?हिमालयातील एक रहस्यमयी मठ ….सिद्धाश्रम / ज्ञानगंज(गौरी शंकर पीठम्)भाग :- ५?
।। ॐ क्रिया बाबजी नमः ।।
।। ॐ क्रिया नागलक्ष्मी माताय नमः ।।
★ क्रिया योगाची ओळख २★
मागील भागात क्रिया योगाची थोड़ी माहिती आपन वाचली असेल. क्रिया योगाची आणखी आवश्यक माहिती समजावी म्हणून हा पुढील लेख सादर करत आहे. कारण , आवश्यक तितकी माहिती क्रिया योगा बद्दल थोडीफार प्रत्येकास माहित असणे आवश्यक आहे. या लेखात क्रिया योगात आवश्यक “प्राणशक्ति” च महत्व याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे.
मित्रांनो , लेख वाचून काही प्रश्न पडल्यास मला संपर्क करू शकता (निवृत्ती उबाळे. कणकवली 9860395985) बाबाजींच्या कृपेने जमेल तितकी मदत करेन. हे लेख एकत्रित करण्यासाठी जी बाबाजींनी बुद्धि दिली यासाठी कोटि कोटि धन्यवाद श्री बाबाजी.
क्रिया योग विज्ञान एक विशिष्ट कर्म वा विधि आहे ज्याद्वारे अनंत परमतत्व (परमात्मा) सोबत मिलन (योग ) संभव आहे. स्वतः श्री कृष्णानी ही भगवतगीतेत दोनदा क्रिया योगाचा उल्लेख केला आहे. भगवान कृष्ण भगवतगीतेत म्हणतात “मीच (माझ्या पूर्व अवतारत) हा अविनाशी योग एक प्राचीन ज्ञानी विवस्वत (सूर्य) ला दिला होता , विवस्वत ने हा आपला पुत्र महान स्मृतिकार मनु ला आणि मनु ने सूर्यवंश संस्थापक इश्वाकु ला दिले. या प्रकारे परंपरेने प्राप्त या राजयोगास राजर्षिनी जनाले. पण , हे परंतप अर्जुन ! त्यानंतर हा योग बराच काळ या पृथ्वीलोका तुन लुप्त झाला. “……… आधुनिक युगात या अविनाशी राजयोग विज्ञानास महावातार बाबाजी, लाहिरी महाशय,स्वामी श्री युक्तेश्वर आणि परमहंस योगानंद यानी पुढे वाढवले.
क्रियायोगी मनाने आपली प्राणशक्ति मेरुदंडातील सहा चक्र मध्ये वरखाली घुमवू शकतो. या सहा चक्रातिल अनुक्रमे मूलाधार चक्र , स्वाधिष्ठान , मणिपुर, अनाहत, विशुद्ध आणि सहावे आज्ञा चक्र. प्राणशक्ति ला संस्कृत मध्ये कुण्डलिनीशक्ति म्हटले जाते. ही शक्ति प्रत्येक मानवात असते. प्राणशक्ति विना जीवन संभव नाही. आईच्या गर्भात बालकाचे नवजीवन सुरु होते , तेव्हा पासून त्या नव्या जीवात कुण्डलिनीशक्ति चक्राना बनवायला सुरुवात करते. जेव्हा गर्भात मानव शरीर बनते , तेव्हा प्राणशक्ति पहिल्या चक्रावर केंद्रित राहते. प्रथम चक्र मूलाधार जे पृथ्वी चक्र आहे. मानव शरीर आपसुक एक मानसिक झाकन या प्रथम चक्रावर ठेवून देतो. असे म्हटले जाते की ही प्राणशक्ति या पहिल्या चक्रात निद्रावस्थेत असते. पण हे सत्य नाही कारण , कुण्डलिनीशक्ति प्रथम चक्रात सतत घडयाळाच्या विपरीत दिशेत गोल गोल फिरत असते. काही प्राणशक्ति पहल्या चक्रातुन बाहेर येते व सर्व शरीरात वाहते. प्राणशक्ति विना मानव जीवन संभव नाही. ही एकदम किंचित प्राणशक्ति आहे. पूर्ण विशाल प्राणशक्ति च्या तुलनेत जी मूलाधार चक्र मध्ये जी आहे ती मानव जीवन जगण्यास आवश्यक आहे.
