?हिमालयातील एक रहस्यमयी मठ ….सिद्धाश्रम / ज्ञानगंज(गौरी शंकर पीठम्)भाग :- ५?
।। ॐ क्रिया बाबजी नमः ।।
।। ॐ क्रिया नागलक्ष्मी माताय नमः ।।
★ क्रिया योगाची ओळख १★
मित्रहो नमस्कार …..खर तर आता , मित्रहो म्हणन्यापेक्षा मला आता सर्वाना बाबाजींच्या सर्व मुलांना नमस्कार म्हणन अस सोईस्कर वाटत . कारण मागील चार लेखातून गेल्यावर अनेक व्यक्ति अंतर्बाह्य बाबाजीं च्या चरणी हृदयातून लीन झाले आहेत . याचा अनुभव मी अनेकांचे फोन्स व मेसेज मधून बघत आहे. वाढत्या कलियुगाच्या प्रभावात आणि भोन्दु आध्यत्मिक व्यक्तीच्या प्रभावात अनेक लोक ग्रासुन गेले आहेत आणि त्या आक्रोशाची तीव्रता वाढली असून ती बाबाजीं च्या कानावर सतत पड़त असावी म्हणून की काय बाबाजी अत्यंत वेगाने हे सगळे बदल घडवत आहेत. हे सर्व लेख प्रपंच त्याचाच एक भाग असावा अस वाटत. या ५व्या भागाचा विषय ज्ञानगंज होता पण अनेक व्यक्ति क्रिया योगाकडे आत्मिक दृष्टया वळु पाहत आहेत पण क्रिया योग हा नेमका काय आहे ? आपल्या देहाला किंबहुना आत्म्याला त्याचा काय उपयोग ? या विचारात बरेच जन अड़कलेत . त्यामुळे आजचा विषय बदलून मी ” क्रिया योगाची एक समान्य तोंड ओळख ” असा ठेवला आहे.
मित्रांनो , काही अड़चन आल्यास मला संपर्क करू शकता (निवृत्ती उबाळे. कणकवली 9860395985) बाबाजींच्या कृपेने जमेल तितकी मदत करेन. हे लेख एकत्रित करण्यासाठी जी बाबाजींनी बुद्धि दिली यासाठी कोटि कोटि धन्यवाद श्री बाबाजी.
आजची पीढ़ी अत्यंत धकाधकी च्या वातावरणात वावरत आहे . अनेक लोक अध्यात्म्याच्या मार्गात आहेत . काही लोक अनेक संत परंपरा मार्गात आहेत तर काही श्री विद्या मार्गात , कृष्ण – राम उपासनेत आहेत तर काही अन्य तांत्रिक साधनांत आहेत. तर बरेच लोक पूर्वीच्या पारंपारिक विषयला चिकटुन आहेत. मनुष्य देह दुर्लभ , त्यात आजच्या माणसाची आयु मर्यादा किमान ६५ पकडू , यात वयोमर्यादेत व्यक्तिच शिक्षण – नोकरी- संसार यातच बरच आयुष्य निघुन जात आणि अध्यतमाच्या बाबतीत बहुतेक जणांच्या अकाउंट ला शून्य येतो. आपल्याकडे एक बोलन्याची पद्धत आहे की आई वडिलांची पुण्याई मुलांच्या कामी येते. पण काही लोक सोडले तर बरेच लोकांना अध्यत्माचा लवलेश ही नाही आणि काही जे अध्यात्म मार्गात आहेत त्यातील बऱ्याच जणांची अवस्था दोलायमान अशीच आहे. यातून खुपच कमी लोकांना साधनेत दिव्य अनुभूति येते व ईश्वरीय शक्तिशी आत्मयाचा समागम होतो आणि हे जीवन जगण्याचा उद्देश सफल होतो.
