?हिमालयातील एक रहस्यमयी मठ ….सिद्धाश्रम / ज्ञानगंज(गौरी शंकर पीठम्)भाग :- ५?
।। ॐ क्रिया बाबजी नमः ।।
।। ॐ क्रिया नागलक्ष्मी माताय नमः ।।
★ क्रिया योगाची ओळख ३★
मित्रहो , क्रिया योगाची ओळख या सदराखाली हा ३रा भाग . मागील भागात आपन प्राणशक्ति चे महत्व याबद्दल वाचले . तुमाला समजले असेल की क्रिया योग ही आजच्या पिढीची किती नितांत आवश्यकता आहे. आज मनुष्य जातीचे राहनीमान उंचावत आहे पण तेवढ्याच गतीने मनुष्यमध्ये आजार -दोष , भौतिक सुख साधनांत प्राणशक्तीचा अपव्यय वाढत आहे. काही लोकांच्या मनात येईल की , ते इतर गुरु मार्गात आहेत किंवा अन्य कोणती दीक्षा , गुरुमंत्र घेतला आहे ; तर क्रिया योग दीक्षा कशी घेणार? … तर , मुळातच क्रिया योग हा सर्व संप्रदाय , धर्म , जाती याना खुला आहे . साधनेला योग मार्गाची जोड़ लाभत नाही तो पर्यन्त अध्यतमात आत्मिक प्रगति साधने तितकेसे सोपे नाही. श्री बाबाजी हे आज आपल्या वैश्विक शक्तींचे मुख्य गुरु तत्व आहे. आपल्या साधनेला अनुभूतिची किनार आणि ईश्वरीय अनुकंपा याच जन्मात लाभली पाहिजे. शरीर किंबहुना आत्म्याची उत्क्रांती ही शारीरिक-आध्यत्मिक-आत्मिक अश्या सर्वांगीन मार्गाने होवून पुढील जन्मात येणारे मागील जन्मांचे पूर्वकर्म दोष न लागता ….पुढील जन्मात ही आपल्याला ईश्वरीय अनुकंपा लाभली पाहिजे. म्हणून क्रिया योग आवश्यक आहे. कुठलीही अन्य दीक्षा घेतलेली असली अथवा गुरु मार्ग असला तरीही तो साधक क्रियायोग शिकु शकतो . अर्थात , आज अनेक व्यक्ति विविध ईश्वरीय मार्गात आहेत( श्री विद्या साधना , दसमहाविद्या दीक्षा , रेकी थेरपी, श्री दत्त संप्रदाय , समर्थ संप्रदाय , कुठलीही सत्संग सेवा , ध्यान योगाचे विविध आश्रम , शिव साधना , श्री कृष्ण साधना वा दुर्गा साधना , तांत्रिक साधना , संत मार्ग ई.). क्रिया योगामुळे या पूर्वीच असलेल्या गुरु मार्गात/साधनेत आणखी प्रगति साधने शक्य होईल आणि ज्या देवते वर अधिक उपासनेचा भर आहे ती देवता अनेक पटिनी आपल्या साधनेतून जागृती द्यायला सुरुवात करते. आणि क्रिया योग दीक्षे नंतर अन्य कुठलीही साधना करावयाची असल्यास , कुठल्याही संताची सेवा उपासना करायची असल्यास कसलेही बंधन नाही , उलट श्री बाबाजीं ची कृपा तुमच्या साधनेत दिव्यत्व प्रदान करेल.
मित्रांनो , लेख वाचून काही प्रश्न पडल्यास मला संपर्क करू शकता (निवृत्ती उबाळे. कणकवली 9860395985)
या लेखात श्वसनाची क्रिया योग प्राणायाम यामधील आवश्यक माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे. श्वास हा मन आणि शरीराला जोड़नारा अत्यंत महत्वाचा पुल आहे. योगा मध्ये श्वासाला अतिशय महत्व दिलेले आहे. श्वसनाची गति तिन मार्गाने बदलते -१)मनोभाव २)वातावरण ३) हालचाल. यात मन आणि मस्तिष्क द्वारे श्वास गती अधिक संचलित होते. श्वासाची गति व्यक्तीची आयु कमी करते आणि वाढवते. श्वासास नियंत्रित केल्याने बऱ्याच गोष्टीना नियंत्रित करता येते. श्वसा द्वारे ध्यानावर मन केंद्रित करण्यात यश मिळते. शरीरातील सर्व जीवंत पेशीना उर्जेसाठी श्वसनावर च अवलंबून राहावे लागते. याच मुलभुत उर्जेला प्राण असे म्हणतात.
