Mahavtar Babaji – सिद्धाश्रम आणि महावतार बाबाजी  ८

Mahavtar Babaji – सिद्धाश्रम आणि महावतार बाबाजी ८

?हिमालयातील एक रहस्यमयी मठ ….सिद्धाश्रम / ज्ञानगंज(गौरी शंकर पीठम्)भाग :- ८?
? श्री महावतार बाबाजी गुरुपौर्णिमा विशेष … एकमेवाद्वितीय ?
Article Publish Date 16 July, 2016
नमस्कार मित्रहो …..आज लेखमालेचा ८वा भाग तुमच्या पर्यन्त पोहोचवताना आनंद होत आहे. मागच्या ७व्या भागातून तुमाला बाबाजींच्या पूर्ण प्रकाशमान स्वरूपाची कल्पना आली असेल. या लेखामुळे अनेक साधकांच्या मनात अनेक वर्ष घोळत असलेले संभ्रम दूर झाले. कित्येक जनानी क्रिया योगाची दीक्षा घेवून साधना सुरु ही केली आहे. येणारी नवीन पीढ़ी जी बाबाजींच्या अध्यात्म मार्गात येईल , त्याना श्री बाबाजींच स्वरूप-अवतार आणि क्रिया योग श्री विद्या साधना याबद्दल भ्रामित व्हाव लागणार नाही. हे लेख अर्थात बाबाजींचा आशीर्वाद , त्याचं प्रेम तुमच्या पर्यन्त पोहोचल आहे.
【 मित्रांनो , लेख वाचून काही प्रश्न पडल्यास , आध्यत्मिक मदतीसाठी मला संपर्क करू शकता (निवृत्ती उबाळे. कणकवली 9860395985) बाबाजींच्या कृपेने जमेल तितकी मदत केली जाईल.】
मागचा लेख मार्च २०१६ ला पब्लिश केला होता. त्यानंतर ३महीन्या नंतर हा लेख प्रस्तुत करत आहे. खर तर ८ व ९ हे भाग माझे कधीच लिहून झालेत , पण कोणी अनामिक शक्ति ते पब्लिश करन्यापासून रोखत होती. का? ते मला समजेना. याची उत्तरे मला मे-जून मध्ये मिळत गेली. त्यासर्वांसाठी मी बाबाजीं चे आभार मानतो.
* हा लेख व्यवस्थित वाचावे , चिंतन करावे. अर्ध्यावरुन तर्क लावत बसु नए.
खर तर माझा मूळ पिंड देवीच्या जवळचा , बाबाजीं बद्दल मला त्यांचे नावच माहिती होते . नोव्हे. २०१५ ला भारतातील प्रसिद्ध शिल्पकार श्री रामपुरे सर यानी माझ्याशी कसलिही ओळख नसताना , बाबाजीं ची दिव्य मूर्ती त्याना आलेल्या सन्देशा प्रमाणे भेट पाठवली. रामपुरे सरांचा मी आभारी आहे. तिथुनच माझ्या अध्यात्मिक जीवनास एक वळण भेटले आणि श्री बाबाजीं च जे सत्य-स्वरूप आणि क्रिया योग याची माहिती आपल्या मराठी लोकांना समजावी म्हणुन ही लेखमाला सुरु झाली. मागील सर्व लेख तुमि वाचले असतील. सर्व लेखातील मजकूर काही पुस्तक , इतर लेखातुन आणि काही उच्च योगिक गुरुंकडून घेतली आहे.

माझ्या माहितीत जगात , लाहिरी-क्रियानंद-योगानंद-रामय्या-आनंदघना-Mr.M या बाबाजीं च्या परंपरा चालु आहेत. आणि काही जन असतील ही. पण या सर्वानी बाबाजीं चा सर्वच क्रिया योग पुढे दिला नाही. योगानंद यांनीही अतिशय जवळील शिष्याना तो दिला , पण त्यानी तो पुढे दिला नाही. आज जो क्रिया योग अश्या ट्रस्ट मधून शिकवला जातो , तो माणसाला नुसता गरजेपुरता आहे. मूळ सत्य वेगळच आहे. कारण , त्यासर्वाना माहीत होते की कलियुगात पुढे जाऊन याचा बाजार होईल. हे गुपतिच ठेवल गेल. …….
