?हिमालयातील एक रहस्यमयी मठ ….सिद्धाश्रम / ज्ञानगंज (गौरी शंकर पीठम्)भाग :- ९?
¶ श्री महावतार बाबाजी आणि ” राणी खेत ”
…………..च्या गुंफेचे सत्य ¶
Publish date 21/12/2016
. नमस्कार मित्रहो, आज या लेखमालेचा ९ वा भाग सादर करीत आहे. महान गुरु महावतार बाबाजी यांचे सत्य स्वरूप मांडण्याचा माझा हा तोकडा प्रयत्न आहे. कारण, जगात काही ढोंगी लोकांमुळे बाबाजीं च्या बद्दल अनेक अफवा पसरल्या आहेत. जगात अनेक क्रिया योग शिकवणारे धंदेवाईक लोक निर्माण झाले आहेत. माझ्या, मागील ८ ही लेखात, अनेक गूढ विषय उकलण्याचा प्रयत्न मी केला आहे. त्यातून तुम्ही सावध व्हा आणि सचेत व्हा. कलियुगात अध्यात्माच्या वाटेवर तुम्ही असता, तेव्हा डोळे-कान उघड़े ठेवावे लागतात. लाखात एक व्यक्ति या गोष्टी समजतो आणि श्री बाबाजीं आणि श्री दत्तात्रेय पर्यन्त पोचतो.
बऱ्याच महिन्या नंतर हा लेख लिहित आहे. आणि आता वेळ आलीय एक मोठे सत्य तुमच्या समोर उघड़ करण्याची, की जे जगात अत्यंत कमी लोक जाणतात. ते धक्कादायक आहे, पण पुष्कळ लोक पुस्तक वाचून आणि भावनेच्या अति आहारी जाऊन स्वतःची वैचारिक शक्ति गमावून बसतात.
भारताला या तीन शतकात महान संतांची परंपरा लाभली आहे. भारत अध्यात्मिक दृष्टया गुप्त रितीने विश्वातील एक स्टेशन आहे. सर्वच संतांना त्यांच्या अध्यात्मिक मार्गातून जाताना श्री दत्तात्रेय यांची शिकवण आणि कृपा लागते. कलियुगात सृष्टि बाबत जे काही आध्यत्मिक गुप्त बदल आहेत, त्याचाहि एक परिवर्तन काळ असतो. जेव्हा तो काळ येतो तेव्हा नियती नेहमी प्रमाणे आपले मत खरे करते आणि तिच्या कार्यात कोणीही मध्यस्थी करू शकत नाही… न दत्त न बाबाजी. अनेक लोक महावतार बाबाजींना गुरु किंवा क्रिया योगाचे जनक म्हणून जरी मानत असतील तरी त्यांची कृपा मिळवणे इतकी सहज, सोपी गोष्ट नाही.
【 मित्रांनो , लेख वाचून काही प्रश्न पडल्यास, अध्यात्मिक मदतीसाठी मला संपर्क करू शकता (निवृत्ती उबाळे. कणकवली 9860395985) 】
● श्री महावतार बाबाजी हे कृष्ण जन्माच्या अगोदर पासून अस्तित्वात आहेत. त्यांचेही महान गुरु आजही अस्तित्वात आहेत. बाबाजी गुप्त पणे एकमुखी दत्त आहेत. त्यांचे हिमालय सोडून जगात काही देशात गुप्त रूपाने आश्रम आहेत, जे काही हजारो वर्षा पासून आहेत. त्यांनी हिमालय सोडून इतर ठिकाणी आश्रम का काढले ते ही एक रहस्यच आहे, जे पुढे जाऊन मी सांगेन. विश्वातील प्रसिद्ध ८ चिरंजीव आहेत त्यानंतर ९ वे चिरंजीव श्री बाबाजी आहेत. ते आपल्या काही शिष्यांकडून गुप्त रूपाने जगात वेगवेगळी कामे करीत आहेत. …… पण, त्यांना दुःख होते की, आजचा मानव आपली विचार करण्याची आणि ‘सत्य’ काय आहे? हे जाणून घेण्याची क्षमता गमावत आहे, की जे मानवाच्या अध्यात्मिक प्रगतिला घातक आहे.
कलियुगात साधने साठी मानव जातीकड़े जास्त आयुर्मान नाही आणि सतत मानव जन्म मिळणेही दुरापास्त. जो मानव जन्म मिळालाय, तो योग्य गुरुंच्या सान्निध्यात आणि साधनेत घालवा, तुमच्या साधनेची ज्वाला इतकी प्रखर करा की, त्या महान गुरु महावतार बाबाजींना तुमच्या आत्म्याची दखल घ्यावी लागेल.