सिद्धांचे शास्त्र असे सांगते की , साधरणत: मानुस एक मिनिटांत १५श्वास घेतो. याचा अर्थ एक दिवसाला २१६०० श्वास होतात.(१५×६०मिनिटे एक तासाला × २४ प्रत्येक दिवसाचे तास) आणि अशा वेगाने तो १२०वर्षाचे आयुष्य जगु शकतो. ऑक्सीजन घेतल्यानंतर जो उच्छ्वास फेकला जातो त्यात गेलेली ऊर्जा पुन्हा परत श्वास घेताना मिळत नाही. सर्वसमान्यपने श्वसोश्वास करताना प्रत्येक उछ्वासच्या वेळी १२इंच पर्यन्त जागा उर्जेने व्यापली जाते , तीच ऊर्जा श्वास घेतना ८ इंच पर्यन्त जागा व्यापते. म्हणजे यात ४इंच जागा व्यापु शकणाऱ्या उर्जेचा सरळ सरळ ह्रास होतो. उर्जेचा जो भाग सतत शरीरात आला पाहिजे त्याचा प्रत्येक वेळी ह्रास होतो. त्यामुळेच सर्वसामान्य पणे १२० वर्षाची आयुष्य मर्यादा कमी होते. प्रमाणा बाहेर श्वसन क्रिया केल्याने आयुष्याचा क्षय होण्यास सुरुवात होते. समुद्रतील कासव ३०० वर्ष अधिक जगु शकते , कारण ते प्रति मिनिट ४ते५ पर्यन्त श्वास घेते. हिवाळ्यात बेडुक , उंदीर , अस्वल ई प्राणी निद्रावस्थेत जातात , अश्यावेळी त्यांचा श्वास वेग प्रचंड कमी झालेला असतो. रोमा ऋषींच्या काळात सर्वसाधारण मनुष्य आयु मर्यादा १२०वर्ष होती. आणि सर्वसामान्य मनुष्य प्रत्येक दिवशी प्रति मिनिट१५ श्वास प्रमाणे २१६०० वेळा श्वसन करीत असे. जर श्वासाचे प्रमाण प्रति मिनिट१८ झाले तर त्याचे आयुष्य ९६ वर्षाचे होईल. पण जर जीवनात वाईट सवयी आणि अनावश्यक उर्जेचा वापर होऊन श्वास प्रति मिनिट३० झाले तर मात्र आयु ६०वर्षच होईल. पण , जर योगिक प्राणायम व आत्मसंयम करून श्वसनाच प्रमाण प्रति मिनीट ५ ते ७ झाले तर….आयुष्य मर्यादा ३६० होईल.
श्वासोच्छ्वास हा अंतर्गत आणि बहिर्गत होत असतो. फुप्फुसात होणारा श्वासोच्छ्वास जेव्हा ऑक्सीजन च्या मार्गाने अलविओली कडून रक्ताकडे जातो तेव्हा बहिर्गत श्वास म्हणतात. तर शरीरात पेशीत होणाऱ्या श्वासोच्छ्वासाला अंतर्गत श्वासोच्छ्वास म्हणतात. सिद्धांचे दीर्घायुष्य शास्त्र मुख्यतः अंतर्गत श्वसनाशी निगडीत असते. योगसाधना करताना योगी भुकेने अथवा तहानेने अस्वस्थ होत नाही. कारण , त्यानी पडजीभेच्या मागे असणाऱ्या छिद्रात मेंदूच्या भागातून स्रावणाऱ्या अमृताचे प्राशन करण्याची पद्धत अवलंबलेली असते. या योगिक क्रियेतून साधना करताना मानवी शरीर सामर्थ्यशाली बनवते आणि त्यास कुजने , रोग , मृत्यु ई पासून दूर ठेवते.
