Mahavtar Babaji – सिद्धाश्रम आणि महावतार बाबाजी १०

Mahavtar Babaji – सिद्धाश्रम आणि महावतार बाबाजी १०

?हिमालयातील एक रहस्यमय मठ ….सिद्धाश्रम / ज्ञानगंज (गौरी शंकर पीठम्)भाग :- १०?
।। ॐ क्रिया बाबाजी नमः ।।
।। ॐ क्रिया नागलक्ष्मी माताय नमः ।।
◆ श्रीविद्या + क्रिया योग = रहोयाग ◆
Publish Date २४/१०/२०१७

नमस्कार मित्रहो, यंदाच्या दिवाळीला माझ्याकडे आलेल्या श्री बाबाजींच्या विग्रहाला तीन वर्षे होतील. या तीन वर्षात जीवनात घडणारे आध्यात्मिक बदल खूपच मोठे होते. ह्या लेखमालेलाही सुरु होऊन तीन वर्षे होतील. आजचा लेख तब्बल एक वर्षा नंतर लिहित आहे.
【 मित्रांनो , लेख वाचून काही प्रश्न पडल्यास, अध्यात्मिक मदतीसाठी मला संपर्क करू शकता (निवृत्ती उबाळे. कणकवली 09860395985)】
मुळात क्रियायोग हा श्रीविद्या साधने शिवाय अपुरा आहे. तसं पाहिलं तर क्रियायोगातील उच्चतम तंत्र (technique)आज लुप्त आहे. बेसिक योग जो क्रियायोग नावाने शिकवला जातो त्यालाही
मर्यादा आहेत. पूर्वी जे काही क्रियायोगातील मोठे योगी होते, त्यात बरेचसे श्रीविद्या किंवा एखाद्या दशमहाविद्येचे साधकही होते. ही पार्श्वभूमी बरेचसे लोक बघत नाहीत. जसे की, श्री बाबाजींचे शिष्य आद्य शंकराचार्य यांना श्रीबाबाजींनी क्रियायोग दीक्षा दिली आणि गौड़पाद ऋषीं कडूनही श्रीविद्या साधना मिळाली. श्रीबाबाजींचे गुरु अगस्ति मुनि हे उच्च कोटीचे श्रीविद्या
साधक होते, ज्यांनी श्रीललिता सहस्रानाम प्रसारित केले. सद्य परिस्थितीचा विचार करता Mr. M यांना सुद्धा श्रीमहेशानंद यांनी क्रियायोगाची दीक्षा दिली आणि एका दुसऱ्या गुरुकडून श्रीविद्या साधनाही देवू केली. क्रिया योगाला किंवा योग साधनेला एक उच्चतम विद्येची गरज का लागते , याच अभ्यास आवश्यक आहे.
● या सर्व आध्यात्मिक गोष्टी समजण्यासाठी योग्य गुरुची
निवड आणि मार्गदर्शन अत्यंत आवश्यक असते. मुळात दत्तात्रयां नी श्रीविद्या साधना परशुरामाला देवू केली आणि ती परशुराम कल्पसूत्रमध्ये लिखित रुपात प्रसारित केली. आज आपली आध्यत्मिक दृष्टिकोण बदलन अत्यंत आवश्यक आहे. बरेच लोक दत्तात्रयांना गिरनार, नरसोबाची वाडी आणि दत्त मंदिरात शोधतात. पण श्रीदत्त एक Scientifical Yogi आहेत, ज्यांनी विज्ञाना मध्ये अल्केमी, केमेस्ट्री, तंत्र विज्ञान , रस , ज्यामितीय आदींचा शोध लावला. अश्या वैज्ञानिक योग्याला आपण अश्या ठिकाणी शोधून कसे बरे उच्चतम अध्यात्म गाठणार? हा प्रश्न पडतो. या उलट विदेशात विदेशी लोक श्रीदत्तात्रयांना मानणारे अनेक साधक आहेत, जे त्यांना मूर्तीपेक्षा त्यांनी निर्माण केलेल्या शास्त्रा तून पूजतात. आपण असा दूर दृष्टिकोन ठेवून विचारच करत नाही आणि दत्तात्रयांना गिरनार, नरसोबावाडी, मंदिर आणि गुरुचरित्र , दत्तमहात्म्य एवढ्याच गोष्टींमध्ये पाहतो. हा नुसता चौकटीतील परमार्थ झाला. एखाद्या महान सिद्ध महापुरुषाला अपेक्षित कार्य किंवा एखाद्या व्यक्तीला जर खरंच साधनेत प्रगति करायची असेल तर ह्याचा गंभीरपणे विचार होणे आवश्यक नाही का? श्रीपादानी ही आपल्या चरित्रात दसमहाविद्या च उल्लेख केलाय , तो कशासाठी ? याच विचार ही आवश्यक आहे.