हा लेख वाचून अनेक लोकांना खूप धक्का बसेल. पण, ती गरज आहे की आपल्या मनातील शंका आणि अनेक लोकांनी जे काही चूकीचे लिहून ठेवले आहे ते खोडून काढायची. तुम्ही म्हणाल, हे आत्ताच का? तर नियतीच्या सृष्टितील हस्तक्षेपात अध्यात्मिक बाबतीत जो जो काही ठरलेला काळ त्यातही १९८० दशका नंतर, या ४ वर्षांपासून अनेक बदल घडत आहेत आणि त्यातही २०१२ नंतर २०१६ या वर्षाची अखेरचे काही महिने मोठा अध्यात्मिक बदल घडवणारे होते, जिथून सृष्टि-संत-मनुष्य या त्रिकोणात एका नवीन बदलास सुरुवात झाली आहे. या कालगणने ची पूर्ण फोड मी यावेळी करू शकत नाही.
मला या लेखात योगी कथामृत मध्ये उल्लेख केलेल्या “रानीखेत” च्या, लाहिरी महाशय यांना क्रिया योगाची दिक्षा मिळालेल्या त्या पवित्र गुंफे बद्दल बोलायचे आहे. तुम्ही ते पुस्तक वाचले असेल. रानीखेत (जि. अल्मोड़ा, उत्तराखंड) जंगली डोंगराळ प्रदेश आणि साधने साठीही उत्तम जागा. लाहिरीना कामातून पुरेसा वेळ मिळे, तेव्हा ते भटकायला जात. … क्रिया योगाच्या दीक्षे साठीच बाबाजीं नी त्यांची बदली रानीखेतला करवून घेतली. १८६१ ची घटना. लाहिरी महाशय फिरता फिरता एका गुंफेपाशी आले, तेव्हा एक मनुष्य त्यांची वाट बघत बसलेला होता. ते म्हणजेच महावतार बाबाजी.
त्या गुंफेत लाहिरीजींच्या मागच्या जन्मातील साधनेसाठी वापरलेले कांबळयाचे आसन आणि पितळेचा पेला त्यांनी जपून ठेवला होता. बाबाजींनी लाहिरीजींच्या कपाळास स्पर्श केला व त्यांना मागील जन्माचे स्मरण करून दिले. त्या दिवशीची पूर्ण रात्र बाबाजीनी लाहिरी महाशय यांस एका महान कार्यासाठी त्या गुफेत थांबवून घेतले. (हा सर्व प्रसंग तुम्ही योगी कथामृत मध्ये वाचा.)
आज संपूर्ण जगासाठी रानीखेतची ही गुंफा आणि घटना प्रेरणास्थान बनले आहे.
अनेक लोक देश-विदेशातून ही गुंफा बघायला येतात.
मुंबई – पुण्यातून अनेक लोक तिकडे जातात. क्रिया योगाचे क्लासेस चालवणारेही सहली काढतात. ध्यानासाठी सुद्धा अनेक सामूहिक सहली काढतात. … पण,【 प्रश्न आहे की, रानीखेतची ‘ ती ‘ गुंफा “खरी” आहे का? ज्यात लाहिरी महाशयाना दिक्षा दिली गेली.】
लोक हा विचार करत नाहीत. …… खरं तर, रानीखेतच्या ज्या गुंफेत तुम्ही जाता, ती खरी गुंफा नाही आहे. ती गुंफा मानव
निर्मित म्हणू शकता किंवा काही विशिष्ट कारणा करिता बनवलेली ManMade Cave ( Not Mahaavtar Babaji cave )आहे. खरी गुंफा ही रानीखेतच्या जंगली भागा मध्येच आहे, पण सामान्य माणसा पासून त्याचे अस्तित्व खूप गुप्त ठेवले आहे. खऱ्या गुंफेचे वास्तव खूपच कमी लोक जाणतात आणि ही बनावटी गुंफा जगा साठी (खास करून यूरोपियन – अमेरिकन लोक) का निर्माण केली, हे सुद्धा जगात कमी लोक जाणतात. त्या खऱ्या गुंफे पर्यन्त सामान्य माणूस पोहचू शकत नाही.
काही लोक या रानीखेतच्या गुंफेला अत्तर लावतात, फूल-फळ ठेवतात, हवन करतात, अश्या गोष्टीना बाबाजीं कड़े कसलीही किंमत नाही. काही लोकांना त्या गुंफेत चमत्कार आढळून येतात. एखादी व्यक्ति त्या गुंफेत वस्तू, लॉकेट, दोरे, अंगारे ठेवून जातो आणि त्या वस्तू तिसऱ्या माणसाला मिळतात. त्यांना त्या वस्तू बाबाजींनी पाठविल्या आहेत असा गैरसमज होतो. हे सर्व मनाचे भ्रामक खेळ आणि खुळी समजूत आहे.
