे हेच ते ” आत्मज्ञान ” आहे , जे गुरु कडून शिष्याला मिळते आणि त्यातून शिष्याने स्वतःला विकसित करायचे असते । दोन आत्मे एक होतात आणि अद्वैतता येते । एक गुरुचा आणि एक शिष्याच आत्मा , त्याआधि येते छिन्नमस्ता !
त्यामुळे गुरु परंपरा नावाच्या बागुलबुवात फ़सन्या पेक्षा ति काय आहे आणि कशी काम करते , यावर आधुनिक युगातील साधकानी अभ्यास केला पाहिजे ।

इथे सगळ्यात वाइट गोष्ट म्हणजे ” मन ” , जे साधकाला प्रत्येक क्षणी नाचवते । त्यामुळे गुरु कडून माया आणि मन यांचे डावपेच लक्षात घेतले पाहिजेत ।
तुम्ही श्रीविद्या साधक आहात आणि प्रत्येक क्षणी तुम्ही शरीर आणि मन पातळी वर येत आहात , तर विद्या तुमाला फ़सवत आहे।

श्रीदत्तात्रेय यानी श्रीदक्षिणामूर्ति याना गुरु करून श्रीविद्या साधना आत्मसात केली आणि मुख्य म्हणजे पँचमवेद ज्ञान ही समजून घेतले। जेव्हा पँचमवेद मधील गोम त्यांच्या लक्षात आली तेव्हा त्याना दूसरे गुरु करून पुढील विद्या आत्मसात करावी लागली । आणि म्हणून च ति विद्या भगवान परशुरामास भेटली आणि त्यांच्या योगे कर्णास । ( इथे मि तो भाग देत नाही । )

श्रीकृष्णने संदीपनी ऋषिना गुरु मानून सर्व काही आत्मसात केले, पन गीतेचे पवित्र ज्ञान खाली उतरवन्या पूर्वी श्रीकृष्णास नारायण ऋषीं कडून श्रीविद्या दीक्षा घ्यावी लागली ।

श्रीआदिशंकराचार्य याना वेदव्यास भेटल्यानंतर त्यांचे आयुष्य वाढले आणि त्यांचे पुर्विचे शैव गुरु नंतर आचार्य गौड़ पाद यांच्या कडून श्रीविद्या दीक्षा घेतली । त्यावेळी फक्त त्याना मंत्र दीक्षाच भेटली होती । नंतर साधना पूर्ण व्हावी यासाठी त्यानी श्रीललितेस प्रार्थना केली , तेव्हा श्रीललिते ने त्याना करवीर क्षेत्री जाऊन श्रीअंबाबाई च्या बाजूला असणाऱ्या मेरु श्रीयंत्रा च्या सहाय्याने साधना पूर्ण करन्यास संगीतले । पुढे जाऊन त्याना अन्तर्गर्भित होण्या साठी महावतार बाबाजी त्यांचे गुरु झाले ।

वरील सर्व गोष्टी वरुण आपन काय शिकतो किंवा तर्क लावतो , हा प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय आहे।
काही गोष्टीन्ची विविध अंगाने ओळख व्हावी लागते।

श्रीविद्या शिकवनारा गुरु आपल्या साधकाला जसे वरील ज्ञान देतो तसे ,
मूलाधार चक्राच मापदण्ड किती आहे आणि त्यावरून कुण्डलिनी च मापदंड किती आहे आणि त्यावरून आत्मा किती सूक्ष्म मापदंडा मध्ये व्यापली आहे , इतक सूक्ष्म सूक्ष्म अतिसूक्ष्म ज्ञान देतो ।
……… कारण ही सूक्ष्मावस्था नाही समजली तर अद्वैतावस्था साध्य होऊच शकत नाही। …. शेवटी , जर नुसत मूलाधार चक्रांवर लक्ष केंद्रित केल तर त्यातली एक पेटल्स आणि त्यात असलेली कैक पेटा-पेटल्स , त्यातही वेगवेगळ्या विद्या । असे सहस्रार पर्यंत विचार केला तर , बुद्धिची चाळन होईल।

यातच पुढील ज्ञान म्हणजे श्रीविद्या गुरु कडून वास्तविक ब्रम्हांडा ची व्याप्ति समजून घेणे।
……….  ब्रम्हास्त्र हातात आहे आणि भेदायच आहे कुणाला , …….. माहित नसेल तर साधकाच अश्वथामा तरी होतो नाहीतर अभिमन्यु तरी ।

श्रीविद्या साधनेत काही जनाना वाटते की सहस्रार पर्यंत ब्रम्हांड संपते । ….. म्हणूनच मि लेखाची सुरुवात करताना , गीतेच्या एक श्लोका पासून केली ….