काही ठिकाणी क्रिया योगाच्या नावावर मोठ्या फीज घेतल्या जातात. हे सर्वत: शापित आहे. क्रिया योग हा अनादी काळा पासून आहे , ज्यावेळ पासून श्री बाबाजी ही त्याचे साक्षीदार आहेत/होते. ती एक ‘ देन ‘ आहे. भूमि (मुलाधार) आणि त्यासंबंधित माणूस , त्यातील आत्मा … जो अनादी काळापासून जन्मजन्मांतरीच्या मुक्तेसाठी लढत आहे. त्यांच्यासाठी क्रिया योग हे अमृत आहे. आणि त्याचा बाजार करण हा किती मोठा द्रोह आहे !
क्रिया योग शिकणाऱ्या नी हे कन्फर्म करा , की तुमाला खरच तो ‘ क्रिया योग ‘ दिला गेला आहे का? की फसवल आहे? तुमी असेच भूलभुलैया च्या जगात जगत राहिलात तर श्री विद्या साधना कधी करनार ? जी खऱ्या क्रिया योगा शिवाय पूर्णच होऊ शकत नाही. आणि श्री बाबाजीं च्या पलीकडे ही ती ‘श्री नागलक्ष्मी माता’ आहे , जी हा बाजार पाहत आहे. तिच्याकडे जाण्याचा मार्ग तर अतिशय कठिन आहे. श्री बाबाजी फक्त तीच्या शब्दासाठी या भूमिवर देह रूपाने थांबले. …….. काही लोक हिमालयात बाबाजीं कड़े घेवून जातो म्हणतात ,…. ईथे तिस-तिस वर्ष स्वर्गारोहिनी/बद्रीनाथ पालथी घालुन टाचा झिजवणाऱ्या साधूनां कधी बाबाजी नी सिद्धश्रमाचे दार उघडली नाहीत , मग हिमालयात कुठले बाबाजी तुम्ही दाखवनार आहात?
बाबाजीं नी माझ्यावर कृपा दाखवून त्यांचे शिष्य ‘आनंदघन’ यांच्या पर्यन्त पोचवले. त्यांच्या पत्ता भेटने हे एक दिव्यच होते. ते बाबाजीं च्या मूळ २७ शिष्या पैकी एक. अस्ट्राल वर्ल्ड ची मालकी बाबाजी , सोबत त्रैलंग स्वामी आणि आनंदघन याच्या कड़े आहे. मला पाच दिवस तिथे रोज ५-६ तास श्री विद्येची साधना केल्यावर , बाबाजीं नी पाठवलेल्या दिव्य सर्परूपी दंडाचे दर्शन झाले. हा दंड आनंदघन यांच्या घरी जपुन ठेवला आहे. जेव्हा भारत स्वतंत्ररित्या अस्तित्वात नव्हता. नेपाळ मध्ये राजशाही होती. तेव्हा , अनेक साधू तपस्येसाठी तिबेट-हिमालय या ठिकाणी जात. त्यावेळी एक सिद्ध महापुरुषाने तो दंड नेपालच्या राजास पुजेसाठी दिला होता. बरेच पिढ्या नेपाळच्या घराण्याने त्याची पूजा केली. आणि सध्या या 25 वर्षा मागे , बाबाजीं नेपाळच्या राजास सन्देश पाठवला की , हा दंड आनंदघन यांच्याकडे पोचवावा. त्यानी न एकल्याने राजाला त्रास झाला. अखेर राजाने , दंडास सोनेरी वर्ख , मोती लावून घेतले आणि एका अज्ञात व्यक्ति कडून आनंदघन यांच्याकडे पाठवला. त्यानंतर नेपाळ मध्ये राजसत्ता संपली. तो दंड मृत्युंजय शक्तिने जागृत आहे. त्याच्या दर्शनाने अनेक दोष दूर होतात. त्याच्या काही गुप्त किस्से ही आहेत , ते ईथे सर्वच देवू शकत नाही. मला त्या दिव्य शक्तीच्या दर्शनाचा मार्ग मोकळा झाला आणि तिथेच मला आनंदघन यांच्या मुलाकडून क्रिया योगाच्या ६४ स्टेप पैकी १ माझ्या हातात ठेवण्यात आली व गरजू व्यक्तिना विनामूल्य शिकवन्यास सांगितले. या चमत्कारा बद्दल मी त्यांचे आभार मानतो.
