?हिमालयातील एक रहस्यमयी मठ …सिद्धाश्रम / ज्ञानगंज(गौरी शंकर पीठ)भाग :३?
मित्रांनो , मागील लेखात आपन हिमालयस्थित गुप्त आश्रमातील काही महत्वाचे विषय वाचले असतील. सूर्य विज्ञान आणि चंद्र विज्ञान यांचे महत्व आणि या गुप्त स्थानाचे दिव्य वातावरण ……..सर्वच गोष्टी सामान्य माणसास मोहून टाकनारे असले तरी एखाद्या आध्यात्मिक साधकास त्याची आध्यात्मिक उत्कटता तितकीच वाढवनारी आहे. दोन लेखा नंतर पुढे सिद्धाश्रम, ज्ञानगंज आणि गौरी शंकर पीठ ही एकच स्थूल पण सूक्ष्म असणाऱ्या दिव्य मठां बद्दल वेगवेगळी माहिती लिहित आहे. या स्थानचे वर्णन करण्याची आमची पात्रता नाही , तथापि सर्वसामान्य लोकांना ही ही दिव्य स्थाने समजावीत आणि बाबाजींच्या कार्याशी अध्यात्मिक दृष्टया सर्वसामान्य लोक जोडले जावेत हीच इच्छा.
या दोन लेखातून आपन जे रहस्यमयी मठ… सिद्धाश्रम , ज्ञानगंज याबद्दल जे वाचले याचे मुख्य अधिपत्य बाबाजींकड़े आहे असे मानले जाते. बाबाजी म्हणजे महावतार बाबाजी असे सगळीकडे वाचायला मिळेल. पण महावतार हे एक त्यांना त्यांच्या भक्ताने दिलेले नाव आहे , त्यांचे सर्व शिष्यगण हे त्यांना बाबाजीच म्हणतात. तत्पूर्वी सिद्धाश्रम ज्ञानगंज च्या दिव्य वातावरना विषयी आणखी माहिती देत आहे. सिद्धाश्रम , ज्ञानगंज , गौरीशंकर पीठ , शाम्बाला असे दिव्य मठ हिमालयाच्या तिब्बत परिक्षेत्रात गुप्त स्वरुपात आजही असून त्यात हजारो वर्ष आयु असलेले कालन्जयी दिव्य योगी तथा योगिनी विराजमान आहेत. सिद्धाश्रम चे वर्णन करताना एक योगी लिहितात , सिद्धाश्रम एक अत्यंत उच्चकोटि चा अत्यन्त सिद्ध आश्रम आहे जो काही वर्ग किलोमीटर मध्ये पसरलेला आहे. याच्या एक बाजूला कैलाश मानसरोवर व दूसऱ्या बाजूला ब्रहम सरोवर आहे आणि तीसऱ्या बाजूला विष्णुतीर्थ आहे. या तीन पुण्य स्थळांच्या मध्ये हा सिद्धाश्रम स्थित आहे. महावतार बाबाजी ज्यांची आयु हजारो-हजारों वर्षो आहे आणि जे समस्त गुरुचे गुरु आहेत ते या श्रेष्ठतम आश्रम चे संस्थापक, संचालक एवं नियंता आहेत. सिद्धाश्रम च्या चारही बाजूला दिव्य स्फटिक शिला बघायला मिळतात , ज्यावर हजारों वर्ष आयु चे योगी साधनारत एवं समाधिस्थ आहेत. तेथे प्रत्येक ठिकाणी दिव्य कल्पवृक्ष बघायला मिळतात.
सिद्धाश्रम मधील सर्वात अधिक आकर्षणाच केन्द्र आहे ते म्हणजे सिद्धयोग झरा. काही कि०मी० विस्तारलेली हा अद्भूत झरा कायाकल्प गुणानी युक्त आहे. ८० वर्षाचा व्यक्ति जर यात स्नान करेल तर तो सौन्दर्यानी परिपूर्ण कामदेव समान होईल , त्याचे सारे मानसिक एवं दैहिक क्लेश समाप्त होवून जातील आणि तो पूर्ण आरोग्यास प्राप्त होतो . या झऱ्यामध्ये काही स्फटिक नौका आहेत ज्यात साधक जन तथा देवागना विहार करताना दिसतात.
