Mahavtar Babaji – सिद्धाश्रम आणि महावतार बाबाजी ६

Mahavtar Babaji – सिद्धाश्रम आणि महावतार बाबाजी ६

?हिमालयातील एक रहस्यमयी मठ ….सिद्धाश्रम / ज्ञानगंज(गौरी शंकर पीठम्)भाग :- ६?
।। ॐ क्रिया बाबजी नमः ।।
।। ॐ क्रिया नागलक्ष्मी माताय नमः ।।
?ब्रम्ह स्वरूप महावतार बाबाजी?
जय बाबाजी मित्रहो , आज लेखमालेतील आठवा लेख तुमच्या समोर सादर करत आहे. गेले दोन महीने ज्या पद्धतीने हे कार्य बाबाजी करून घेत आहे , ते खरच आश्चर्यकारक आहे. बाबाजीं बद्दल मला चार वर्षापासून माहीत होते. पण कधी इतकी जवळीकता येईल अस वाटल नव्हते. नोवे. २०१५ ची एक तारीख , जागतिक दर्जाचे शिल्पकार भगवान रामपुरे सर यांचा अचानक फोन आला , इतक्या मोठ्या व्यक्तीचा फोन अचानक आला , मलाही काही सुचेनासे झाले. लगेच दिवाळी पाडव्या दिवशी मोठा बॉक्स कुरियर ने घरी आला ….अन् त्यात बाबाजीं ची दिव्य सफ्टिकमय कांती असलेली मूर्ती. एक क्षण मी ही स्तब्ध झालो. काय माहीत कुठल्या जन्मीचे पूण्य हे की बाबाजी माझ्याकडे यावेत. आणि तिथपासून श्री बाबाजी आणि क्रिया योग यांची सर्वांगीन माहिती आपल्या मराठी लोकांना व्हावी याहेतु ने हे लेख संकलित करने सुरु झाले. गेले दोन महीने अनेक लोकांचे फोन , मेसेज येत आहेत. बाबाजींचा दिव्य अनुभव ज्यानी अनुभवला , असा रोज एक तरी फोन येतोच. मित्रहो , बाबाजी हा शब्द आणि कार्य समजन्यासाठी सुद्धा व्यक्तिकडे पुण्याई हवी.
ज्यानी ज्यानी क्रिया योग दीक्षा घेतली , ज्यांची क्रिया योग साधना चालु आहे. ते सर्वच साधक हे सामान्य जनतेहुन भिन्न आहे. तुमचे खरच अनेक जन्मांची पुण्याई ही , की क्रिया योग आणि बाबाजीं शी तुमी जोडले गेलात. हे कार्य असच तुमी चालु ठेवा. कारण , इतक्या सर्व घोर मायेतून सत्या पर्यन्त तुमी पोहोचत आहात. हे सर्वाना शक्य होत नाही.
मित्रांनो , लेख वाचून काही प्रश्न पडल्यास मला संपर्क करू शकता (निवृत्ती उबाळे. कणकवली 9860395985)
या लेखात बाबाजीच्या कार्याबद्दल जितकी माहिती मला भेटली आहे ती एक करून तुमच्या पर्यन्त पोहोचवत आहे. श्री बाबाजी आणि त्यांची बहिन नागलक्ष्मी माता हे दिव्य अगाध वैश्विक ऊर्जा आहे. श्री बाबाजी आजही आपल्या भक्तानां दृष्टांत देतात. बाबाजींनी अनेक जनांसाठी dna एक्टिवेशन ची क्रिया ही केली आहे. अनेक जनाना क्रिया योग दीक्षा देवून सामान्य लोकांसाठी आपल्या शिष्याना पाठवले. अनेक योगींच्या आध्यत्मिक प्रगति मध्ये गुरु बनून मार्गदर्शन केले आहे. सुप्रसिध्द योगीराज श्री युक्तेश्वर गिरी त्यांचे शिष्य योगनंदांना सांगतात… ” बाबाजींच्या आध्यात्मिक अवस्थेची कल्पना मानवी मनाला येण्यासारखी नाही. माणसाची आकुंचित दृष्टी अनेक स्तरापलीकडील ताराकासदृश अश्या बाबाजीन्पर्यंत पोहचू शकत नाही. त्यांच्या अवतारी स्वरूपाचे आकलन करण्याचा प्रयत्नसुद्धा कोणास करता येण्यासारखा नाही. त्यांचे ज्ञानहोणे सुद्ध अशक्य आहे..”कृष्ण , राम, बुद्ध, पतंजली हे प्राचीन काळातली अवतार आहेत. तर बाबाजी हे आधुनिक युगातील अवतार आहेत. मोक्षसोपान समजल्या जाणाऱ्या क्रियायोगाचे त्यांनी पुनरुज्जीवन केले. पृथ्वी वर जे जे अवतारी पुरुष जन्म घेतात त्यांना मदत करण्याचे महत्कार्य बाबाजींनी आपल्याकडे घेतले आहे……. शास्त्रात गणल्या प्रमाणे त्यांची गणना महाअवतारा मध्ये होते.