श्री आनंदघन यांच्या मृत्यु अपघातात झाला. बेंगलोर वरुन ते आपल्या घरी श्री विद्या साधने चे शिबिर आटपुन निघाले होते. सोबत कार मध्ये 3 मंडळी होती. ऐन वेळी प्रवासात श्री बाबाजीं चा मेसेज आला , की आनंदघन याना तातडी ने शरीर सोडून एका महत्वपूर्ण कार्यासाठी याव लागेल. त्यावेळी जपान देशामध्ये अनुभट्टी चा स्फोट होवून ते बेट पूर्ण नष्ट होण्याच्या मार्गावर होते. आणि तेथे आध्यत्मिक शक्ति खुप कमी पड़त होती. त्यामुळे काही उच्च साधकांची त्यासाठी आवश्यकता होती. त्यामुळे ऐन वेळी आनंदघन याना शरीर सोडाव लागल. …… ही गुप्त घटना मला त्यांच्या मुलाने खाजगीत सांगितली , ती आज तुमाला उघड करत आहे. कारण , श्री बाबाजीं च जगात चालेल कार्य तुमच्या समोर याव आणि आपन तर त्यांच्या समोर काहीच नाही आहोत.
………….. या सर्व अद्भुत गोष्टींची दार उघडण्यासाठी , माझी भेट माझ्या आध्यत्मिक प्रवासात एक सूफी संताशी झाली. आज जगात सूफी ना के बराबर आहेत. आणि असा व्यक्ति भेटला , त्याने तुमाला जवळ केले तर ते तुमच भाग्य समजावे. त्यांची भेट ही बाबाजीं ची पूर्वकल्पित नियोजन होते. कारण त्यांच्या कडून जे ज्ञान आणि आशीर्वाद भेटला त्याने पुढील मार्ग मोकळे झाले. ज्याची मला कल्पना ही नव्हती.
……. सत-त्रेता-द्वापार युगात ही क्रिया योगाचे पतन केले गेले आणि कलियुगात ही होत आहे. अश्याने बाबाजी सिद्धश्रमाचे दार तुमाला उघड़नार नाहीत.
भगव वस्त्र घाल्याण्याचा अधिकार सन्यास मार्गी आणि श्री दत्तात्रेय यांच्याकडे आहे. बाबाजी नी कधीही भगव वस्त्र घालुन या अस सांगितल नाही. संसारी व्यक्ति साठी भगव वस्त्र चालत नाही. भगव वस्त्राला शास्त्रात आग्निवस्त्र म्हटल आहे. अध्यात्मात भगव म्हणजे साधुत्व जे मनाला आणि स्वभावला आल पाहिजे. तुमी सर्व दोष त्या अग्नि मध्ये जाळून खऱ्या चिंतनाकडे वाट तुमची चालु होते , ते म्हणजे भगव ….।
खरा गुरु कसा असावा? ज्या गुरुमध्ये अहम् आहे , स्वतःचीच ज्याला ओळख नाही , तो कसा गुरु बनु शकेल? गुरु श्रीकृष्णसारखा सचेत असला पाहिजे. गुरु ही एक शिष्याला दिलेली एक संधी आहे. जो अध्यात्माचा मार्ग मोकळा करून मोक्षाची दार खुली करून देतो. माणसाला सतत जन्म भेटत नाहीत. त्यामुळे मिळालेल्या जन्म ढोंगी गुरुच्या सहवासात नका घालवु. श्री बाबाजी परमगुरु आहेत. ते तुमाला अनुभुति देनारच.
