Mahavtar Babaji – सिद्धाश्रम आणि महावतार बाबाजी ११

Mahavtar Babaji – सिद्धाश्रम आणि महावतार बाबाजी ११

?हिमालयातील एक रहस्यमय मठ ….सिद्धाश्रम / ज्ञानगंज (गौरी शंकर पीठम्)भाग :- ११?
।। ॐ क्रिया बाबाजी नमः ।।
।। ॐ क्रिया नागलक्ष्मी माताय नमः ।।
( नारायणी विद्याची माहिती आणि बाबाजीं चे शिष्य मेघनाथ यांची कथा )
Publish ३१/०१/२०१८
नमस्कार मित्रहो , लेखमालेचा ११ वा भाग लिहित आहे. बऱ्याच वेळा अनेक लोकाना फक्त गूढ़ गोष्टि आणि कथानक वाचन्या कड़े ओढा असतो. यात मूळ मुद्द्याचा अभ्यास आणि त्याची अधिक माहिती-ज्ञान मिळवने दूर राहते. महावतार बाबाजी तथा त्यांच्या मार्फ़त आलेल्या गुरुनी क्रिया योगाचा प्रसार ….. आधुनिक युगात करण्याकड़े भर दिला. बरेच लोक क्रिया योगाचा नवीन अभ्यासात्मक गोष्टि शोधन्याच्या मागे असतात , याबद्दल मोजके साहित्य उपलब्ध असल्याने निराशा होते. या लेखात ति उनिव भरून काढण्याचा प्रयत्न तथा क्रिया योगाच्या प्राचीनते बद्दल सामान्य स्वरुपात लिहित आहे. तथा आणखी ही काही गोष्टी संगीतल्या जातील.
【 ही सर्व लेखमाला या वेबसाईट वर वाचू शकता. https://nituuable.wordpress.com. फेसबुक “महावतार बाबाजी परमधाम “या नावे पेज आहे. अन्य मदती साठी 09860395985 या माझ्या नंबर वर फोन करू शकता. 】
ज्यानी या लेखातील महत्वपूर्ण विषयासाठी मदत केली त्यांचे आभार.
परम दिव्यत्वाच्या सर्वाधिक गूढ़ मार्गा वरील भागावर प्रकाश टाकून गुरु परंपरे ची कृपा प्राप्त करण्यासाठी आज आपण प्रार्थना करूया. एक काळी क्रिया योगाला गुरु नारायणी विद्या म्हटल जाई. एखादा साधक कुंडलिनी ची चढ़ाई योग्य मार्गातुन करत असेल आणि तो योग्य मार्गात असेल तर त्याला गुरू मण्डलातील सूक्ष्म शक्ति कडून नेहमीच मार्गदर्शन मिळते. फक्त आपला अभ्यास आणि विचार सचेत हवा. प्रत्येक साधकाच्या आत मध्ये एक सूक्ष्म गुरु चा आवाज असतो. ही ओळखण्याची कला विकसीत करने सर्वच साधनेत आवश्यक असते. आंतर विचार आणि बाह्य विचार यातील फरक येथे अभ्यासायचा असतो. या अवस्थेत काही वेळा आपल्या अंतःकरणा मध्ये अथवा साधकाला मदत करण्यासाठी सृष्टितिल वेगवेगळया शक्ति आणि आत्मे मदत करतात , ही मदत घेण्याची कला साधकाने विकसीत केली पाहिजे.
पुढे ….. क्रिया योगातील दहा नारायणी विद्या पैकी एक मनो नारायणी विद्या आहे. अध्यात्मातिल अनेक रहस्य गुपित ही सगळीच पुस्तकी नोंदित लिहिता येत नाही , तर अशी गुपित ही गुरु कडून शिष्य अश्या वांशिक परंपरे तुन चलत असतात. अर्थात है सगळ्या शिष्याना लागू होत नाही , तर एक गुरु पासून एक शिष्या पर्यंत असे असते. यामध्ये अत्यंत विश्वास तथा शपथे वर व कड़क शिस्त लगते. गुरुच्या जीवनकालात शिष्य त्या विद्येचा अश्या प्रकारे अभ्यास करतो की वैश्विक माता जेव्हा वेळ येते तेव्हा स्वतः ही गुपित शिष्या