ऊर्ध्वमूलमधः शाखमश्वत्थं प्राहुरव्ययम्‌ ।
छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्‌ ।1।

…  या श्लोकात मुलाधारा पासून सहस्रार , सहस्रार पासून शून्य- महाशून्य आणि महाशून्य पासून हिरण्यगर्भ पर्यंत आणि पूर्ण कवच भेदुन त्यापलिकडील स्तिथि , यासर्वाच ज्ञान देण्यासाठी वरील श्लोक परिपूर्ण आहे ।

श्रीविद्या अंर्तगत गुरु परंपरा मध्ये किती आणि काय शिकाव लागत , किती मोठा विस्तार हवा … हे तुमाला थोड़फार समजल असेलच ।

★  आता थोड्स श्रीविद्या अंतर्गत पूर्णाभिषेक काय असतो , पाहू …..

ही गोष्ट जाणून घेण्यापूर्वी एक प्राथमिक स्टेप लक्षात घ्यावी।  श्रीविद्या साधना शिकताना एक क्रम आहे ।
१) श्रीबाला त्रिपुरा
२) श्रीमहागणपति
३) श्रीमातंगी देवी
४) श्रीवाराही देवी
५) श्रीनवावर्ण पूजन पंचदशी दीक्षा (श्रीललिता )
६) श्रीषोडशी दीक्षा (पूर्णभिषेक)
७) श्रीमहषोडशी दीक्षा
८) श्रीराजराजेश्वरी दीक्षा ( साम्राज्य दीक्षा )

असा एक लांबलचक क्रम आहे । आम्नाय पद्धति नुसार हे बदलत जाते । एक एक आम्नाय मध्ये १६-१६ देवता चा क्रम असून त्यानंतर पंचदशी मंत्र दीक्षा मिळते। ह्या सगळ्या किचकट गोष्टी आहेत ।
आता वरील क्रम पाहिल्यास षोडषीदिक्षेला पूर्णाभिषेक म्हणतात।
सगळ्यात पहिल म्हणजे षोडशी मंत्र दीक्षा भेटली , जप केला म्हणजे ति दीक्षा नाही ।
….. काही ठिकाणी ही दीक्षा घेतल्या नंतर एक नवीन नाव गुरु कडून दिले जाते । अभिषेका मध्ये पूर्ण पवमान सुक्ताने स्नान असते ।

आता , ….. थोड्स याला विस्तृत समजून घेतल पाहिजे ।
पंचदशी चा मंत्र आणि षोडषी च मंत्र ।
१५ तत्व म्हणजे १०इंद्रिय + पंच तन्मात्रा = १५ कला … हे जीव तत्वा मध्ये अंतर्भूत आहे. हेच १५ म्हणजे ” पंचदशी ” …. ज्याची दीक्षा घेण्यासाठी अनेकजन आटापिटा करतात.

याच्या पुढील दीक्षा ‘ षोडशी ‘ आहे , ज्यात १६ वी कला जोडली जाते.
……..  यामध्ये गुरु सोबत काही वर्ष प्रत्यक्ष राहाव लागत. आजकाल फक्त षोडशी मंत्र लगेचच दीक्षा म्हणून दिला जातो , जे की चूक आहे….आणि विषाची परीक्षा बघण्या सारखे आहे. ही अशी दीक्षा घेन म्हणजे स्वतवर स्टैम्प मारण्यासारख आहे ,
पन याचे अंतर्गत पैलू शिकवन्यासाठी ,  देवी स्वतः साधका समोर येवून बसून ज्ञान देत नसते ।
…. ते ज्ञान गुरु कडूनच घ्यावे लागते.  म्हणून पंचदशी च्या दिक्षे नंतर षोडशी च्या दिक्षे वेळी गुरु सोबत राहण्या चा नियम आहे.
कारण ,  वरती उल्लेख केलेल्या ज्ञाना चा बरचसा भाग अभ्यासाव लागतो आणि अनुभव घ्यावा लागतो। यात साधकाची हयात निघुन जाऊ शकते।

षोडषी मंत्रात   १६वी कला म्हणून ” ह्रीं ” बीजाक्षर जोडले जाते आणि पंचदशी चा षोडशी मंत्र बनतो.