आपल्या आसपास काहीजन वेगवेगळी परिक्रमा करून त्यांच्या अनुभवांचे व्याख्यान झोडणारे आणि करवणारे पहायला मिळतात. पण थोड़ी आंतरिक अंतर्यात्रा जर केली तर श्रीदत्तात्रेय बद्दल ची सतयुगा पासून ची वस्तुस्थिति जाणून घेवू शकतो. श्रीदत्तात्रय हे सुद्धा कितपत मुक्तिच्या अवस्थेत आहेत? मुक्तिचा मार्ग दाखवण्यात दत्तात्रयांना त्यांच्या मातेचे किती मोठे योगदान होते? दत्तात्रय या सगळ्या वैज्ञानिक विद्या कुठून शिकले? आणि ते खरंच पृथ्वीवर आहेत की पृथ्वीच्याही ज्या काही पंचकोशीय तरल अंग आहेत त्यात आहेत? त्यांच्या साधना काळात त्यांनी ज्या वस्तूंचा अवलंब केला त्याची राखण कशी केली गेली? पायाखाली फक्त त्यांच्या चारच वेद आहेत की आणखी कोणी अन्य स्वरुपात त्यांच्या कड़े मुक्तिची आस मागत आहे? ज्यावेळी ब्रह्मांडाला त्यांनी श्रीविद्या साधनेतून जिंकले, त्यानंतर त्याच ब्रह्मांडाचे भेदन करायला त्यांनी कोणती तंत्र साधना केली? त्या तंत्राचे गुरु कोण होते? दत्तात्रयांनी जो पंचमवेद त्यांच्या गुरुंकडून शिकून घेवून अंमलात आणला आणि त्यात त्यांनी या ब्रह्मांडाच्या मुक्तिचे गुपित लपविले, तो पंचमवेद अनेकांना माहितही नाही. त्यांनी मिळवलेले उच्चकोटिचे ज्ञान पाहूनच कार्तिकेय स्वामी अल्केमी शिकायला त्यांच्याकडे गेले. परशुरामही श्रीविद्या शिकायला गेले. त्यांनी लिहिलेले हे पवित्र ज्ञान आजही आपल्या लोकांमध्ये वाटलं जात नाही किंवा जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही.
दत्तात्रयांच्या पंचमवेदाचा साधा एक भाग नुसता ऐकायलाही प्रचंड गुरुकृपा लागते. खऱ्या भक्तीचे बीज रुजवणारा, आपल्या आसपास जो वासनामय दोषांचे आभामंडल (ora) असते, कार्मिक बंधनाने जोडलेले आत्मे, स्वतःच्या शरीरावरील ज्या जड़ ग्रंथी आहेत त्याही मुक्त होतात (जड़ ग्रंथी हा एक मोठा विषय आहे. ज्यामध्ये नाशवंत तत्वाला आपण ईश्वर मानतो.) पँचमवेद मध्ये ब्रह्मनादाचे मूळ सार काय आहे ह्याचे वर्णन करताना स्वतः शिवाने सांगितले की कोटी कोटी कल्प जरी त्याचे वर्णन केले तरी ते कल्पही अपूरे पड़तील. आणि यांच ब्रह्मनादाचे सार दत्तात्रयांनी
पंचमवेद मध्ये खुले केले. पँचमवेद ग्रंथाला जितके महत्व उच्चतम शास्त्रात आहे तेवढ कुठल्याही ग्रंथ , वेद , पुरानाला , चरित्राला नाही. गुरु आणि शिष्य यांची घडन कशी असावी , शिष्य बनन्या साठी पात्र कस असाव त्याची इत्यभूत माहिती त्यात दिलेली आहे. ख़र तर अश्या ज्ञानाचे व्याखान ठेवली गेली पाहिजेत. ही खरी संस्करा ची सनातन रीत आहे.
एक उदा. संगायच तर , भगवान शिवाने कृष्णाला जे प्रथम तंत्र उपदेश केला , तो भाग त्याचा पहिला पटल गाधीसुवन विश्वामित्र आणि अत्रिमुनि श्रीदत्तात्रेय यांच्या प्रश्नोत्तराने झाला. यज्ञ आदि अनुष्ठान करून संसार मधून मुक्ति पान अशक्य आहे हे समजल्यावर खिन्नमन झालेल्या विश्वमित्र याना श्रीदत्तात्रेया नी संगीतले की , मि तुमाला नंदिकेश्वर ने संगीतलेल गन्धर्वतंत्र चे वर्णन एकवतो. ……. असे अनेक प्रसङ्ग ज्ञानाचे दत्तात्रेयानी लिहून ठेवलेत . ज्याचाकडे आपन दुर्लक्ष करतो. पारसी लोक ज्याला सरोष म्हणतात , इस्लामी लोक ज्याला सातव्या आसमानी मधला कलमाए कुन , वेदांत ज्याला उद्गीत म्हटलय , लैटिन मध्ये वॉइस ऑफ एनिग्मा म्हटलय … सगळ्या धर्मात अंतिम जो नाद संगीतल आहे तोच दत्तात्रेयानी लोकांसाठी फोडून सांगितलाय. अश्या ज्ञानाची खरी लेक्चर , व्याखाने चलली पाहिजेत , अनूभव हे व्यक्ति सोबत मरतात , वरच्या जगात त्याचा काही उपयोग नाही , मुलतत्वाच ज्ञानाचा अनूभव आणि श्रवण उपयोगी येतो.