समोर खुली करते. ही क्रिया अब्जो वर्षा पासून ठराविक गुरु परंपरे मध्ये आहे. म्हणून साधकाला ही योग्य गुरु ची जोड़ असणे याला फार किंमत आहे. मनो नारायणी विद्या काय आहे ? तर कुठल्याही योग क्रियेत अथवा क्रिया योगात मनाला मारण्याचा विचार , गुरु साधकाला सांगतो . पण क्रिया योग म्हणतो , साधना सुरुवात करताना मन-बुद्धि ची वास्तवता स्वीकार करूनच पुढे जा , कारण तो एक व्यवस्थे चा भाग आहे की ज्याला आपण टाळू शकत नाही. हिच तर खरी लढाई आहे. बरेचसे साधक मनाला चुकीच्या भावने तुन भरून टाकतात आणि त्या भावनेलाच पकडून बसतात.
आता एक उदाहरण संगायच तर एकजन बाबाजी न माननारे साधक माझ्या भेटीला आले होते. बोलता बोलता त्यानी एक हल्लीचा प्रसंग सांगीतला , एक गुरु आणि त्याचे शिष्य गाड़ी तुन कुठे तरी जात होते. गाड़ी थांबली आणि प्रथम गुरु खाली उतरले. समोरच्या फुटपाथ वर एक भिखारी चाय पित सिगरेट च झुरका मारत होता. त्याने सिगरेट ची राख चाय मध्ये टाकली आणि तशी चाय पिण्यास सुरुवात केली. या गुरु ने त्या भिकाऱ्या च्या पायाला हात लावुन नमस्कार केला. गुरु ल पाहुन त्याच्या मागे असणाऱ्या त्याच्या शिष्यानी ही त्या भिकार्या ला नमस्कार केला. आता शिष्याना प्रश्न पडला की त्यांच्या गुरुनी एक भिकार्याला नमस्कार का केला ? तर गुरु त्यातल्या एक शिष्याला म्हणाले की , ते बाबाजींच रूप घेवून आले. हे ऐकून बाकीचे शिष्य ही भावनिक झाले की त्यानी बाबाजीं न बघितल. …..असो , मुख्य मुद्दा असा की बाबाजीं न असल्या वेशात येवून स्वतःच वेळ फुकट घालवायची गरजच नाही. मोठ्या शहरा मध्ये गर्दुल्ले नशापत्ती करणारे असतात ज्याना चरसी शब्द आहे , असे लोक नशा वाढवन्यासाठी सिगरेट ची राख नशा देणाऱ्या पेया मध्ये टाकतात , ह्या गोष्टि आजकाल फिल्म्स मध्ये ही दाखवतात. अश्या विषया मध्ये लोकांनी डोळस असाव.
कुठलीही साधना करण्यामध्ये साधकला विचारल्यास की तु साधना कुणाची अन का करत आहेस ? तर क्रिया योगी सांगेल की मि बाबाजीं ची साधना करत आहे , दत्ताची सेवा करणारा सांगेल की मि दत्ताची साधना करत आहे , शिवाची पूजा करणारा मि शिवाची साधना करत आहे असे सांगेल , स्वामींची सेवा करणारा सांगेल मि स्वामींची सेवा करत आहे , श्रीविद्या करणारा सांगेल की मि ललितेची साधना करत आहे , रामाचा जप करणार सांगेल की मि रामाची साधना करत आहे. … अत्यंत कमी साधक असे सांगतात की मि व्यक्तिगत आत्मिक प्रगति साठी प्रयत्न करत आहे आणि त्यासाठी यातून मार्गक्रमण करत आहे.
कुठलीही साधना करताना त्याचे विविध पैलू ही शिकुन घ्यावे लागतात. माती मूर्तिसाठी घोटुन तयार केली आहे , पंण मुर्ती बनवयची कशी हेच माहित नसेल तर ? साधना ही अशीच आहे , ति तयार करावी लागते. एक एक नारायणी विद्या खुप मोठा भाग आहे , येथे फक्त त्याचा थोडासा भाग दिला आहे.