७२००० नाडी मधून मानव शरीरातील मुख्य सहा नाड्यांचा समूह असतो जो सर्वांचे नियंत्रण करतो. या मुख्य नाड्या मूलाधार चक्रातुन सुरु होवून शरीराच्या मध्यातून मस्तिष्क पर्यन्त जातात. या नाड्या प्राणशक्ति चे शरीरात विचरण करण्याचे कार्य करतात. यातील तीन इडा-पिंगला-सुषुम्ना नाडी शरीरातील मेरुदंडातील , दीड इंच दोन्ही बाजुनी वरती जातात. दोन मुख्य नाड्या इडा आणि पिंगला , ज्या प्राणशक्तिला चक्र समुहातून नेवून वर आनतात. ही सूक्ष्म प्राणशक्ति फक्त शरीराच्या प्रतिदिन कार्यास संचलित करते. बाकी चार नाड्या सुषुम्ना-मेधा-सरस्वती-लक्ष्मी या मानव शरीरात सुप्त अथवा लुप्त असतात. मेधा-सरस्वती-लक्ष्मी नाडी या मानव शरीरात समोर असतात , त्या मूलाधार चक्रातुन सुरु होवून कानाच्या पाठीमागच्या भागात जाते. क्रिया योगा द्वारे प्राणशक्तीचा प्रवाह इडा आणि पिंगला नाडी तथा अन्य चार मुख्य नाडी द्वारे होतो. क्रिया योग द्वारे प्राणशक्ति जेव्हा पूर्ण Reactive होते , तेव्हा प्राणशक्ति चे परिवहन सुषुम्ना मेधा लक्ष्मी सरस्वती नाडी द्वारा होते आणि इडा पिंगला नाडी प्रायः लुप्त होते.
चक्र दैवी शक्तिच केंद्र आहेत ज्यातून सर्व आध्यत्मिक अनुभवांचा जन्म होतो. हे वाहणाऱ्या प्रणशक्तिची केंद्र आहेत . ईश्वराद्वारे दिलेली प्राणशक्ति प्रथम मूलाधार किंवा सातव्या चक्रात केंद्रित असते. मूलाधार चक्र पृथ्वी तत्व आहे , सहस्त्रार चक्र ज्यात ईश्वरी चैतन्य निवास करते. प्राणशक्ति जर सातव्या चक्रा पर्यन्त येते पण तिथे तीला कायम स्वरूपी केंद्रित करून ठेवले जाऊ शकत नाही. ती पुन्हा खालच्या चक्रांकडे वळते. क्रियायोगी प्राणशक्तिला मूलाधार चक्र तुन सहस्त्रार पर्यन्त परिवहन करू शकतो . प्राणशक्तीचे चक्रातिल हे परिवहन आध्यत्मिक उन्नती चे प्रतीक आहे. हे परिवहन क्रिया योगी मेरुदंडातील सुषुम्ना नाडी द्वारे करतो.ही क्रिया वारंवार झाल्याने मेरुदंड प्राणशक्ति ने चुंबकीय होवून जातो. मानवाची वस्तुप्रति जोडलेली चेतना ही मुलाधारशी जोडलेली असते ती हळूहळू वरील चक्राकडे वाहत जाते. अंततः ती सातव्या चक्रात येवून केंद्रित होते जिथे इच्छा वासना नसते आणि मानव पूर्ण स्वच्छ होवून ईश्वरी शक्ति मध्ये सामावून जातो.
