Mahavtar Babaji – सिद्धाश्रम आणि महावतार बाबाजी ४

Mahavtar Babaji – सिद्धाश्रम आणि महावतार बाबाजी ४

?हिमालयातील एक रहस्यमयी मठ …. सिद्धाश्रम / ज्ञानगंज (गौरी शंकर पीठम्) भाग :- ४?
।। ॐ क्रिया बाबजी नमः ।। ।। ॐ क्रिया नागलक्ष्मी माताय नमः ।।
पृथ्वीवरील सिद्धभूमींची अन् त्यायोगे आपल्या ब्रम्हांडाचे मुख्य आध्यात्मिक गुरु महावतार बाबाजी यांची माहिती तुमच्या पर्यन्त पोहोचवताना आनंद होत आहे. लेखाचे तिन भाग पूर्ण झाल्यावर आज चौथा भाग सादर करत आहे. मुळात लेख वाचून अंतिम फलित काय? ……..तर “क्रिया योग” ……….मनुष्य देह अत्यंत दुर्लभ अतः देह अभावि आत्म्यास ईश्वरीय पूर्णत्व लाभु शकत नाही. ८४ लक्ष योनि भेदन करून हा मनुष्य देह प्राप्त होतो. आज कलियुगाचा स्तर वाढत आहे तसे कलियुगात माया तत्व ही तितक्याच प्रमाणात वाढत आहे. आज च्या आधुनिक युगात आध्यत्मिक गोष्टी-साधने-अद्ययावत ग्रंथ-योग-दीक्षा पद्धति ई. ज्ञान लोकांपर्यन्त पूर्वीपेक्षा जलद पोचल्या आहेत आणि त्याप्रमानात अधिकच विज्ञानवाद वाढत असला तरी अनेक लोक अध्यत्माकडे वळत आहेत. मग इतके असूनही कुंभमेळ्या सारख्या पवित्र स्नान पर्वास दिव्य सत्पुरुष , भैरवीगण याना पक्षांची रूप का घेवून यावी लागतात? ……आध्यत्मिक साधनांत जशी प्रगती झाली तशी काही लोक असे निर्माण झाले जे भगव्या वस्त्राखाली माया गोळा करू लागले , त्यामुळे आत्मानुभूती हया लेबल खाली अनेक चुकीचे आश्रम / मठादिश प्रस्थ करू लागले. ……….यातही असे लोक आहेत ज्याना खर आध्यत्म धारण करून आत्मानुभूती मिळवायची आहे. बाबाजींना कदाचित हा भविष्यकाल पूर्वीच दिसला असावा . क्रियायोग हे मानवाची उत्क्रांती जलद घडवून आनन्याचे साधन आहे असे युक्तेश्वर गिरी सांगतात. दरोरोज साडेआठ तासांत एकहजार क्रिया करणाऱ्या योग्यास एकाच दिवसात तितकी प्रगति प्राप्त होते , जी मिळवण्यास साध्या माणसाला १०००वर्ष लागतात. या हिशोबानुसार अशा योग्यास एका वर्षात ३६५००० वर्षांची उत्क्रांतावस्था प्राप्त होते. तिन वर्षाच्या तीव्र क्रियायोग साधनेने क्रियायोग्यास ती परीणतावस्था मिळते , जिला नैसर्गिक गती नुसार दशलक्ष वर्ष लागतात. ( योगी कथामृत संदर्भ) इतका महत्वाचा आहे क्रिया योग. त्यामुळेच श्री.एम् (हिमालयवासी गुरु..लेखक) यानी आपले गुरु श्री. महेश्वरानंद यांच्याशी हट्ट धरून याचे नियम शिथिल करून घेतलेे आणि यात बाबजीनी मध्यस्थी केली होती. असो , आजचा लेखाचा विषय आहे ” गौरी-शंकर पीठ “………..