अखेर त्यातून काहीच साध्य होत नाही. कारण , ते साधक हे समजून घेत नाही की १६ वे ” ह्रीं ” बीज हे पूर्णपणे देवीच्या स्वरुपात नसून , साधकाला गुरु कडून जे आत्मज्ञान मिळते आणि साधका मध्ये एक विशिष्ट परिपक्वता येते , गंभीरता येते , एक ट्विस्ट येते आणि स्थूल जगताच संबध कमी होतो आणि पराजगता च आरोहण होते ….. तो गुरु-शिष्य-शक्ति चा त्रिवेणी संगम म्हणजे ते १६ वे बीज ” ह्रीं ” आहे. या अवस्थेत पँचमवेद ज्ञान ही दिले जाते की ज्याच्यात मोक्ष आणि ब्रम्हांडा भेदनाचा मार्ग गुपित आहे.

ही १६वी कला च ही ” निर्वाण ” अवस्था आहे , ज्याने जीव .. जीव भावातून मुक्त होतो.  ही १६ वी निर्वाण कला द्वारा पाश जाल( पंचदशी १५ कला ) यातून सुटुन शिव भाव प्राप्त करतो , परन्तु मूल महाशक्ति चा साक्षात्कार त्याही अवस्थेत होत नाही.  यासाठी शिव-भावा तून शव- भावात याव लागते. जेव्हा जीव शवासन रुपात महाशक्ति ला अर्पण होतो , तेव्हाच साक्षात्कार संभव होतो.
म्हणूनच तिला ” पँचप्रेतासंस्थिता पँचब्रम्ह स्वरूपिणी ” असे म्हटले आहे.

आता या सर्वाचा अभ्यास केल्यास लक्षात येते की षोडषी साधना किती उच्चकोटि ची आहे । आणि ज्या साधकाला ह्या ” निर्वाण पद ” रूपी अवस्थेचा आभास झालेला आहे , तो माणसाच्या वास्तविक जगात राहन्याच मोह च नाहीसा होईल , तो फेसबुक व्हाट्सएप पन वापरणार नाही , एकांतवास धारण करेल , एक प्रकारे शून्य अवस्थ बनेल । असा साधक गुरु सोबत राहताना च आतून मुक्त व्हायला सुरुवात होतो ।
आता इतकी क्षमता असलेला षोडषी किंवा पूर्णभिषेक प्राप्त साधक शोधून सापडेल का ? …. अत्यंत कमी कमी साधक या अवस्थेत असतात आणि ते जगा पासून अलिप्त राहतात ।

आता काही असे साधक असतात ज्यानी षोडषी दीक्षा घेतलिय , परन्तु श्रीललिता परमेश्वरी स ” देवी ” म्हणून संबोधन देतात।  इथे त्यांच्या प्राथमिक ज्ञानाची भांडाफोड़ होते । कारण दसमहाविद्या किंवा श्रीललिता असो याना देवी अथवा देव म्हटल जात नाही , देवी-देव सम्बोधन असणाऱ्या न मृत्यु आहे । म्हणून श्रीललिते स ” देवता ” म्हणतात। तसच ” श्रीकाली देवता ” ” श्रीबगलामुखी देवता ” अस । ….. हा खुप महत्वपूर्ण भाग आहे ।

आणखी थोड्स इथे सांगायच म्हणजे , या पूर्णाभिषेक च्या आणखी वरती अंतिम देवता श्रीराजराजेश्वरी देवता आहे । एकप्रकारे राजराजेश्वरी पर्यंत च्या साधने स पूर्ण श्रीविद्या म्हणतात , आणि ही श्रीविद्या एक त्याही उच्चस्तरीय एका विद्येची ” अंग विद्या ” म्हणून कार्य करते आणि श्रीविद्या रूपी सङ्कल्प संपुष्टात आनते । अत्यंत गूढ़ आणि किचकट विषय असल्याने अतिशय मोजके इथे मांडले आहे ।