● आता श्रीबाबाजींच्या क्रियायोगा बद्दल विशेष माहिती थोडक्यात देतो. क्रियायोग शिकणारे आणि अभ्यास करणारे खूप साधक आहेत. फक्त श्वास वर खाली फिरवून कुंडलिनी जागरण करता येत नाही. शरीराला जर सप्तचक्र असतील तर तुमच्या
आत्म्याला कुठे सप्तचक्रं आहेत? मग क्रिया योग तुम्ही फक्त तुमच्या मानवी देहासाठी करताय की आत्म्याच्या उन्नती साठी करताय ? जर आत्म्याने नवीन शरीर धारण केले तर मागील
जन्मात क्रियायोगाची केलेली सप्तचक्र साधना ही पुढील जन्मातील शरीराला सहाय्यभूत ठरते का? कुंडलिनी मध्ये सर्पाचे मुख शरीरात आहे की नाही? त्यावर कोणती दशमहाविद्या
विराजमान आहे? सहस्रार चक्रात असणारी टनेल्स ही कुठे जाऊन उघडतात. असे बऱ्याच प्रकारचे ज्ञान क्रियायोग शिकताना लागतेच.
मनुष्य जन्म एक जॅकपॉट सारखा असतो. परमेश्वरा कडून एक संधी दिली जाते, खिदमत करण्यासाठी. परन्तु बरेच लोक अज्ञानापोटी चूकीच्या व्यक्तिकडे वेळ घालवून आयुष्याचे मूल्यवान श्वास फुकट घालवतात.
♀ क्रिया योग शिकताना ५० मातृकांचा विचारही करावा लागतो. मातृकावर्णाचा जन्म याच पातळीवर झाला आहे की एके काळी त्या क्रियायोगास लययोग, मंत्रयोग, बीजयोग म्हणत. आकाशा पासून वारा येतो, वाऱ्यापासून अग्नि, अग्निपासून जल, जला पासून भूमि, भूमिपासून अन्न आणि अन्नापासून एकपेशिय जीव. याला क्रियायोगातील भूतविद्या असेही म्हणतात. आकाशापासून वैश्विक श्वासाने शब्द रुपात जन्म घेतला आणि नादरूपात गायत्रीचा जन्म झाला.
♂ आता क्रियायोग वैदिक मध्ये कश्या प्रकारे आहे याबद्दल थोडेसे पाहू. वैदिक युगात मुद्गल आणि काण्डव अशा साधुनी त्याची अनुविद्या म्हणून आराधना केली. उड्डालक आणि याज्ञवल्क्य यांनी त्याकाळी क्रियायोगास गौरव प्रदान करून दिला. ऋग्वेदातील पुरुषसूक्त आणि श्रीसूक्त हे स्पष्टपणे क्रिया योगाच्या पैलूंचे द्योतक आहेत. यजुर्वेदात सुद्धा आपल्या समोर भरीव अर्थगर्भाचे विविध मंत्र येतात. त्यात क्रियायोगाच्या गुप्त नियम तंत्राची माहिती आहे. अथर्ववेद सुद्धा क्रियायोगातील उद्गीत आहे. येथे नुसते वेदच नाहीत, तर जसे गुरु शिष्याला उपनिषदा कडे आणतो, तसे ज्ञानाचा बराचसा भाग जो क्रियायोग आहे तो यात लपवलेला आढळतो.
♀ आता श्रीबाबाजींच्या शिष्याबद्दलच्या कथेतील एक भाग सांगतो. जो क्रियायोग आणि श्रीविद्या यांच्या एकत्रित साधनेतील आहे. ……. श्रीललिता सहस्रनाम वाचताना आपल्याला ८३ व्या श्लोकात एक शब्द येतो, हा श्लोक क्रियायोगाची अत्यंत प्राचीनता दर्शवतो. जे श्रीललिता सहस्रनाम हयग्रीवाने अगस्ति मुनीस दिले होते, ते श्रीमहावतार बाबाजींचे गुरु ही होते.
“॥ ओड्यान पीठ निलया बिन्दुमण्डल वासिनी ।।
रहोयाग क्रमाराध्या रहस्य तर्पण तर्पिता ।। ८३।।”