♂ ? आता एक श्रीमहावतार बाबाजीं विषयी ची कथा देत आहे , जी श्रीदत्तात्रेय यांच्या सबंधी असून बाबाजीं च्या एक शिष्याची आहे. मागच्या लेखात मि सांगितले होते की श्रीदत्तात्रेय असो किंवा बाबाजी किंवा स्वामी असो , दृष्टिकोण विस्तारित ठेवा. अध्यात्म हे आपण समजतो तसे नाही. अनेक लोक दत्तात्रेयान ठराविक पोथ्या आणि स्थला पर्यन्त ओळखतात , ते अध्यात्माचे मोठे प्रोफेसर आहेत जिथे साधकाला ही आपली गुणवत्ता सिद्ध करून बसावे लागते. त्यांनी आपल्या शिष्या न ही महत्वाची गुपित देवू केली नाही , तसच त्याना अस कुठल्या साधनेने किंवा कुठल्या मोठ्या परिक्रमा करून मोहात पाडन इतक सोप नाही. ज्ञान आणि साधना संपन्न गुरुला तसेच शिष्य लागतात. त्यामुळे बदलत्या काळात आपलाही दृष्टिकोण बदलन आवश्यक आहे. आधुनिक काळात नवींन शोध तर लागत आहेत आणि माणूस त्या शोधन्चा उपयोग ही करत आहे , मग त्याप्रमाणे माणसाचे विचार मात्र बदलत नाहियेत. मागचा लेख वाचून कुठल्याच तथाकथित व्यक्तिनि प्रयत्न केला नाही की खरच श्रीदत्तात्रेयानी पँचमवेद म्हणून किंवा त्यांनी स्वतःची साधना ही कशा प्रकारे केली. सृष्टि मध्ये अनेक प्रलय येवून गेलेत आणि पुढेहि येतील , ज्यात पृथ्वीचा ही विनाश होईल. राहिल ते फक्त सद्गुरू नीं दिलेल ज्ञान आणि साधने च बळ , … असो पुढील घटना ही रोमांचकारी आहे.
? ही कथा आहे , मेघनाथ यांची … जे बाबाजीं चे शिष्य होते. बाबाजीं नेहमी आपल्या शिष्याना आपल्या तालमित शिकवून पुन्हा जगराहाटी मध्ये पाठवतात. ते अनेक प्रकारे परीक्षा बघतात. मेघनाथ यांची वेळ आली होती , बाबाजीं नि त्याना बोलावले. बाबाजीं म्हणाले , ” 12 वर्षापूर्वी तु हे दीक्षा नाव निवडले आणि मि तुझे दोन अहंकरा मधून मुक्ततता होईल या अपेक्षेने ते मान्य केले. तु बालपना पासून विचार केलास की तु जन्मजात गुरु आहे आणि श्रीदत्तात्रेय यांच अंश आहे. आणि अजुन पर्यन्त यातच तु राहिलास , आता याची पुष्टि करण्याची वेळ आली आहे. तुझ्या तर्कास श्रीदत्तात्रेयान च खरे किंवा खोटे ठरवू देत. की तु खरच त्यांचा अंश आहे का ते , …. आता मि तुला सांगतो की दत्तात्रेय तुला कुठे भेटतील ते.
* सकाळचे वेळीस ते निवडक लोकाना वाराणसी ल भेटतात.
* दुपारची वेळीस ते कोल्हापुर येथे जेवण घेतात आणि काही वेळ उपलब्ध असतात.
* संध्याकाळ पासून ते दुसऱ्या दिवशी सकाळ पर्यन्त ते गिरनार येथे ध्यान व आराम करतात.
* माहुर मध्ये ते भिक्षा घेतात. पंण येथे तुला ते भेटनार नाही कारण येथे एका जागी ते स्थिर नसतात.
प्रथम वरील तीन जागी जा आणि तुला ते भेटतात का बघ. त्याना तुला सांगू दे की तु त्यांचा अंश अवतार आहे. जर ते असे म्हणाले आणि तुझा स्वीकार केला तर पुढील गुपित तुला नक्कीच कळतील. जर तुला त्यानी परत पाठवले तर ते तुझ भाग्यच असेल. ”