बाबाजींनी मनुष्य जातिला दिलेला क्रिया योग आज देश विदेशात पसरलेला आहे. आपल्या महाराष्ट्रीय भागात मोजकेच लोक सोडले तर अनेक लोक या बऱ्याच गोष्टी पासून अनभिज्ञ आहेत. माझा एक अनुभव सांगयाचा तर , काही वर्षा पूर्वी ग्रीस देशाच्या बाजूला क्रोटिया नावाचा एक छोटासा देश आहे , तिथल्या काही व्यक्तींशी आध्यत्मिक संबंध आले. त्यात त्यांच्या कडून तिथली स्थिति समजली. ग्रीस मधील ख्रिश्चन (पोप) कम्युनिटी चे अप्रत्यक्ष वर्चस्व आजुबाजूच्या देशांवर आहे . तिथे बाबाजीं चा खुप मोठा भक्त परिवार आहे व क्रिया योग ध्यान साधनारत आहे. पण या कम्युनिटिज् त्यावर अप्रत्यक्ष दबाव आणत असते , तरीही बाबाजीं च कार्य तिकडे ख्रिश्चन लोक चालवत आहेत. त्यावेळी मला बाबाजीं च्या या मोठ्या कार्याची कल्पना आली. …….. बाबाजींनी क्रिया योग फक्त एका जातिला धर्माला दिलेला नाही तर तो समस्त मनुष्य जातीच्या आत्मिक उन्नतिसाठी आहे. क्रिया योगात मोठा साधक वर्ग विदेशातही आहे . विदेशात ख्रिश्चन कम्युनिटी मधील अनेक साधक क्रिया योगात उच्च अवस्थेत पोचले आहेत. अमेरिका यूरोप अश्या ठिकानच्या काही साधकाना बाबाजी नी स्वत प्रत्यक्ष मार्गदर्शन ही केले आहे. उदाहरण द्यायच झाल तर , टॉबी अलेक्ज़ांडर… बाबाजी नी याला जी दैवी देणगी दिली. तो व्यक्ति DNA activet करण्याची कार्य करतो. आज मनुष्याचा DNA ५/६% च कार्यरत आहेत. Mrs. Alexander हिला बाबाजी नी मेक्ससिको वरुन ऋषिकेश ला येण्याची बुद्धि दिली आणि तिथे बाबाजीनी तीला दर्शनाचा लाभ दिला . मनुष्य जातीच्या dna वर अदैवी शक्तींच एक Seal आहे , ते dna पूर्ण एक्टिवेट करण्यात अड़चन आणते आणि त्यामुळे आपल्या मनुष्य जातिमध्ये आजार , वैचारिक-मानसिक पातळीवर मागे पड़ने , …..असे मनुष्यजातीच्या अनेक महत्वाच्या विषयावर या seal मुळे प्रतिबंध अप्रत्यक्ष आहे. तर त्यासाठी बाबाजीनी त्यांना काही मार्गदर्शन केले होते. तर बाबाजीं नी दिलेला क्रिया योग हा आपल्याला अश्या बऱ्याच गोष्टींच्या बंधनातून मुक्तता देतो. ( अधिक माहितीसाठी सांगायचे तर , आज यूरोपात असे लोक निर्माण झालेत की ते एंजल थेरपी द्वारे dna एक्टिवेट ची काम करत आहेत. पण हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे आणि dna वर आनुवंशिक परिणाम करणारा असतो.)
क्रिया योग हा एक साधा सोपा मानसिक-शारीरिक क्रिया अंतर्भूत केलेला योगसाधनेचा प्रकार आहे. यामुळे मनुष्याच्या शरीराच्या रक्तातील कार्बन बाहेर पडून रक्त प्राणवायुने परिपूर्ण होते. प्राणवायुचे आधिक्य झाले म्हणजे त्याच्या अणूंचे जीवनशक्ति मध्ये रूपांतर होऊन त्यामुळे मेंदू व पृष्ठवंशरज्जू मधील विविध केंद्रे यांचे पुनरुज्जीवन होते. प्रगत झालेला योगी आपल्या शरीरामध्ये पेशींचे उर्जेमध्ये परिवर्तन करू शकतो. येशु , इलिजा , कबीर असे अनेक पुष्कळ सिद्धयोगी यात प्रविण होते त्यामुळे ते आपले शरीर इच्छेनुरूप अदृश्य करता येत असे व तसेच जड़ स्वरुपात आणता येत असे. क्रिया योग हे फार प्राचीन विज्ञान आहे. भगवान श्री कृष्णाने ही साधना अर्जुनास सांगितली ती पुढे पतंजली-येशु-सेंट जॉन-सेंट पॉल यांनाही माहीत होती. याचे नवीन पुनरुज्जीवन करून ही साधना बाबाजीं नी श्री. लाहिरी महाशयाना दिली.