या निर्वाण अवस्थे पर्यंत पोचताना अनेक समस्या , परीक्षा न सामोरे जावे लागते , ही फक्त पंचदशी षोडषी चे अमुक लाख-कोटि जप केले म्हणजे साध्य होत नाही ।
भौतिक जीवनात अडचणी येतात च पन , अघोर शक्ति ची दर्शन होने , संकेत होने , त्या त्या प्रत्येका ची स्वतःची एक दुनिया असते त्याच्या शी संबध येतो ।
या देवीन्ची मातृका योगिनी यक्षिणी मंडलांच जरी संबन्ध पकडला तरी एक मातृका मध्ये कैक कैक प्रकारच्या वर्णा च्या विचित्र भयावह रूप आहेत । काहीची शरीर फक्त नुसते मांस विरहित कंकाल आहेत ।हे इतक रौद्र रूपी आहे की , श्रीललिते च्या श्रीयंत्रा मधील मणिद्वीप रूपी महालात अश्या अनेक प्रकारच्या देवी देवता रक्षक आहेत ।
हे आपन नुसत्या डोळ्याना पाहू ही शकत नाही । मग तुम्ही विचार करा , आजकाल षोडषी सारखे उच्च उच्च मंत्र दीक्षा म्हणून दिल्या वर वरील प्रसंगा तुन तो साधक जाउ शकेल काय।  त्यामुळे एक स्टैम्प मारून श्रीविद्या दीक्षित म्हणवन खूपच मूर्ख पनाच आहे।

श्रीविद्या एक मोठा अभ्यास आहे । जरूरी नाही तुमाला पुढील मार्गक्रमण करताना श्रीविद्या मधीलच पूर्ण गुरु भेटेल ।  स्वतःच्या साधना , मन स्वभाव आणि आत्मीयता प्रमाणे अन्य सतगुरु भेटून साधक पुढे जाउ शकतो आणि त्यावेळी मार्ग बदलू ही शकतात।

इतक्या मोठ्या वाटेवर चलताना , शेवटी या विद्या ही नीरस वाटायला लागतात।
आणि अखेरिस श्रीविद्या सुद्धा सोडायची असते आणि त्याही पुढील उच्च विद्या ही सोडायची असते , कारण या विद्या हासिल केल्यावर सुद्धा , त्याही अवस्थेत शेवटी या विद्यांचा कंटाळ येतो – निरसता येते आणि साधक या पवित्र विद्यां पासून परावृत्त होतो …..
कारण ,  मुक्ति मोक्ष मिळण्यासाठी फक्त प्रत्यक्ष सतगुरू संगत च उपयोगात येते ।

विस्तार अधिक होईल म्हणून श्रीयंत्रा बद्दल चा भाग इथे देत नाही । पन , प्रत्येक साधकाला पूर्ण श्रीविद्या शिकता नाही आली तरी त्यांचे बेसिक ज्ञान आणि प्राथमिक साधना नक्कीच शिकुन घ्यावे ।

हे आर्टिकल लिहिन्या च उद्देश्य फक्त माझ्या कड़े सध्या साधना करत असलेल्या साधकांच्या ज्ञानात भर घालने आहे । इतरा साठी ही हे ज्ञान समजावे म्हणून , हे आर्टिकल अन्य ग्रुप मध्ये पोस्ट करत आहे। कृपया उगाचच मतभेद करू नयेत ।

 || Sri Matre Namah ||

Contact us to learn Sri Vidya Sadhna: 09860395985

 Subscribe to our Youtube Channel !!

Join us on Facebook !!

 

Share

Written by:

210 Posts

View All Posts
Follow Me :

9 thoughts on “Sri Vidya – Sadhna Overview (एक आध्यात्मिक अभ्यास)

 1. Please let me know if you’re looking for a article writer for your blog.
  You have some really great posts and I feel I would be a good asset.
  If you ever want to take some of the load off, I’d absolutely love to write some content for your blog
  in exchange for a link back to mine. Please shoot me
  an e-mail if interested. Thank you! I saw similar here:
  E-commerce

 2. Hey there! Do you know if they make any plugins to assist
  with SEO? I’m trying to get my blog to rank for some targeted keywords
  but I’m not seeing very good results. If you know of any
  please share. Thank you! You can read similar blog here:
  Dobry sklep

 3. Hey there! Do you know if they make any plugins to help with SEO?
  I’m trying to get my blog to rank for some
  targeted keywords but I’m not seeing very good results. If you know
  of any please share. Many thanks! You can read similar text here: Ecommerce

 4. Howdy! Do you know if they make any plugins to help
  with SEO? I’m trying to get my site to rank for some targeted keywords but I’m not seeing very good success.
  If you know of any please share. Appreciate it!
  You can read similar blog here: GSA Verified List

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

six − 3 =

error: Content is protected !!
× How can I help you?