काही ‘ क्रिया योगा ‘ चा बाजार करणारे भंपक गुरु लेक्चर मध्ये लोकांसमोर क्रिया योग बद्दल आपल ज्ञान झाड़त असतात. नेमके क्रिया योगाची व्याख्या काय? तुम्ही कधी ‘ पुरानपुरुष ‘ वाचल आहे का? ते वाचलात तर तुमाला समजेल की खरा क्रिया योग सहज सोपा नाही. ज्याने क्रिया योग अंगिकारला आहे , तो अतिशय नम्र असतो. क्रिया योगा सोबत Unconditional Love हे तत्व अमलात आणावे लागते. तोच प्रथम मार्ग आहे बाबाजीं च्या हृदयात स्थान मिळवण्याचा. असे काही चांगले लोक आहेत , जे मराठी आहेत आणि क्रिया योगाच्या ज्ञानासाठी त्यानी आयुष्य वेचल आहे .. ते लोक आजही पड़द्या आड़ काम करत आहेत , कसलिही जाहिरात न करता. कारण , मुळात खरा क्रिया योग शिकन इतक सोप नाही. तिथे तुमची परीक्षा लागते , त्या गुरु पर्यन्त पोचन्यासाठी. ते सर्वांच्याच नशिबात नसत. खऱ्या क्रिया योग शिकायला एखाद्यला कमीत कमी रोज योग साधना करून एक वर्ष ही लागू शकत …. कारण मूळ शरीरा चा पाया नाही बसवला तर , ती क्रिया योगाची ऊर्जा सामान्य व्यक्ति एकदम सहन करू शकत नाही. पुढे काही मुद्दे देत आहे , जे बाबाजीं च्या कृपेने भेटेले………
* क्रिया योगात दोन मंत्र आहेत जे सृष्टीच्या उगमावेली अवस्थित होते , आणि क्रिया योग करत असताना त्या दोन्ही बिज मंत्राचा जप केला तर कुंडलिनी नावच आपल्या शरीरातील इंजिन वेगान कार्य करत. तसच अनादी कालापासून ती पंरपरा आहे ज्यात सुरवातीस एक मंत्र म्हणुन , क्रिया योगास पहिली सुरुवात होते. ते सर्व गुपित आहे.
* क्रिया योगात एक गुरु मंडल मानले आहे. ज्यात मरीचि,भरद्वाज,अंगिरस,पुलस्त्य,पुलह, क्रतु,दक्ष,वसिष्ठ आणि वामदेवा आहेत. हे एक स्टेज येते तेव्हा ते एक होऊन जाते आणि क्रिया योगी १०८अग्नि कला , ११६सूर्य कला आणि १३६चन्द्र कला यानी युक्त होतो , त्या शरीरात मोकळ्या होतात. कारण या कला मुक्त होत नाहीत , तोपर्यन्त क्रियायोगी पुढे जाऊ शकत नाही.
* क्रिया योग श्री विद्ये साधने एवढाच अतिशय खोल आहे , किचकट आहे. यासाठी सर्वात आधी विश्वाची प्रथम गुरु श्री ललिता मातेची कृपा दृष्टी हवी आणि बऱ्याच वेळा ती प्रथम ‘अहम्’ बनून येते आणि साधकाला आध्यत्मिक उन्नति मध्ये अनेक परीक्षा बघुन अडथळा आणते.
* श्री दत्तात्रेय स्वतः अवधूत आहेत. क्रिया योग अवधूत विद्येतुन त्यानी प्रगट केला. मागच्या लेखात DNA बद्दल सांगितले होते , त्यात काही भाग माणसाचा inactive करून ठेवला आहे , अर्थात DNA वर ब्लोकेजेस टाकले आहेत , ते श्री दत्तात्रेय यानी काही % टाकली आहेत. ते स्वतः प्रत्येक मनुष्य जातीच्या आत्मा-शरीर याच्या एका तत्वाशी निगडीत आहेत.
* संत ज्ञानेश्वर हे स्वतः क्रिया योगी होते , जे सतत २४तास क्रिया योग करीत. ज्ञानेश्वरी ही क्रिया योग आहे. म्हणूनच अल्प वयात ते एवढे करू शकले. त्यांचा मागचा जन्म अर्जुनाचा मानला जातो , ज्याला श्रीकृष्णाने क्रिया योग शिकवला होता.