श्रीमहावतार बाबाजींच्या फौजेत श्रीविद्यानंद होते. ज्यावेळी
क्रियायोग आणि श्रीविद्या यांचा समन्वय कसा आहे, याची उकल करायची वेळ आली त्यावेळी श्रीबाबाजींनी श्रीविद्यानंदांना आद्य शंकराचार्य यांच्याकड़े पाठवले. श्रीबाबाजींनी सांगितल्या प्रमाणे बद्रीनाथच्या गुफेत अथक प्रयासा नंतर श्रीविद्यानंद तेथे गेले. ५ दिवसा शोधल्या नंतर सरते शेवटी त्यांना अंतर्ज्ञानाने आदीशंकरा चा आत्मिक सूक्ष्म प्रकाश शोधण्यात यश आले. हळूहळू प्रकाशा ने मानवी देहाचा आकार घेतला. पण ते शरीर पंचतत्वाचे नव्हते. तो स्फटीकमय प्रकाश होता ज्याने तीव्र साधना केली होती. कुठल्याही शाब्दिक आवाजा शिवाय यांच्यात बोलणे झाले. आदिशंकर म्हणाले, तुला तुझा प्रश्न तोंडाने उच्चारायची गरज नाही. तुझा पहिला प्रश्न हाच आहे ना की मी ही अवस्था प्राप्त करण्यासाठी काय यातना सहन केल्यात? तर ऐक, माझ्याकडे असलेल्या अलौकिक बुद्धिमत्तेस ज्यास माझ्या गुरुजीनी प्रोत्साहन दिले, त्यात एका टप्प्यावर माझ्यात खूप अहंकार होता. मी माझ्या सगळ्या प्रतिस्पर्ध्यांना माझ्या ज्ञानाच्या किरणांनी जिंकले. हे सगळे होत असताना मला जाणवू लागले की ज्ञान हेच आत्म्यास मुक्त करू शकते. ब्रह्म विषयी माझी विलक्षण भावना होती. ज्यामते सदाशिव हाच शक्तिंचा प्रवर्तक होता. त्यामुळे मी शिव आणि शक्ति मध्ये शिवाची निवड केली. मग सर्वच मठातील
विद्वानांना हरवण्यास सुरुवात केली. हे तोपर्यंत चालले जोपर्यंत पंचब्रह्म किंवा पंचतत्वा पलीकडे काय आहे, हे देवीने मला सांगितले नाही. यात जाती व्यवस्था ही सुद्धा एक फळी होती. त्यानंतर शक्तिने मला खरी श्रीविद्या दिली. श्रीमातेचा उत्कट भक्त बनलो. मग समजले की श्रीविद्या हिच ब्रह्मविद्या आहे व त्याच मुळे 4 पीठात मी श्रीचक्र म्हणून प्रकाशाच्या वर्तुळाची विहित पूजा स्थापली. पण मला तुला हे सांगायचे की श्रीविद्याचा सराव चार टप्प्या मध्ये केला पाहिजे. १) बहिर्याग, ज्याला स्थूल पूजा म्हणतात. तीच मग २) अंतर्याग ज्याला अद्वैत म्हणतात यात बदलते. ही सूक्ष्म भक्ति असून पुढील ३) रहोयाग, ज्यास योगिक क्रियायोगाचा मार्ग म्हणतात आणि मग ४) सूक्ष्म क्षमा, याला कुठल्याही भक्तिची जाणीव नाहीशी होण्यास महायाग म्हणतात.
………….. अश्या प्रकारे हा अत्यंत दुर्मिळ संदेश आदिशंकरांनी दिला.
आपल्या आसपास अनेक लोक श्रीयंत्र घरात ठेवतात. लक्ष्मीच प्रतीक म्हणून , पन मुळात श्रीयंत्र हे आदिशक्ति श्रीललिता त्रिपुरसुंदरी च प्रत्यक्ष शरीर , जी सर्वच देवतांची माता आहे. काही वास्तुशास्त्री सिद्ध श्रीयंत्र घरात ठेवन्याचा आग्रह करतात. पन वस्तुस्थिती पाहिली , तर नुसते श्रीसूक्तचा पाठ करून श्रीयंत्र भेदन होत नाही. एक भव्य दिव्य अस्त्र ज्याला कलियुगा च्या सुरुवातीस श्रापित करून ठेवल आहे ते एक श्रीसुक्ता ने कस जागृत होईल? तस असत तर महाराष्ट्राच्या