तत्पूर्वी एक सांगन महत्वाच वाटत. ही लेख श्रृंखला पुढेही वाढत जाईल पण मागील जे तिन लेख तुमच्या पर्यन्त पोचले त्यात आलेले अनुभव सांगत आहे. हे लेख बाबाजींचे जे साहित्य भेटले , अनुभवी व्यक्ति आणि माझे गुरुबंधु (स्वामी विशुद्धानंद त्यांचे आजेगुरु ) आणि माझी आध्यात्मिक मानस बहिन यांचे एकत्रित फलित आहे. बाबाजी आणि क्रिया योग शास्त्र मराठी लोकांपर्यन्त पोचावे हा प्रयत्न आहे. ही लेखमाला सुरु केल्यावर अनेक लोकांचे फोन , मेसेज आले …बऱ्याच लोकांना ही नवीन माहिती मिळाली , काहीजण या परंपरेशी काही वर्ष तुटले होते ते पुन्हा यामुळे जुळले गेले , बरेच जन क्रिया योग शास्त्रा कड़े वळले. यात असे काही वाईट अनुभव आले की काही व्यक्तिनी ही लेखमाला संकलित करण्याऱ्या लेखकाचे नाव काढून स्वतःची नाव टाकली. मुळात लेखकाची आवश्यकता काय? तर बऱ्याच वेळा अनेक प्रश्न लेख वाचताना लोकांच्या मनात येवू शकतात , काही लोकांना क्रिया योग कुठे घ्यावा किंवा कोणती पुस्तक वाचावी असे प्रश्न पडतात….त्यामुळे लेखाकाची आवश्यकता असते. मित्रांनो , अशी काही अड़चन आल्यास मला संपर्क करू शकता (निवृत्ती उबाळे. कणकवली 9860395985) बाबाजींच्या कृपेने जमेल तितकी मदत करेन. हे लेख एकत्रित करण्यासाठी जी बाबाजींनी बुद्धि दिली यासाठी कोटि कोटि धन्यवाद बाबजी. यापुढे हे लेख हिंदी मधून पूर्ण भारतात पोचवन्याचा मानस आहे.
हिमालय स्थित जे गुप्त योगाश्रम आहेत त्यापैकी हा श्री बाबाजींचा आश्रम “गौरी शंकर पीठम्” , याचे वर्णन नीलकंठन यानी केले आहे.(रामय्या में-१९५४) ऑक्टो. १९५३ महिन्याच्या सुमारास त्यांना दोन वेळा तेथे जाण्याचा प्रसङ्ग आला. बद्रीनाथाच्या वर पहाड़ी परिसरात गुप्त स्वरुपात हा आश्रम आहे. त्यात ज्या अनेक गुफा आहेत त्यात सर्वात मोठी गुफा हा बाबाजींची आहे. या गुफेच्या कोपऱ्यात दोन धबधबे आहते. या आश्रमातील १४ रहिवासी मोठ्या धबधब्याचा उपयोग स्ननासाठी करतात आणि लहान धबधब्याच्या उपयोग पिण्यासाठी करतात. यांचे पुढे झऱ्यात रूपांतर होते. येथे दिव्यांची सोय नसली तरी येथील दिव्य योग्यांच्या तेजस्वी प्रकाशाने हा भाग नेहमी प्रकाशमान असतो. सिद्धपीठाच्या मुख्य योग्याची एक गूढ़ शक्ति असते जी नेहमी त्या क्षेत्राचे रक्षण करते किंवा तिथे कोणास येण्यास प्रतिबंध करते. अर्थात बाबाजींच्या परवानगी शिवाय तिथे कोणी येवू शकत नाही. नीलकंठन यानी पुढे वर्णन केले आहे , १४ आश्रमवासी बाबाजींच्या गुफेसमोर वर्तुळाकार जेवण करत आहेत. बाबाजींनी फिक्कट लाल रंगाचे धोतर घातले होते आणि इतरानी सफेद वस्त्र घातले होते. त्या आश्रम वासियांमध्ये बाबाजींची चुलत बहिन म्हणजे “माता नागलक्ष्मी देवीयार(अन्नाई)” ही