Mahavtar Babaji – सिद्धाश्रम आणि महावतार बाबाजी  २

Mahavtar Babaji – सिद्धाश्रम आणि महावतार बाबाजी २

?हिमालयातील एक रहस्यमयी मठ …. सिद्धाश्रम / ज्ञानगंज (गौरी शंकर पीठ) भाग :- २?
मित्रांनो , मागील लेखात हिमालयातील गूढ़ विषयासंबंधित बऱ्याच गोष्टींची उकल केली. हिमालयात तिबेट परिसरात असणारे गुप्त आश्रम यांच आकर्षण आजही बऱ्याच आध्यात्मिक लोकांना आहे. मागील लेखात काही हजार वर्षापासून कार्यरत असणारे गुप्त आध्यात्मिक आश्रम मठ यांबद्दल माहिती दिली होती ; १)ज्ञानगंज मठ २) सिद्ध विज्ञान आश्रम व ३) योग सिद्धाश्रम . तसे हा सर्व भाग एकाच मठ अधिपत्याखाली येत असावा. या ठिकाणी दीर्घजीवी,कालंजयी योगी आपल्या आत्म शरीर स्वरुपात निवास करतात . हा भाग भारतच नाही तर विश्वातील आध्यात्मिक नियंत्रण तथा मार्गदर्शक म्हणून ही कार्यरत आहे.
म्हणूनच चीनी सेना या प्रदेशात गेली काही वर्ष आक्रमक झालेली दिसते. चीनी सेनेने हा हिमालयाचा बराचसा भाग पिंजून काढला आहे पण हे क्षेत्र ते शोधु शकले नाहीत.
संग्रीला घाटी वरील क्षेत्रात प्रवेश केलेल्या एक योगी साधका चे अनुभव अनुसार–
या दिव्य क्षेत्रात सूर्य चा प्रकाश नाही आणि चंद्राची चांदनी ही नाही. तिथल्या वातावरणात दूधी प्रकाश पसरलेला आहे. हा दिव्य परिसर एक महान योगी च्या इच्छा शक्ति वर वशीभूत आहे. ज्यावेळी योगी साधाकाने एका लामा सोबत या आश्रमात प्रवेश केला तेव्हा त्या महान योग्याची कृति पाहतच राहिलो. की , काही युवती तिथे आल्या . समान वयाच्या , रूप वर्ण ऊँची ने समानता असणाऱ्या. केस खुले असणाऱ्या या युवतिनी रेशिम साडी घातलेली होती आणि गळ्यात स्फटिक माळ . सर्वांच्या चेहऱ्यावर दिव्य तेज होते. त्या युवतीं कड़े बघुन अस वाटत होते की त्या कोणाची वाट पाहत आहेत. थोड्या वेळात एक तेजःपुंज गोळा तिथे प्रगट झाला.प्रकाश पुंज हळू हळू आश्रमात जाऊ लागला आणि युवती त्या मागोमाग चलत होत्या. सोबत असणाऱ्या लामा ला विचारले तेव्हा तो म्हणाला की , हा तेजःपुंज दिव्य रूप धारण करणारा प्रकाश म्हणजे आत्म शरीर आहे. उच्च योगी साधकांचे आत्म शरीर हे असेच असते. या युवती म्हणजे योग कन्या आहेत. किती तरी जन्म साधना तप केल्या वर त्यांना ही अवस्था प्राप्त झाली आहे. योगामध्ये यालाच कैवल्य अवस्था म्हणतात. हे सर्व आत्मशरिर धारिणी आहेत. फक्त विषेश कार्य प्रसंगी यानी ही आपली भौतिक रचना केली आहे. आत्म शरीर प्राप्त योगात्मा आपल्या इच्छे नुसार कधिही भौतिक देहाचि रचना करू शकतात………………. असे अनुभव तुमाला काही उत्तम साधकांच्या पुस्तकात अथवा तोंडुन ऐकायला मिळतील . पण आजकाल बरेच जन या घटनांचा संबंध् स्वतशी लावून जनतेत आपल स्थान मिळवू पाहतात.