तिजोरित श्रीयंत्रच ठेवले गेले असते. श्रीयंत्र हे भेदन करून त्यात शक्ति स्थापित करण्याची क्रिया फक्त एक श्रीविद्या साधकच करू शकतो. त्यात दशमुद्रा , 64 उपचार , 94 कला , 9 आवरण ची शास्त्रोक्त पूजन , श्रीयंत्रा चे शापोद्धार , कीलन , सोबत आणखी काही यंत्राची गरज लागते , ही खुप कठिन साधना असते. त्यामुळे श्रीयंत्रा सारख्या उच्चतम शक्तिला वास्तुचा दोष घालवनार आणि नुसत लक्ष्मी प्राप्ति चे साधन असा तकलादु विचार करन सोडून द्यावे.
श्रीमहावतार बाबाजींच्या कृपेमुळे खऱ्या अर्थाने श्रीविद्या पुढे चालवण्याची संधी मिळाली आणि सोबत वैदिक पद्धतीने मंत्रोच्चारा द्वारे करायचा क्रियायोगही मिळाला, ज्याल खड़गवाहना अथवा कलावाहना म्हटले जाते. बऱ्याच वेळा अनेक लोक क्रियायोगात असा प्रश्न विचारतात की क्रियायोग शिकवणाऱ्याला गुरु मानायचे का? मुळात कुठल्याही विद्येला
जिथे ठराविक फी लावली जाते तिथे गुरु शिष्य संबंध आपणच तुटतो. जसे की माझ्या श्रीविद्या साधनेतही फी घेतल्यावर अप्रत्यक्षपणे हे संबंध तुटतात. क्रियायोग शिकवणाऱ्या योगदा अथवा आनंद संघ सारख्या संस्थाही क्रियायोग अल्प फीज मध्ये अथवा विनामूल्य शिकवतात. बरेच लोक क्रियायोग शिकतात, जो एक नाडी शुद्धिकरणाचा आणि प्राणायामाचा एक भाग आहे, तो कुठल्याही योग संस्थेत बेसिक शिकवला जातो.
मुळात क्रियायोग हा कुंडलिनी संबंधित श्वसन क्रिया आहे, ज्यात खूप पुढे प्रगति झाली तरच वरच्या जगाची यात्रा सूक्ष्म शरीराने घडते आणि ” जिंदा मरना सीखना ” इसे ही कहते है । स्वतःचे शरीर स्वतः पाहिले जाते, ज्यात मृत्यु नंतरची अवस्था आपल्याला पहायला मिळते. (माझे मरण पाहिले म्या डोळा) साधक स्वतः वरच्या जगातून ज्ञान समजून घेवू शकतो. आभासिक ब्रह्म आणि अनेकविध लोक लोकांतर, त्यात असणारे सात्विक ते क्रूर आत्म्यांची दुनिया, अनेकविध गुरु लोक, ११ वे द्वार, अष्टम चक्र इ. असे अनेकोनेक विषयांची यात्रा करता येते. अश्या ज्ञानात्मक गोष्टींची क्रियायोगात खऱ्या अर्थाने माहिती मिळते किंवा ज्ञान मिळते त्याला क्रियायोगात गुरु मानायला हरकत नाही. भगव्या वस्त्रांना भुलून चेतना जागृत होत नाही. उच्चतम अध्यात्मात कोणीही गुरु स्वतःला गुरु म्हणवून घेत नाही किंवा शिष्यही करत नाहीत. कारण गुरु बनणे म्हणजे एक शाप चोवीस तास जवळ घेवून सतत शिष्यांच्या मागे रहावे लागते आणि शिष्याने चुका केल्या की त्या कर्मांनाही गुरु जबाबदार होतो. त्यामुळे जुन्या प्राचीन इतिहासात महान गुरुंचे अत्यंत कमी शिष्य असत.

 || Sri Matre Namah ||

Contact us to learn Sri Vidya Sadhna: 09860395985

 Subscribe to our Youtube Channel !!

Join us on Facebook !!

Share

Written by:

213 Posts

View All Posts
Follow Me :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
× How can I help you?