सुद्धा होती. त्यांनी हिरव्या काठाची सफेद सूती साडी परिधान केलि होती. शरीर सडपातळ असूनही त्या भावापेक्षा उंच होत्या. त्या आश्रमाची मुख्य व्यवस्था पहान्याची जबाबदारी माता अन्नाई ची होती. आश्रमात साधे शाकाहारी जेवण जे योगपद्धतिला अनुसरुण असेल असे तयार होई. पीठाच्या उंचभागी असलेल्या तुळशीची त्या ख़ास काळजी घेत. त्या श्री कृष्ण भक्त असल्याने तुळशीची ख़ास काळजी घेत. माता अन्नाई चा आवडती पूजा म्हणजे तिचे गुरु बाबाजींची गुरुपादपूजा. आश्रमात राहणाऱ्या कित्येक योग्यांच्या दाढ्या अगदी नाभी पर्यन्त वाढलेल्या आहेत. त्यात एका मुस्लिम राज्यकर्त्याचा ही समावेश आहे. यात प्रणवानन्द जी यांचा ही यात समावेश आहे. स्वामी प्रणवानन्द यानी पूर्वजन्मात आपल्या शिषयांसमोर महासमाधि घेतली होती आणि मग त्यांचा पुन्हा जन्म झाला तेव्हा तरुणपणातच त्यांना बाबाजींशी असलेला पूर्वसंबंध आठवला. अनेक वर्ष बाबाजींच्या मार्गदर्शनाखाली क्रियायोगाची खडतर साधना करून एक दुर्मिळ अवस्था प्राप्त करून घेतली जिला “सौरभ समाधि” म्हणतात. बाबाजींच्या शिष्यापैकी माता अन्नाई आणि स्वामी प्रणवानन्द यानाच् ही अवस्था प्राप्त झाली आहे. नीलकंठन यांच्या वर्णनानुसार पहाटे चार ला प्रत्येक जन उठतात. प्राणायाम , ध्यान , मंत्र आणि भक्तियोग यांचा नैमित्तिक कार्यात समावेश असतो. बाबाजींचे प्रेमळ व्यक्तिमत्व , उदार नम्र विनोदी स्वभाव आणि संपूर्ण विश्वाबद्दलची अनुकंपा यानी सर्वांची मने जिंकली आहेत. संध्याकाळी सर्व आश्रमवासी वर्तुळाकार बसतात आणि बाबाजींच्या गुफेसमोर असलेल्या मोठ्या होमाग्नी पुढे मंत्र पठन करतात. त्यांचा आवडता मंत्र म्हणजे , ।। ॐ क्रिया बाबाजी नमः ॐ ।। .(क्रियायोग परंपरे चे १८ सिद्ध…..)
गौरी शंकर पीठम् हा दिव्य आश्रम हिमलयातच आहे अस नाही , क्रियायोग्याच्या प्रत्येक साधकाच्या , बाबाजींच्या निष्ठावान भक्ताच्या हृदयात त्याचे स्थान आहे. बाबाजींच्या भगिनी च्या बाबतीत एक घटना योगी कथामृत या पुस्तकात आहे. श्री राम गोपाल मुजुमदार हे नेहमी लाहिरी महाशय यांच्या पायाशी बसत . वाराणसी मध्ये असताना मध्यरात्री वेळेस लाहिरी जीनी राम यांस दशाश्वमेध घाटावर जाण्यास तात्काळ भाग पाडले. ते तात्काळ त्या स्थानी गेले. तर ……..