रानीखेत ही जागा साधनेसाठी उत्तम असली तरी, बाबाजी रानीखेतच्या त्या खोट्या गुंफेत कधीही येत नाहीत. लाहिरी महाशय यांची ती पवित्र गुंफा आजही रानीखेतमध्ये वेगळ्या स्थानी अस्तित्वात आहे आणि लोकां पासून गुप्त ठेवली आहे, की ज्यायोगे त्याचे पावित्र्य राखले जाईल. एवढ्या वर्षात लाखो लोकांनी जाऊन त्या खोट्या जागेचा चोथा करून टाकलाय. ह्या सर्व गोष्टींची आधीच कल्पना त्यांना होती. योगानंदांनीही बऱ्याच गोष्टींची उकल केली नाही.
* योगानंद यानी योगी कथामृत मध्ये ” रानीखेत ची
गुंफा आणि घटना” याबद्दल जे लिहिलेले आहे, ते पूर्ण सत्य आहे. पण, रानीखेतची खरी सुवर्णमय गुंफा ही सर्वसामान्य लोकांना दिसूच शकत नाही. मग, या घटने वर देश-विदेशातील लोक विश्वास कसा ठेवणार? यासर्व गोष्टींचा विचार करून ही खोटी गुंफा बनवण्यात आली. योगानंद यानी अत्यंत हुशारीने बऱ्याच गोष्टी झाकून ठेवल्या. पण, त्यांच्या नंतर अनेक लोकांनी या खोट्या रानीखेत गुंफेच्या परिक्रमा करून बाबाजीं वर मोठी पुस्तके लिहिली, ज्यात आपले मराठी लोक पण आहेत. या कोणाला सुवर्णमय गुंफे चा गुप्त मार्ग सापडला नाही का? जो रानीखेतच्या नदी पाशी आहे. तुम्ही म्हणाल की, रानीखेत मध्ये नदी कुठे आहे? हा मार्ग मी सांगणार नाही.
फक्त एवढंच सांगेन की, लाहिरी महाशय यांच्या क्रिया योग दिक्षेची सुवर्णमय गुंफा ही रानीखेत मध्ये एका नदीपाशी आहे, जी
सामान्य माणूस आपल्या डोळ्यांनी बघू शकत नाही. माणूस 3 Dimension येतो आणि ही पवित्र स्थळ 4D मध्ये येतात.
बाबाजीना तुमच्या हृदयात शोधा, रानीखेतची कर्दळीवन आणि गिरनार सारख्या परिक्रमा करून काही होणार नाही. ज्या अर्थी ते कृष्ण जन्मा अगोदर पासून आहेत, त्या अर्थी श्रीकृष्णाने त्यांना कलियुगात मोठी कामगिरी दिलेली आहे. एका महान गुरुच्या शोधात आध्यत्मिक यात्रेचे मार्गक्रमण करणे वाटते तितकी सोपी गोष्ट नाही.
लाहिरी महाशय यांच्या सोबत घडलेली घटना तुमच्या सोबतही घडू शकते, वेगळ्या अर्थाने. तुम्ही त्यासाठी पात्र बना. जेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी एक महत्वाचा पैलू बनता, तेव्हा ते तुमच्यासाठी दूसरे रानीखेतही बनवू शकतील. पण, या महान गुरुच्या साधनेच्या अटी सशर्त पूर्ण करणे आवश्यक आहे. ….. आणि त्यासाठी तुम्हाला क्रिया योग आलाच पाहिजे असं नाही.
लाहिरींना क्रिया योग मिळणे हे त्यांचे भाग्य होते. कदाचित तुम्हालाही वेगळी साधना त्यांच्याकडून मिळू शकेल. कारण साधना अनेक आहेत की ज्या अखेरीस क्रिया योगात विलीन होतात. त्यानी हजारो वर्षात अनेकांना क्रिया योग सोडून अन्य साधनाही दिल्या आहेत.
या सर्वाला खऱ्या सात्विक गुरुची खूप आवश्यकता आहे. भगव्या वस्त्राखाली ढोंग करणाऱ्या लोकांच्या नादी लागून
स्वतःचे शरीर आणि आत्मा विटवू नका. 16।12।2016
***************************************************
|| Sri Matre Namah ||
Contact us to learn Sri Vidya Sadhna: 09860395985
Subscribe to our Youtube Channel !!
Join us on Facebook !!