मित्रांनो , काही दिवसांनी गुरु पौर्णिमा येत आहे. बाबाजीं च्या सर्व भक्तानां इतकच सांगन आहे की महावतार बाबाजी आणि क्रिया योग ही कोणाची व्यक्तिगत मालकी नाही. तुमाला त्यांच्या कड़े जाण्यासाठी कोना मध्यस्थाची गरज नाही.
? मी एक बाबाजींच्या शिष्याची एक कथा सांगतो , बघा तुमाला यातून काय समजते. श्री बाबाजींच्या २७ शिष्यांपैकी एक महेशानंद , ते बाबाजीनी घेतलेल्या परीक्षेत त्यांच्याच एका गुप्त आश्रमात गेले. ………….. हिमालयात एक उंच जागी पिंपळाच्या वृक्षाखाली एक झोपड़ी होती , जिथे श्री कमलेश्वरी मातेचा आश्रम होता. त्या आश्रमात प्रवेश करता महेशानंद बिचकले. कमलेश्वरी माता कोण होती ? तर तिथे ११ वर्षाची लहान मुलगी होती. महेशानंद विचार करु लागले की या ११ वर्षाच्या मुलिस आपल्या गटातील लोक आणि बाबाजी माता कमलेश्वरी का म्हणतात? आणि हिच्या दर्शनासाठी अनेक संत ही येवून गेलेत. …. असो, मि ही हिच्या पाया पडतो. …..कमलेश्वरी मातेने त्याना आपल्या पायास स्पर्श करू दिला नाही. ती म्हणाली,” हे महेशानंद , तुम्ही मला ११ वर्षाच्या लहान कन्येत पाहत आहात. वयाने ज्येष्ठ असलेल्या अनेक संतानी माझे वय न पाहता , मला जो प्रकाश माझ्या गुरुनी दिला आहे. तो पाहिलाय. तुमी हे ओळखु शकला नाही. तुमच्या अहंकरास प्रणाम! ….. मी जिथे जिथे बसते तिथे तिथे माझे पूजास्थान बनते. मला मि बसलेल्या सर्व ठिकाणी सारखीच स्पंदने मिळतात. कारण , माझा प्रकाश उदात्त तेजस्वी आहे. वेगळे पूजास्थान असन हे एक प्रकारच सूक्ष्म अहंकार निर्माण करत. दिव्यत्वाच्या मार्गाकड़े बघण्याचा दृष्टिकोण तुझा चुकीचा आहे. महावतार बाबाजीं कडुन शिक्षण घेवून ही तुझ्यात इतका अहंभाव कुठून आला? हे महेशनन्द , तू प्रथम नम्रतेचे सिद्धांत शिक. अध्यात्म ही तुझी समस्या नाही आहे. तुझा अहम् तुला खऱ्या अमृतात बुडू देत नाही आहे. ” ………. ?
मित्रांनो , क्रिया योग हा एक गूढ़ विषय आहे. अनादी काळापासून… क्रिया योग शिकवणाऱ्या भल्या-भल्या लोकांना हे माहीत नाही….. की , श्रीकृष्णला क्रिया योग कुणी दिला? सुदामा-१६,००० बायका-रासलीला याचा क्रिया योगाशी सबंध काय? जाबाली च क्रियायोग संबंधी सत्य काय? क्रियायोगात त्रेतायुगातील सर्वात मोठी शोकांतिका कोणती? बरेच लोक रामायण-महाभारत ऐकतात , प्रवचन करतात , पण त्याना हे माहीत नाही की , क्रिया योगा बद्दल त्यात कोणती माहिती देण्यापासून रोखण्यात आली? नचिकेतुला यमा कडून ती गुप्त विद्या कोणती दिली गेली? विष्णुच वाहन गरुड़ याचा क्रिया योगाशी काय सबंध? ध्रुव , मार्कण्डेय अमर्त्य कसे बनले? श्री शुकाच्या जीवनात काय घडले की क्रिया योग भुत विद्ये च्या नावाने ओळखला जाऊ लागला? नारदाला क्रिया योग कसा भेटला? श्री दत्तात्रेय यानी क्रियायोग किती टप्प्यात शिकवला? नाथ संप्रदाय मध्ये क्रिया योगाचे काय रहस्य? ॐ ह्रीं ॐ याच क्रिया योगात काय स्थान? ईं विद्या-सेषा विद्या-प्राणज्योति विद्या- वारुणी विद्या यांचा क्रिया योगाशी काय सबंध आहे? पृथ्वीच्या जन्मावेळी क्रिया योग कोणत्या नावे होता? ….असे अनेक गूढ़ प्रश्न आहेत. जे क्रिया योग सबंधी आहेत आणि दिव्य आहेत. मी फक्त इतकेच प्रश्न दिलेत ….. मला या सर्व गोष्टी ची उकल करायला आवडेल पण काही ढोंगी गुरु या सर्व गुप्त गोष्टींचा बाजार करतील , अशी भीती असते.