बाबाजीं न प्रणाम करून मेघनाथ वाराणसी ल पोचतात. पूर्ण गंगा घाट , रस्ते , स्मशान भूमि , मंदिर पालथी घालतात पंण दत्त त्याना भेटले नाही. काही दिवस ते तिथेच राहिले. मग कण्टाळून पुढे ते कोल्हापुरात आले. देवीच दर्शन घेवून काही दिवस ते तेथेच राहिले. अनेक ठिकाणी त्यानी दत्ताला शोधल , पंण कोल्हापुरात ही ते सापडले नाही. अतिशय जड़ अंतःकरणा ने ते गिरणार च्या जंगलात आले.
आता पर्यन्त त्याना समजले होते की , ते दत्त अवतार असणे हा एक भ्रम आहे. काही दिवस ते गिरनार जंगलात राहिले. … मग एक दिवस पदयात्रा करणाऱ्या भिक्षुकां सोबत ते गिरनार पर्वत चढू लागले. भिक्षुकां च्या समुहात ही त्यांचे हेच चालू होते की ते कसे दत्ताचे अंश अवतार आहे. सगळे जन त्यांच्या बोलन्या कड़े दुर्लक्ष करू लागले , त्यामुळे मेघनाथ खुप दुःखी झाले. गिरणार मंदिर अतिशय जवळ आले होते. भिक्षुक म्हणाले की ‘ तू दत्त असल्याचा भ्रमाच आनंद घे , आम्ही पुढे जातो. ‘
गिरनार ची प्रत्येक पायरी ही दत्ताच्या नावाची आहे. ते मंदिराच्या आवारात पोचले , कुंडात स्नान केले. दत्ताचे दर्शन होत नाही तोपर्यंत त्यानी उपवास करण्याच ठरवले. खुपच कठोर उपवास आणि ध्यान करून ते प्रार्थनेच्या उच्च टोकाला पोचले. काही दिवस असेच गेले.
अखेरिस एक माताजी गिरणार च्या त्या सुंदर प्रदेशातुन चांदीच्या ताटा त पक्वान्न घेवून त्यांच्या समोर उभी राहिली. ति दूसरी तीसरी कुणी नसुन स्वतः ‘ अरुंधति देवी ‘ होती. तिला पाहुन मेघनाथ नी त्याना प्रणाम केला. ति म्हणाली , ” हे मेघनाथ … तुम्ही न आता स्वामी आहात न नाथ आहात. वास्तवात तुम्ही एक मेघा प्रमाणे आहात जो फक्त शंकाचा आहे. हे जेवण स्वीकारा , श्रीदत्तात्रेयानी तुमच्या साठी पाठवल आहे. ”
मेघनाथ रडू लागले. दत्तात्रेयांच्या तोलामोलाची अरुंधती देवीस पाहुन दत्तात्रेयांच भेटण्याचा आनंद झाला. अरुधंती देवीस जाताना मेघनाथ म्हणाले की ‘ तुम्ही दत्तात्रेयांन मला दर्शन देवून माझा भ्रम दूर करण्यास सांगावे. हा माझा निरोप त्याना द्यावा.’
अरुंधती पुढे म्हणाल्या , ” मेघनाथ तु आता या मन्दिरातून निघ. या गिरणार च्या या कुण्डाच्या दुसऱ्या बाजूस जा जेथे एक गुप्त ओदुंबर वृक्ष आहे. ४० दिवस तेथे ध्यान कर . मनाचा विलय कर , जेव्हा ४१ वा दिवस येईल तेव्हा तु आकाशतत्व प्राप्त केले असशील तेव्हा तुला श्रीदत्तात्रेय दर्शन देतील. त्यानी तुला दर्शन देण्याचे वचन दिले आहे. ” एवढे बोलून माताजी चांदीच ताट खाली ठेवून अदृश्य झाली.