क्रिया योग तंत्र पद्धति चा हेतु म्हणजे चक्रांची जागृती करने , नाड्यांचे शुद्धिकरण , कुंडलिनी शक्ति जागृत करने आणि शेवटी परमेश्वराकडे घेवून जाने. अर्थात यात कुंडलिनी जागृती एकदम न होता टप्प्या टप्पयाने होते. जर कुंडलिनी शक्ति एकदम जागृत झाली तर बेसावध स्तिथित कुंडलिनी च्या जोरदार शक्तिने शरीरातील नाडी रचना पूर्ण चिरडली जाते. त्याचा परिणाम म्हणजे तीव्र त्रास आणि मानसिक तोल ढासळणे. श्री बाबाजीं च्या क्रिया योग साधनेला संपूर्ण योग म्हणतात. क्रिया योगाच्या नियमित साधनेद्वारे याच जन्मी मनुष्य देह ईश्वरीय अनुकंपा लाभलेले मंदिर भासू लागेल. श्री बाबाजींच्या क्रिया योगात अनेक मलिकांचा अंतर्भाव आहे. त्याच्या पाच प्रमुख गटात एकत्रीकरण केले आहे. १) क्रिया हठयोग २) क्रिया कुंडलिनी प्राणायाम ३) क्रिया ध्यानयोग ४) क्रिया मंत्रयोग ५) क्रिया भक्तियोग . याबद्दल परिपूर्ण माहिती ” बाबाजी आणि क्रियायोग परंपरेचे १८ सिद्ध ” या पुस्तकात मिळेल.
क्रिया योग परंपरेच्या १८ सिद्धांपैकी बहुतेक जनानी कौटुंबिक जीवनाचा अवलंब केला आणि तो त्यांच्या आध्यत्मिक साधनेचा एक भाग होता. क्रिया योग तंत्रात सामान्यतः लैंगिक कृतीमध्ये खर्च होणाऱ्या आणि वाया जाणाऱ्या ऊर्जाशक्तींचे जतन केले जाते आणि त्याला उर्ध्व चक्रांकडे वळविले जाते. आपल्या जीवनसाथीला ईश्वराची प्रत्यक्ष मूर्ती समजून प्रेम करण्याची उदात्त भावना क्रिया तंत्रयोगात अंतर्भूत आहे. मागे संगीतल्या प्रमाणे क्रिया योगाने मनुष्यामध्ये उत्क्रांती घडते. मनुष्य जातीत आज प्रत्येक कुटुंबात अनुवांशिक त्रास-रोग-व्याधी-अडचणी कोणत्या न कोणत्या पद्धतीने पुढील पीढित येत आहेत. त्यामुळे सात्विक आत्मे जन्म घेण्याचे प्रमाण कमी झाले आहे. क्रिया योगाच्या नियमित अभ्यासाने मनुष्याची उत्क्रांती होतेच आणि त्याद्वारे असे अनुवांशिक त्रास पुढील पीढित वाढत जाण्याचे प्रमाण ही कमी होत जाते आणि सात्विक आत्मे जन्म घेवू लागतात.
श्री बाबाजींनी आदि शंकराचार्य(ई.स.७८८-८२०)यांना क्रियाकुंडलिनी ची दीक्षा दिली होते , बाबाजी त्यांचे गुप्त आध्यत्मिक योगिक गुरु होते. १५व्या शतकात श्रेष्ठ संत कबीर यांनाही बाबाजीनी दीक्षा दिली होती. लाहिरी महाशय जी यांना १९व्या शतकाच्या शेवटी क्रियायोग दीक्षा दिली होती. श्री युक्तेश्वर गिरी याना बाबाजींचे तिन वेळा दर्शन झाले. पुढे जाऊन परमहंस योगानंद , योगी s a a रामय्या आणि नीलकांतन यांना ही बाबाजींचा अनुग्रह प्राप्त झाला. योगानंदानी योगदा सतसंग सोसायटी याची रांची ला स्थापना केली , त्याच सोबत लॉस एंजलिस येथे सेल्फ रियलायझेशन फेलोशिप या प्रमुख केंद्राची स्थापना केली. योगानंदानी एक लाख लोकांना क्रिया योगाचे शिक्षण दिले. योगानंद यांचा मृत्यु झाला तेव्हा २१ दिवस त्यांच्या शरीरावर कसल्याही ह्रासाचे चिन्ह नव्हते. ते एक उच्चकोटिचे क्रियायोगी होते.