असो , बरेच वर्षापासून या भागाबद्दल चिनला माहिती होती. की हा भाग सिद्ध लामा ,तांत्रिक ,योगि यांचे केंद्र आहे. चीन एका लामा चा पाठलाग करत या क्षेत्रात घुसला होता पण लामा ज्या ठिकाणी गायब झाला तेव्हा तिथे चीनने आक्रमण केले. चीनने आजही या भागावर आपला जम बसवला आहे पण या ठिकाणी असणारे ते दिव्य आश्रम मठ त्यांच्या दृष्टिस पडले नाहीत. म्हणून च आज चीन अरुणाचल प्रदेश वगरेचा भाग आपला सांगत आहे.
या दिव्य रहस्यमयी वाटणाऱ्या आश्रमा मध्ये …. जे ज्ञानगंज , सिद्धाश्रम या नावाने प्रचलित आहेत. तिथे अनेक प्रकारचे विषय शिकवले जातात , जसे सूर्य विज्ञान, चन्द्र विज्ञान, नक्षत्र विज्ञान, वायु विज्ञान, ज्योतिष, आयुर्वेद, हठयोग, ध्यान योग आदि . याच प्रकारे काही विषयांचे ज्ञान प्रयोगात्मक रुपाने दिले जाते. येथील विज्ञान आपल्या आजच्या विज्ञानापेक्षा शेकडो वर्ष पुढे आहे. स्वामी विशुद्धानंद जी यांच्या पुस्तकातुन याबद्दल तुमाला आणखी माहिती मिळेल च.
या दिव्य आश्रमातील, हे सिद्ध पुरुष संसार जीवनातील योग्य व्यक्ति शोधून ,….. बऱ्याच वेळा हे त्यांचेच पुर्नजन्म घेतलेले शिष्य असतात , त्यांना शोधून स्वतकडे आनतात व योग्य शिक्षा देवून पुन्हा सांसारिक जीवनात त्यांना जनकल्याणास जाण्यास सांगतात .
एक घटना प्रसिद्ध आहे . ती अशी की , याच ज्ञानगंज आश्रमात दीक्षाज्ञान मिळालेले स्वामी विशुद्धानंद एकदा पुरुलिया (बंगाल) स्थित आश्रमात आपल्या शिषयांसमोर सूर्य विज्ञान चे रहस्य समजावून सांगत होते. या विद्येच्या माध्यमातून कोणत्याही वस्तु चे निर्माण संभव आहे. स्वामी विशुद्धानंद जी हे सांगत असताना अचानक आसना वरुन गायब होतात. उपस्थित शिष्य ते पाहुन आश्चर्य चकित झाले. त्यांचा या गोष्टीवर विश्वास बसेना की ईथे अनेक जन असताना ही घटना होत आहे , हा भ्रम असू शकत नाही. सर्वजन त्यांच्या येन्याचे वाट पाहत होते. तासभर झाल्यावर ते पुनः आपल्या आसनावर प्रगट झाले. आल्यावर त्यानी आपल्या शिष्याना सांगितले की , तिबेट मध्ये असणाऱ्या हिमालय स्थित आश्रम ज्ञानगंज येथून एक महत्वाचा सन्देश आला होता , त्यामुळे न सांगता जावे लागले. तर विषय असा की योग विज्ञान मध्ये असंभव अस काही नाही पण पदार्थ विज्ञान या गोष्टी मान्य करायला तयार नसते.