मेघनाथ तिथुन त्या ओदुंबर च्या जागेवर निघाले. कठोर ध्याना अवस्थेतुन ते समाधि पर्यन्त पोचले. ४१ वा दिवस आला जिथे त्याना कसलीच जाणीव नव्हती , न मन न बाह्य जग . त्यावेळी एक चैतन्य दिव्य तेज तिथे ☘’ एकमुखी दत्ता ‘☘ च्या स्वरुपात प्रगट झाले. काही क्षणातच ते तेज श्रीमहावतार बाबाजीं च्या रुपात परिवर्तित झाले.
बाबाजी मेघनाथ ल म्हणाले , ” नुसता विचार करून कोणी देव किंवा अवतार बनत नाही. त्यासाठी प्रत्येक आत्म्याल स्वतः परमात्मा चा अंश असल्याची उच्चतम जाणीव हवि . आताही तु मेघनाथ स्वामी आहेस का? ”
त्यावर मेघनाथ म्हणाले , ” मी आता एक अनाम प्रकाश ⚛ आत्मा आहे. हे गुरुंचे गुरू तुम्ही परमात्मा आहात. माझ्या आत्म्यास तुमच्या आत्म्यात विलीन होउ द्या. “??
बाबाजीं म्हणतात , ” आता तुझे मन पूर्णपणे नाहीसे झाले आहे. पुढील मिशन साठी तु योग्य झाला आहेस. तु आता मंगोलिया येथे जा , तेथील लोकांना तुझ्या ज्ञानाने शुद्ध कर. मि तसा पुढील आदेश तुला देत जाईन. ” ?
ही कथा थोडक्यात घेतली आहे. याचा मतीतार्थ विचारात घ्यावा. अन्य लीलामृता सारखे घोकंपट्टी कथा वाचू नए. मनुष्य शरीर हे रॉ हिऱ्या सारखे आहे , त्याला पैलू पाडले तर तोच हीरा चककतो आणि त्याची किंमत वाढते. मग साधकाला ही त्याच्या साधना काळात स्वतःची अंगभूत गुण विकसित करावे लागतात. मग ते नाम साधना असो किंवा योग साधना.
मला अनेक जनांचे फोन व भेटि बाबाजीं च्या निमित्त होत असतात. त्यात असेही लोक असतात की काही जनाना बाबाजीं अथवा दत्तात्रेयानी अथवा तत्सम सत्पुरुषानी भेटून किंवा अन्य प्रकारे काही काही दिलेल असत. अश्या लोकाना वरील कथा उदबोधक् ठरेल.? एखद्या सतगुरु ची पोथी आणि नामस्मरण करने आणि सतगुरु प्रत्यक्ष समोर आल्यावर परीक्षा होने यात फरक आहे.
महावतार बाबाजीं च्या सन्निध्यात शेकडो वर्षात बरेच शिष्य त्या त्या काळात तयार होऊन पुढील मार्गक्रमनेला गेले. बाबाजी त्यांच्या शिष्याच मनाचा सूक्ष्मतम विलय होई पर्यन्त परीक्षा बघतात. त्या परीक्षा एवढ्या सोप्या नसतात. त्यातलीच एक परीक्षा सांगायची तर एखादा शिष्य साधनेच्या उच्च टोकाला पोचला असेल तर ते त्याचा सूक्ष्म अहंकार मापन्या साठी कधी कधी शिष्याला त्या वेळच्या कुंभमेळयात पाठवत असत जिथे अनेक लोक येत असत. ते शिष्याल तेथे जे लोक शौचकर्म आदी करून तसच सोडून जात , ते त्याच्या लांबसडक जेटेने साफ करायला लावत. एक एक शिष्य मनाच अंतिम विलय होई पर्यंत … अहं नष्ट होई पर्यन्त हे करत असे. काही लोकाना हे पटत नसेल पंण ही वास्तविकता आहे.

 || Sri Matre Namah ||

Contact us to learn Sri Vidya Sadhna: 09860395985

 Subscribe to our Youtube Channel !!

Join us on Facebook !!

Share

Written by:

215 Posts

View All Posts
Follow Me :

Leave a Reply

error: Content is protected !!
× How can I help you?