भगवतगीते मध्ये ही क्रिया योगाचा उल्लेख आहे. योगशास्त्राचे प्रणेते भगवान पतंजली जे नागलोकाशी संबंधित होते त्यानीही क्रियायोगाचा दोनदा उल्लेख केलेला आहे. क्रियायोग हे मानवाची उत्क्रांती जलद घडवून आणण्याचे असे एक साधन आहे , हे युक्तेश्वर गिरी यांचे वाक्य आहे. (उत्क्रांती या शब्दाचा अर्थ तुमी समजून घ्या.) क्रियायोगी मनाने प्राणशक्ति षठचक्रामधून वरती खेचु शकतो आणि खाली आणु शकतो. ही क्रिया अगदी अर्धा मिनिट जरी झाली तरी व्यक्तीच्या उत्क्रांतीच्या दृष्टीने सूक्ष्म अशी प्रगति होत असते. मनुष्याची उत्क्रांती आणि वर जो DNA हा विषय सांगितला यात एक प्रकारे साधर्म्य आहे , हे आता तुमच्या लक्षात येईल. क्रिया योगात साधकास प्रारब्ध कर्माने मृत्यु ही आल्यास या साधनेचे पूण्य , स्तकर्म पुढील जन्मी तो घेवून येतो आणि त्या जन्मात तो स्वभावतःच आपल्या अंतिम धेय्याप्रत अध्यतमाच्या मार्गात पुढे मार्गस्थ होतो. या मध्ये त्याला त्या-त्या जन्मी योग्य गुरु मार्गदर्शक भेटत असतो. …..? मित्रांनो , हे जन्माचे रहस्य समजून घ्या. म्हणूनच आज बरेच ठिकाणी भोंदु बाबा निर्माण झालेत त्यात फ़सुन नका जाऊ , अशांच्या नादी लागून स्वतःचे जन्मजन्मांतर फुकट नका घालवू.
मनुष्य माया तत्व व निसर्गाच्या अधीन असतो. इंद्रियाकडून बराच दुरूपयोग केला जातो त्यामुळे प्राणशक्तिचा नाश होतो. क्रियायोगाच्या अभ्यासामुळे यात बदल घड़तो आणि प्राणशक्तीचा उपयोग कुंडलिनीशक्तीच्या जागृतीच्या कार्यात होतो. योग्य समतोल आहार , व्यायाम , सात्विकता ठेवून ही मनुष्यास अनेक वर्षाच्या जन्मानंतर मुक्ति प्राप्ति होईलच अस नाही. शरीराच्या एखाद्या भागात अल्प अशी आध्यात्मिक सुधारना करायची झाली तरी अनेक वर्षाचा कालावधी लागू शकतो. परंतु , क्रियायोगाच्या ह्या आध्यात्मिक योग साधनेचा उपयोग करून , योग्य नैसर्गिक नियमांचे पालन करून मुक्ति मिळवण्यासाठी इतकी वाट बघावी लागत नाही. ………………. क्रिया योगा मध्ये एक उत्तम उदाहरण म्हणजे परमहंस योगानंद , त्यांचे शरीर मृत्यु नंतर ही बरेच दिवस तसेच अबाधित राहिले. पंचमहाभूतांचा कसलाही परिणाम त्यांच्या शरीरावर झाला नाही. यावरून समजते की ते एक उच्चकोटींचे क्रिया योगी होते.
क्रिया योगात एक स्टेप पर्यन्त गेल्यावर साधकावर त्याच्या गतकाळातील कर्माचा काही परिणाम होत नाही. तसेच दैनंदिन मध्ये साधकाचा जो स्वभाव गुण असेल त्यातही बदल घड़तो. सामान्य व्यक्ति आज अनेक प्रकारच्या गुलामगिरी मध्ये जगत आहे. एखाद्या विशिष्ट स्वभाव गुण असणे(अहंकार), अत्यधिक पैशाची गुलामगिरी, अपमान , अहवेलना ई अनेक विषयात व्यक्ति अडकलेला आहे. यामुळे काय होते की व्यक्ति स्वतःच्या आत्म्यास प्रत्येक क्षणी कर्मात बांधत आहे आणि कर्म बंधनामुळे व्यक्तिस प्रत्येक जन्मात वेगवेगळे मुखवटे विधात्याकडून मिळतात. हे जन्म घेणे म्हणजे विधाता कुठल्या जन्मात त्याच्या नियमात कसलिही सवलत देत नाही , भोग हे भोगावेच लागतात. क्रिया योग हा या सर्वांतून आत्म्यास योग्य दिशा देतो ज्यांचा परिणाम पुढील जन्मावर ही असतो.
क्रिया योग म्हणजे थोडक्यात…………..शरीर-मन- आत्मा यांचा कायाकल्प आहे.
आपल्या सर्वाना क्रिया योगाची सर्वसाधारण माहिती असावी या उद्देशाने हा लेख लिहिला आहे. पुढील भागात ही……….. क्रिया योगाची आणखी माहिती दिली जाईल.
……………..।। ॐ गुरुभ्यो नमः ।।
|| Sri Matre Namah ||
Contact us to learn Sri Vidya Sadhna: 09860395985
Subscribe to our Youtube Channel !!
Join us on Facebook !!