♀ क्रिया योगातील एक रहस्य सांगतो . ज्यावेळी क्रिया योग सृष्टित अवतरला , त्यावेळी बरच काही झाल. कारण ही विद्या गुप्त ठेवणे आवश्यक होते. खरा क्रिया योग कधीच ढोंगी लोकांच्या हाती लागला नाही आहे. कारण , ज्यावेळी एखादा गुरु क्रिया योग शिकवतो तेव्हा प्रथम श्री दत्तात्रेय यांची परवानगी लागते. श्री बाबाजींच्या अगोदर श्री दतात्रेय यांचे क्रिया योग गुपित ठेवणे आणि संरक्षण करने हे कार्य आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा कोणी ढोंगी गुरु किंवा व्यक्ति…… क्रिया योगा शिकन्यासाठी कुठे जातो , तेव्हा श्री दत्तात्रेय हेतुपुरस्सर एक नाटक निर्माण करून चुकीच्या ठिकाणी गुंतवून टाकतात. फारच कमी लोक असतात ज्याना या सत्याच्या मागे लपलेल गुपित समजत. हे आताच नाही तर कलियुगाच्या अगोदर पासून चालु आहे.
हजारो वर्षा पासून अनेक महान साधू उचकोटिच्या तपस्येत आहेत. या जगात अनेकांनी जन्म घेतला पण , देवाची अनुभूती करण सर्वाणांच जमल नाही. तसच आत्म्याची अनुभुति करण ही जमल नाही. कारण ‘ माया ‘ काय आहे , ती कशी फसवते हे सर्वाना समजत नाही. म्हणुन आपल्याला भंपक गुरु फसवतात आणि आपण फसतो.
( येणाऱ्या काही वर्षात ३ऱ्या विश्व महायुद्धाच सावट होऊ घातल आहे. मागील वर्षात होणार हे महायुद्ध श्री दत्तात्रेय आणि श्री बाबाजींच्या अथक प्रयत्नाने टळले. पण , पुढे टळेल अस नाही. आणि त्यासाठी प्रचंड मोठी आध्यात्मिक शक्ति साधनेची गरज लागेल. या सर्वांच नियोजन श्री दत्तात्रेय आणि श्री महावतार बाबाजी अतिशय गुप्तनपणे करत आहेत. ते आपल्या शिष्याना वेगवेगळ्या मिशन साठी उद्युक्त करत आहेत. येत्या काही वर्षात लोकांपर्यन्त ते वेगाने पोचत आहेत. कारण , त्या सर्वाना आपल्या सर्वांकडून आध्यत्मिक साधनेच बळ हव. हा सर्व विषय गुप्त आहे , त्यांच्या आदेशाने मी एवढच सांगू शकतो. श्री दत्तात्रेय आणि श्री बाबाजींच्या कार्यात पूर्ण समर्पण भावाने सहभागी व्हा. )

गुरुपौर्णिमेच्या सुभेच्छा …. सर्व बाबाजीं च्या भक्तानां हा लेख त्यांचा दिव्य सन्देश आहे.

क्रमशः………………..
धन्यवाद । Article complete 10 July, 2016 at 02 :00 AM , Kankavali

श्रीविद्या सञ्जीवन साधना सेवा पीठम , ठाणे
निवृत्ती उबाले. ( अनाम देव )
Contact : 09860395985

Share

Written by:

213 Posts

View All Posts
Follow Me :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
× How can I help you?