मागील लेखामध्ये लिहिले होते की मनुष्य जातीच्या DNA वर अदैवी शक्तींच बन्धन आहे. त्यामुळे आज मूळ dna हा ४/५% कार्यरत आहे. त्याचप्रमाणे ज्या पृथ्वीवर आपन राहतो , या भूमिवर पाय ठेवल्या नंतर एक गुप्त ऊर्जा भुमितून आपल्या शरीरात जाते. आपल्या आध्यत्मिक प्रगति मध्ये तीचेही सहकार्य असते. मनुष्य जातीच्या dna ला ज्या अदैवी शक्तिनी सील केल आहे , त्यांनीच पृथ्वीच्या सकारात्मक उर्जेला काही प्रमाणात विशिष्ट ठिकाणी सील लावली आहे. पृथ्वी ला ही मनुश्याप्रमाने चक्र आहेत…मूलाधार- स्वाधिष्ठान ई. आणि नाड्या ही आहेत. यावर अदैवी शक्तिनी सील केल्याने मनुष्य जातिची जितकी आध्यत्मिक प्रगती झाली पाहिजे तितकी होत नाही. जीजस ख्रिस्त हे संपूर्ण मनुष्य जातीच्या कल्याणासाठी निर्माण झाले होते. ते केवल ख्रिश्चन नव्हते. तर या पृथ्वीला लावेलेली ही बन्धन आणि मनुष्य जातीच्या dna ला लावली बन्धन यातून मुक्तता करण्यासाठी आणि काही विशिष्ट कारणासाठी त्यांचा जन्म होता. कारण , जीजस ख्रिस्त हे एक प्रतिकात्मक होते. येशुनच्या मस्तकावर जो काटेरी मुकुट होता , तो आज्ञा चक्र जे आहे त्याला बन्धन करण्यासाठी घातला होता. येशु मनुष्य जातीच प्रतिकात्मक रूप असल्याने , त्यांच्या आज्ञा चक्रावर बन्धन येणे म्हणजे सर्व मनुष्य जातीच्या आज्ञा चक्रावर बन्धन येन्यासारख आहे. त्यामुळेच क्रिया योगाची आवश्यकता प्रत्येक व्यक्तीला आहे. बाबाजी आणि येशु यांचे नेहमी सवांद असतो. बाबाजीं कडुन मार्गदर्शन घेतल्यावर येशु हिमालयातुन पुढील प्रदेशात गेले अस मानल जात. व्यक्ति ची आध्यात्मिक प्रगति ही DNA च्या उत्क्रांती वर एक प्रकारे अवलंबून असते. त्यामुळे आज जग कुंडलिनी जागरण क्रिया योग , हीलिंग साधना , चक्र साधना यांकडे वळु लागले आहेत.
आता तुमाला समजल असेल की क्रिया योग आवश्यकता का आहे ती !
क्रिया योगाच्या रोजच्या साधने सोबत साधकाला अन्य देवतेची वा गुरु मार्गाची निवड साधनेसाठी करायची असेल तर तो उचित मार्गदर्शनाने करू शकतो. या लेखा सोबतच एक आणखी महत्वाची माहिती सांगवी शी वाटते. बाबाजीं च अधिपत्य असलेल्या या गुप्त मठांचा भाग अवकाशातून श्री यंत्रा प्रमाणे आहे अस म्हणतात. ज्ञानगंज या आश्रमात दिव्य योगी श्री महातपाजी स्वामी हे सदैव ज्ञानगंज स्थित एक गुप्त गुफा जिथे श्री राजराजेश्वरी मातेची पाषाण मूर्ती आहे , तिथे निवास करतात. श्री विद्या राजराजेश्वरी महात्रिपुर सुंदरी माता जीची श्री यंत्र रुपात पूजा केली जाते ; ही मुख्य सर्व देवीदेवता अनंत ब्रम्हांड जननी आहे. बाबाजीं चे गुरु श्री अगस्ति मुनि हे श्री विद्या उपासक तथा आचार्य आहेत. याच्या उपासक आणि दीक्षा पद्धति ज्या आहेत त्यापैकी पुढील नावे प्रसिद्ध आहेत – मनु, चंद्र, कुबेर, लोपामुद्रा, मन्मथ, अगस्त्य, अग्नि, सूर्य, इंद्र, स्कंद, शिव, क्रोध भट्टारक (दुर्वासा). श्री विद्या त्रिपुरा रहस्य जे अत्यंत गुह्यतम गुह्य आहे . हे भगवान शिव मुखातून भगवान दत्तात्रेय यानी ऐकले आणि ते त्यानी भगवान परशुराम यांना सांगितले. भगवान दत्तात्रेय आणि परशुराम हे श्री विद्येचे मुख्य आचार्य आणि उपासक आहेत. बाबाजींनी आदिशंकराचार्य याना क्रिया योग दीक्षा दिली होती. आदि शंकराचार्य हे श्री विद्या उपासक होते व सर्व शंकर मठात श्री विद्येची आराधना केली जाते. तर , श्री बाबाजी आणि पराशक्ति चा असा ही सबंध आहे.
पुढील ६ वा भाग हा बाबाजींच्या जीवनचरित्रा शी संबंधित असेल.
|| Sri Matre Namah ||
Contact us to learn Sri Vidya Sadhna: 09860395985
Subscribe to our Youtube Channel !!
Join us on Facebook !!