वास्तवात सिद्धाश्रम काळावर मात केलेला कालजयी आश्रम आहे. इथे न रात्री न सकाळ होते फक्त वातावरण सदैव वसन्त ऋतु सारखे असते. आणि शीतल चांदनी चा प्रकाश असतो. येथील योगी पुरुषांच्या शरीरातून जो दिव्य प्रकाश बाहेर पडतो त्याने परिसर उजळून निघतो. या दिव्य तपोभूमित अनेक काळापासून अनेक दिव्य योगी विराजमान आहेत.
सिद्धाश्रम वास्तवात या ब्रम्हांडाचा चेतनाबिंदु आहे. अभ्यात्मिक जीवनातील भल्या भल्या साधकानाही सिद्धाश्रम दर्शन दुर्लभ आहे. या दिव्य भागात प्रवेश करण्याच्या तीन कसोटी आहेत अस मानले जाते. प्रथम व्यक्तिने दस महाविद्या मधील चार महाविद्या सिद्ध केलेली असावी. अथवा साधकाने षटचक्र भेदन करुन सहस्रार मध्ये कुण्डलिनी ला अवस्थित केले आहे. अथवा तीसरा मार्ग आहे , श्रेष्ठतम सद्गुरु च्या कृपेणे सिद्धाश्रम जाणे. पण कोणीही सन्यासी गुरु हे करू शकत नाही . हरिद्वार, इलाहाबाद, वाराणसी मध्ये बसलेले मठादिश पीठाधीश आपल्या शिष्याला येथे घेवून जाऊ शकत नाही. त्यासाठी स्वामी विशुद्धानंद जी सारखे खरे सात्विक दिव्य पुरुष हवेत. शिष्याला असेच सद्गुरु सिद्धाश्रम मध्ये घेवून जाऊ शकतात जे स्वतः सिद्धाश्रम परम्परे सोबत जोडलेल आहेत. जे सिद्धाश्रम सशरीर गेले आहेत ते तिथून परत ही आले आहेत.
हिमालयातील या दिव्य मठांमध्ये कालचक्राला ही काही क्षण थांबवन्याची क्षमता असलेले योगी तपस्यालीन आहेत. या सर्व गोष्टी वाचून प्रत्येक सामान्य मनुष्याला आश्चर्य वाटेल की हे कस शक्य आहे? ही थोड़ीच एका जन्माची पुण्याई आहे. अनंत जन्म …….घ्यावे लागतात . आणि आज या घोर कलियुगात मनुष्य आपला देह क्षुल्लक गोष्टींमध्ये फुकट घालवत आहे. या सर्व दिव्य शक्तींचे रहस्य आपल्या कुंडलिनी जागरणावर आहे. या भूमिवर अनेक योगी साधकानि जन्म घेतला . बऱ्याच अश्या योगिनां मार्गदर्शक अशी शक्ति असते किंवा त्यांचा दिव्य असा गुरु ही असतो. जो त्या साधकाला जन्म घेण्यास भाग ही पडतो आणि तिथे मार्गदर्शक बनून आध्यात्मिक मार्ग ही दाखवतो. असे अनेक योगी झालेत ज्याना या सिद्धपीठातील गुरुंकडून मार्गदर्शन लाभले आहे.
सिद्धाश्रम शी तुमची भेट या लेखा मार्फत घडवून दिल्यावर एक आणखी दिव्य गोष्टी समोर आनाविशी वाटते. बाबाजी ना …….. नागराज बाबा ही म्हणतात आणि तुमी त्यांचे फ़ोटो पाहिले तर त्यांच्या सोबत नाग ही दिसतो. खर तर सर्प आणि या आपल्या पृथ्वीचा जूना संबंध आहे. बऱ्याच लोकांचा विश्वास बसणार नाही पण हे सत्य आहे. ” हिमालयवासी गुरुंच्या सहवासात ” या श्री. एम् यांच्या पुस्तकात याचा उल्लेख मिळेल. श्री एम् जेव्हा आपले गुरु महेश्वरानंद जी यांच्यासोबत हिमालयात आपल्या आध्यात्मिक शिक्षणकाळात सोबत होते . तेव्हा ही गुरु शिष्य जोड़ी एकदा अरुंधती गुफेत राहायला आली . तिसऱ्या दिवशी श्री एम् झोपलेले असताना मध्यरात्री अचानक वादळी आवाज झाला . त्यांचे गुरु समोरच बसले होते. अवकाशातून एक तेजस्वी गोळा त्यांच्या गुफेसमोर आला. तो गोळा दुभंगुन त्यातून एक भला मोठा फणा असलेला सर्प अवतीर्ण झाला. त्या सर्पाने गुरुंच्या पायाला फण्याने स्पर्श केला. महेश्वरानंद जी आणि तो सर्प …..