ज्ञानगंज या दिव्य आश्रमा बद्दल एक सांगली स्थित योगी काकासाई सांगतात , …….काकासाई याना सूक्ष्म शरीरधारी दोन अज्ञात महात्मा आले आणि त्यांना सूक्ष्म देहाने ज्ञानगंज येथे घेवून गेले. तिबेट मध्ये असणारी ही दिव्य गुप्त योगभूमी जिथे जनसामान्य ज्यांची चेतना विकसित नसल्याने तिथे पोहोचु शकत नाहीत. तिथे उन्नत स्तर चे योगी साधक स्थूल सूक्ष्म रुपात राहतात. ज्ञानगंज आश्रमाचे अस्तित्व हे तिन स्तरावर आहे – आधिभौतिक, अधिवैदिक और आध्यात्मिक. येथील महात्मा हे तीन स्तरावर राहतात पण तिथे जो महात्मा स्थूल शरीर मध्ये पण रहतो तो सूक्ष्म, कारण, महाकारण तीन स्तरावरची गतिमानता ठेवतो. आणि सूक्ष्म मध्ये राहनारे महात्मा स्थूल मध्ये प्रकट होण्याची क्षमता ठेवणारे असतात. तिथे संवादासाठी शब्द अथवा वाणी ची गरज नाही. शब्द आणि वाणी फक्त वैखरी पर्यन्त असतात. मध्यमा , पयशन्ति , परा या मध्ये भाव तरंग माध्यमातून तिथे संवाद केला जातो. ज्ञानगंज मध्ये कोणी महापुरुष दृष्टी टाकून जरी पाहू लागला तरी शरीरात काही उतरत असल्याची जाणीव होते.
भौतिक जगात जे वैज्ञानिक प्रयोग शोध लावले जातात ते सर्व त्रिआयाम पर्यन्तच मर्यादित आहेत. व त्यांना देश काल पदार्थ यांची मर्यादा आहे. वास्तवात ज्ञानगंज मध्ये असणारे विज्ञान हे आजच्या विज्ञान पेक्षा कैक पटीने पुढे आहे आणि विशेष म्हणजे चौथ्या आयाम पेक्षा ही अधिक स्तरावर कार्यरत आहे. आजचे विज्ञान परमाणु पासून ऊर्जा बनवायला शिकली पण उर्जे पासून परमाणु नाही बनवु शकत. ज्ञानगंज मध्ये सूर्य विज्ञान , चंद्र विज्ञान अत्यंत प्रगत आहे. सूर्य विज्ञान नुसार सर्व तत्व ही सूर्य किरणांमध्ये आहेत. सूर्य किरणांच्या अनुपातास बदलून कुठल्याही वस्तुस दुसऱ्या वस्तुत रूपांतर केले जाऊ शकते. गुलाबास गोंडा बनवला जाऊ शकतो तर गोंडयास गुलाब बनवले जाऊ शकते. सूर्य किरणाना एकत्रित करून शून्यतुन वस्तु तयार केल्या जाऊ शकतात. आपल्या काळात जे सिद्ध पुरूष, संत और महात्मा आता स्थूल रूपातुन शांत झाले आहेत , ते सर्व सूक्ष्म रूपातुन ज्ञानगंज मध्ये आजही विद्यमान आहेत. जसे शिर्डी चे साईं बाबा, संत ज्ञानेश्वर त्यांचे दादा गुरू श्री गहनीनाथ , गुरू मुक्तानन्द, दादा गुरू भगवान नित्यानन्द, स्वामी महातपाजी , त्रैलंग स्वामी आदि. हे सर्व वेळेनुसार श्रद्धाळु साधकां दर्शन देतात , परमाध्यमा मार्फत त्यांची मदत करतात आणि आध्यात्मिक व्यक्तिना लोक कल्याण साठी प्रेरित करतात.
……………..।। ॐ गुरुभ्यो नमः ।।

 || Sri Matre Namah ||

Contact us to learn Sri Vidya Sadhna: 09860395985

 Subscribe to our Youtube Channel !!

Join us on Facebook !!

Share

Written by:

213 Posts

View All Posts
Follow Me :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
× How can I help you?