प्राणशक्ति …पदार्थ आणि आत्मा यातील मधली जोड़ आहे. शक्तिचा बाह्य प्रवाह शारीरिक चेतने द्वारा मनुष्यास सांसारिक आनंदाकडे घेवून जातो. तर आंतरिक प्रवाह शारीरिक चेतना देतो आणि अनंत ईश्वरीय आनंद देतो. साधक दोन संसार चक्रात मध्यभागी उभा आहे , एक बाजूला ईश्वरीय अनुकंपा आहे आणि एका बाजूला शारीरिक सुखाची चेतना ….ज्यात पाहणे-एकणे-खाणे-संभोग-स्पर्श-संवाद-विचार या सर्व क्रियातुन प्राण तत्व अनावश्यक तितके बाहेर जाते. या मायातीत चेतने पासून बुद्धि व प्राणशक्ति ला बाजूला करने हाच योग साधकास कठिन अभ्यास आहे. क्रिया योगाच्या नियमित अभ्यासाने ही प्राणशक्ति च्या बाह्य प्रवाहास मूलाधार चक्रातुन मेरुदण्डातून कूटस्थ स्थानी अर्थात आज्ञा चक्रा पर्यन्त नेले जाते व पुन्हा मूलाधार चक्रात आणले जाते. या क्रिये नंतर जेव्हा साधक ध्यानस्थ बसतो तेव्हा त्याचे मन बाह्य वातावरणा पासून हटते आणि वस्तु-चेतना ही दैविक चेतनेत परावर्तित होते.
पारंपारिक गोष्टी नुसार मानवी शरीरात ८८००० छोटी वा त्यापेक्षा सूक्ष्म चक्र आहेत ज्यानी शरीराचा प्रत्येक सूक्ष्म भाग आवरण केलेला आहे. यातील ४० महत्वाची चक्र जी आहेत ती आपल्या शरीराच्या महत्वाच्या अवयवाना चेतना देण्याचे कार्य करतात , बाकी इतर सूक्ष्म चक्र ही न दिसन्यासारखी असतात. शरीराचे एक बोट ही हालचाल करण्यासाठी ही प्राणशक्ति च कारण आहे. क्रिया योगात जे साधक आहेत त्यानी आपल्या प्राणशक्ति वर पूर्ण विश्वास ठेवणे आवश्यक असते. या प्राणशक्तीचे आपल्या जीवनातील मूल्य जे आहे ते आपन विसरत आहोत. आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवाचे कार्य हे सूर्या कडून मिळालेल्या प्राणशक्तिवर आणि अवकाशात फिरत असलेल्या वैश्विक शक्तीच्या पुरवठा केला जाणाऱ्या मज्जासंस्थेच्या पद्धतीवर अवलंबून असते. या मज्जाशक्ति शिवाय हृदयाचे ठोके पडणार नाहीत , रक्ताभिसरण होणार नाही , श्वसन होणार नाही , शरीरातील अनेक अवयव त्यांची नियमित कार्य व्यवस्थितपणे करू शकत नाही. हा प्राण केवळ मज्जातंतुनाच विद्युशक्ति पुरवत नाही तर त्या मज़्ज़ापद्धतीतिल लोहाचे चुंबकीय आकर्षण निर्माण करतो आणि एक नैसर्गिक तेजोवलय उत्पन्न करतो. ज्या व्यक्तिने आपल्या शरीरात प्राणाचा वाढता पुरवठा शोधण्याचा आणि संचय करण्याचा पद्धतिचा खुप सराव केला आहे अशी व्यक्ति नेहमी जिवंतपना आणि सामर्थ्य उत्सर्जित करते.
श्रीबाबाजींच्या क्रियायोग साधनेला संपूर्ण योग असे म्हणतात. त्यामुळे व्यक्तीच्या अस्तित्वच्या पाचही पाकळ्यांवर म्हणजे शारीरिक (देहिक), (प्राणिक देह) जगण्यास अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या भागांवर , मानसिक, बौद्धिक आणि आध्यत्मिक पातळ्यांवर पूर्ण परिवर्तन होते. वैश्विक दिव्य दृष्टिला प्रतिबंध करणाऱ्या अडथळा आणणाऱ्या सशर्त अटिंच्या थराना ते हळूहळू यथावकाश बाजूला करते. त्याचा परिणाम म्हणजे शरीर एक दैवी मंदिरा प्रमाणे भासू लागते. बाबाजी आणि १८ सिद्ध आजही या जगात अस्तित्वात असून सत्यशोध करणाऱ्या क्रिया योगाच्या सर्व साधकाना ते सतत स्फूर्ती देत असतात.