सर्प भाषेत काही बोलत होते. बोलण झाल्यावर तो सर्प पुन्हा तेजस्वी गोळा होवून अवकाशात निघुन गेला. श्री. एम् यानी त्यांच्या दोघंबद्दल झालेल्या चर्चे बद्दल जेव्हा गुरुना विचारले तेव्हा …..श्री एम् ही चकित झाले. त्या सर्पाचे नाव अनंत असे होते. जशी आपली सौरमाला आहे तशीच एक सौरमाला आहे , तिथे ७ ग्रह आणि १५ चंद्र आहेत. त्यात एक ग्रह आहे त्याला नागलोक म्हटले जाते. त्या ग्रहावर अत्यंत प्रगत अशी नाग जात आहे. अनंत हा नाग त्याला पाच फणा आहेत , तिथला प्रमुख राजा आहे आणि भारतीय पुराणात याचा नावाचा उल्लेख ही आहे. अनेक पुरातन संस्कृति मध्ये नागपुजेस महत्वाचे स्थान आहे. कित्येक हजारो वर्षा पासून ज्यावेळी मनुष्य अप्रगत अवस्थेत होता त्यावेळ पासून ही सर्पजात आपल्या भूमिवर येत आहे.मनुष्याला या नागजातीने ज्ञान बुद्धि दिली नवीन गोष्टी शिकवल्या पण शेवटी मनुष्य जातीने उन्मत्त होवून या सर्पाची हत्या करायला सुरुवात केली आणि एक दिवस सर्पराजाने सर्व सर्पाना या भूमीवरुन नागलोकात बोलवले , काही सर्प होते की त्यांना वाटले आपन मनुष्य जातीत बदल घडवू ते सर्प पृथ्वी वरच राहिले. त्यानंतर पुन्हा मनुष्य जात ही या सर्प जातिविना प्रगति मध्ये कमी पडू लागली. आणि नागलोकाने पृथ्वीशी संबंध तोड़ला. त्यामुळे पृथ्वी वरील सर्प ही तेजहीन झाले आणि आज जे आपन सर्प बघतो ते म्हणजे त्यांच्याच राहिलेल्या पिढ्या. तर अनंत नाग हा स्वामी महेश्वरनंदाना महावतार बाबाजींच्या आदेशानुसार काही सल्लयासाठी आला होता. तुमाला माहीत असेल , साईं चरित्र वाचताना तुमाला वाचनात येईल की एकदा साईबाबा ३ दिवस आपला देह ठेवून मृतावस्थेत गेले होते. पण ते नेमके कुठे गेले होते? तर साईबाबा हे सूक्ष्म देहाने याच नागलोकात त्यांचा काही वाद मिटवण्यासाठी गेले होते. तो वाद न मिटल्याने अनंत नाग पुन्हा बाबाजीना भेटायला आला. या दोन्ही घटनांमध्ये शंभर वर्षाचे अंतर असेल.
तर मित्रांनो , आपन लोक सामान्य मनुष्य म्हणून जगतो पण या घोर कलियुगात मनुष्य कुठे वाहत चलला आहे आपन पाहत आहातच. वाळवन्टात पाणी दुर्मिळ असत तस कलियुगात खर आध्यत्म आणि योग्य गुरु लाभन दुर्मिळ झाल आहे. बरेच ठिकाणी भंपक महाराज साधू ची मांदियाली दिसते. बाबाजीं नी दिलेला क्रिया योग हा मनुष्य जातिस संजीवनी आहे. आत्मिक अनुभुति अनुभवन्यासाठी क्रिया योगाची तीव्र गरज आहे. भारतात क्रिया योग शिक्षण देणारे दीक्षा देणारे आश्रम आहेत , सर्वानी या योग साधनेचा लाभ घ्यावा.
बाबाजींच्या कृपेने तीसरा लेख पूर्ण करताना आनंद होत आहे. अजुन गौरी शंकर पीठ , ज्ञानगंज या दिव्य आश्रमाबद्दल ही खुप दिव्य माहिती पुढील लेखांमार्फत तुमच्या पर्यन्त पोचवनार आहे.
।। ॐ गुरुभ्यो नमः ।।
|| Sri Matre Namah ||
Contact us to learn Sri Vidya Sadhna: 09860395985
Subscribe to our Youtube Channel !!
Join us on Facebook !!