एक मोठी शिळा हळूहळू वर येत होती आणि तीच्या खाली एक भुयारी गुफा होती. त्या गुफेतुन एक सौम्य तेजोवलय असलेली दिव्य स्त्री हवेत अधांतरी येवू लागली . तिने राम याना सांगितले की ती बाबाजींची बहिन आहे , काही महत्वाच्या गोष्टीसाठी तुला बोलवले आहे. तितक्यात अवकशातून एक तेजःपुंज प्रकाश तिथे येतो , ते म्हणजे बाबाजी. हा प्रसङ्ग तुमाला योगी कथामृत मध्ये वाचायला मिळेल. ………….. असाच एक आणखी प्रसङ्ग , श्री. एम् यांच्या (हिमालयवासी गुरुच्या…) या आत्मकथनात आहे . हिमालयात प्रवास करताना त्यांचे गुरु श्री महेश्वरानंद जी यांच्या सोबत एका गुफेत असताना , एक रात्री शुभ्र वस्त्र परिधान केलेली एक स्त्री , जिचे केस काळेभोर लांब होते . श्री महेश्वरानंद जी आणि श्री. एम् यानी तीला वाकुन नमस्कार केला. तीच्या बाबत श्री महेश्वरानंद जीनी श्री. एम् याना सांगितले की , या श्री बाबाजींच्या भगिनी आहेत आणि यांचे दर्शन ही दुर्मिळ असे आहे. ……… मित्रहो , या माते विषयी आणखी लिहन्याचे प्रयोजन की , ही एक अध्यात्मात उन्नत अशी दिव्य योगिनी आहे , आणि अस म्हटल जात की बाबाजींना पुढील विश्वच्या आध्यात्मिक कार्यासाठी थांबवन्यात तीचा मुख्य हात आहे. त्यामुळे तिची माहिती तुम्हास अधिक व्हावी ही इच्छा.
हा लेख लिहित असताना , माझ्या मानस बहिनी चा बऱ्याच दिवसांनी फोनवर संपर्क झाला. ती आध्यत्मिक उच्च साधक असल्याने तीच्या कडून मला बरेच गूढ़ गोष्टींची उकल आणि मार्गदर्शन ही मिळत असते. तीला या लेखा बद्दल मी जेव्हा सांगितले तेव्हा तिच्याकडून काही आध्यात्मिक विषय समजले त्यातील हा एक विषय संगावासा वाटतो. बाबाजी नी मैसूर मधील एका व्यक्तीला दृष्टांत देवून गांधारी च मंदीर बंधायला संगीतले आहे आणि हे मन्दिर गुप्त पणे बांधन्याचा आदेश दिला आहे जेनेकरुण अन्य कोणता अडथळा ते मन्दिर बांधण्यात येवू नए . श्री कृष्णास महाभारतात जो शाप मिळाला होता त्याच्या निराकारणासाठी त्याला मैसूर ला जाण्यास सांगितले होते. आणि तेथेच श्री कृष्णाचा मृत्यु झाला. श्री कृष्णाचा संपूर्ण वंश खंडन होईल असा शाप गांधारी ने दिला होता आणि गांधारी ही एक अत्यंत पतिव्रता स्त्री होती. त्यामुळे भविष्यातील काही विशिष्ट कारणासाठी बाबाजी नी सध्या गांधारी च मंदीर मैसूर या ठिकाणी बांधन्याचा दृष्टान्त दिला आहे.
पुढील लेख ज्ञानंगज या गुप्त आश्रमाविषयी व तेथील प्रगत सूर्य-चंद्र-वायु विज्ञान विषयक असेल. क्रिया योगाचा आध्यत्मिक लाभ- प्रगति आजच्या पिढीस व्हावा आणि बाबाजीं चे कृपाशीर्वाद नवीन पिढीस लाभावेत हाच लेखाचा उद्देश आहे. धन्यवाद

 || Sri Matre Namah ||

Contact us to learn Sri Vidya Sadhna: 09860395985

 Subscribe to our Youtube Channel !!

Join us on Facebook !!

Share

Written by:

215 Posts

View All Posts
Follow Me :

Leave a Reply

error: Content is protected !!
× How can I help you?