या भूमिवर जन्म घेतलेल्या प्रत्येक प्राणिमात्रात एक आध्यत्मिक दैवी ऊर्जा आहे. आत्मयाशी परम्यात्म्याला कनेक्ट करणारा “DNA” आहे. भूमिवर जन्म घेणाऱ्या प्रत्येकाची उत्क्रांती ही dna च्या सक्रियतेने होते. बाबाजींनी अनेक वेळा आपल्या अनुयायांसाठी DNA एक्टिवेशन केले आहे. आध्यात्मिक साधना आणि त्याची वाढ ही सर्वस्वी dna एक्टिवेशनच्या सक्रियतेवर अवलंबून असतेे. व्यक्तीची आध्यत्मिक प्रगति किती झाली आहे याचे कनेक्शन तुमचा DNA किती activet झाला आहे याच्याशी असतो. एखाद्या साधनेतून जी प्रगती होते किंवा सिद्धी प्राप्त होतात ते सुद्धा DNA एक्टिवेशन वर असते. DNA Activation मध्ये नाड्या , चक्रे , ऊर्जा केंद्रे येतात. मज्जातंतु वरील जी चक्रे आहेत , त्यातील ब्लोकेजेस आल्यामुळे व्यक्तीला वेगवेगळे रोग आणि वास्तविक जीवनात अडचणी निर्माण होतात. उदा. थ्रोट चक्रातील ब्लोकेज मुळे थायरॉइड होने , हृदय चक्रातील ब्लोकेजेस मुळे हार्ट संबंधी त्रास किंवा नातेसंबंधात तनाव येणे. यामध्ये Golden DNA आहे त्याने मूळ DNA भोवती एक कार्मिक ऊर्जा निर्माण केली जाते किंबहुना त्याला सक्रिय केले जाते. Golden DNA हा मूळ DNA ला अपग्रेड करतो. बाबाजीं दिलेला क्रिया योग नेमके हेच कार्य करतो . (हजारो वर्षापुर्वी बोधिधर्मा या ज्ञानी योगी ने आपल्या ज्ञानाच्या जोरावर DNA चा शोध लावला आणि त्याच्या गुणसूत्राविषयी पूर्ण माहिती घेतली. आपल्या ज्ञानचक्षु द्वारे त्यानी dna संरचना पाहिली ही होती. त्यांना त्यावेळी दूसरे बुद्ध म्हणत. यांच्या बद्दल आपल्याकडे फार कमी लोकांना माहीत आहे. कुंग फु मार्शल आर्ट … जी आहे , त्याचे जनक ही हेच आहेत. हे विज्ञान मानवाला देण्यासाठी ते चीन ला गेले आणि तेथे याचा प्रसार ही झाला. )
क्रियायोगाच्या प्रत्येक साधकाला असंख्य समस्याना तोंड द्यावे लागते. परंतु , सर्वसाधारण माणसाहुन भिन्न असल्यामुळे त्या साधकाला सर्वश्रेष्ठ चिरंतन सत्य पूर्ण ज्ञानाचे उगमस्थान असलेल्या दिव्य महावतार सद्गुरु श्री बाबाजींकडून दिव्य मार्गदर्शन मिळवता येते. बरेच लोक अध्यतमाच्या वेगवेगळ्या वाटेवर आहेत. हिन्दू मध्ये अनेक उपासना पद्धती आहेतच सोबत ख्रिश्चन – मुस्लिम- जैन या धर्माच्या ही उपासना पद्धति आहेत , पण या उपासने ला क्रिया योगाची जोड़ हवी . तरच व्यक्तीची आध्यत्मिक प्रगती अतिशय उन्नत अवस्थेत होईल. क्रिया योग सर्व जाती धर्माला खुला आहे.
श्री बाबाजी म्हणतात , ” जिथे प्रेम आहे तिथे मी आहे. ”
।। ॐ गुरुभ्यो नमः ।।
|| Sri Matre Namah ||
Contact us to learn Sri Vidya Sadhna: 09860395985
Subscribe to our Youtube Channel !!
Join us on Facebook !!