ह्या परम गुरूंच्या वयावर अशी कोणतीही खूण नाही. ते सदैव तरुण भासतात. त्यांचे वय पंचविश पेक्षा जास्त वाटत नाही. बाबाजी गोरेपान, मध्यमप्रकृती, उंच, सुंदर व सुधृढ असे आहेत..आपल्याभोवती येणारे तेजोवलय ते धारण करतात.. डोळे काळेभोर, स्थिर व नाजूक ,, केस लांबलचक व ताम्ब्रवर्णीय आहेत…महाअवतार बाबाजींचा जीवनपट फारसा माहित नाही.. त्यांचे वय २००० वर्षांपेक्षा ही अधिकच आहे…. मृत्यूवर विजय मिळवून त्यांनी श्रेष्ठ ज्ञान संपादन केले आहे.ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकाच्या अंतिम काळात गौतम बुद्धाने असे भविष्य सुचित केले की “त्याच्या शिकवणीचे ऋण त्यांनी देहत्याग केल्या नंतर पाचशे वर्षात विकृत होईन नष्ट होऊन जाईल.. पुढील आठशे वर्षाच्याकाळात ‘नाग’ शब्दाशी निगडीत असलेल्या एका युवा व्यक्तीकडून त्याने शिकवलेल्या तत्वांचा पुन्हा शोध लावला जाईल. “इ.स.२०३ मध्ये ३० नोव्हेंबर या दिवशी पारंगपट्टी या तामिळनाडूतील लहान खेड्यात जिथे कावेरी नदी हिंद महासागराला मिळते तेथे बाबाजींचा जन्म झाला. त्याच्या आई वडिलांनी त्याचे नाव “नागराज” ठेवले. बाबाजींचा जन्म रोहिणी नक्षत्रावर झाला होता.. याच नक्षत्रावर परमेश्वर पूर्णावतार भगवान श्रीकृष्णाचा जन्म २० जुलै 3228 ख्रिस्तपूर्व झाला होता…नागराज पाच वर्षांचा असताना तो पेरंगपट्टीच्या शिवमंदिरात असताना एका परदेशी व्यापाराने त्याचे अपहरण केले. कोणाच्याही नजरेस न पडता त्याला घेऊन तो बोटीने उत्तर दिशेला हजारो मैलपलीकडे असलेल्या कलकत्ता बंदरावर पोहोचला.(काही पुस्तकात बंदराची नावे कालिकत आणि मालवण ही चुकीची लिहिली आहेत. खर कलकत्ता ठिकाण आहे.) त्याने एका श्रीमंत व्यापाऱ्याला गुलाम म्हणून विकले. हा व्यापारी दयाळू होता. थोड्याच काळात त्याने नागराजाला पुन्हा स्वातंत्र्य दिले. स्वातंत्र्य मिळाल्यावर कलकता ते वाराणसी च्या प्रवासात बाबाजीनी वेदांत धर्मशास्त्र याचा अभ्यास करून ” सिद्ध ” याचा गुप्त भेद जानला. नंतर बाबाजी एका सन्यासांच्या फिरणाऱ्या गटात सामील झाले. अत्यंत खडतर परिश्रमाने ते पायी आणि बोटीने कार्तीग्राम (श्रीलंका) येथे पोहोचले. तेथे ते सिद्ध बोगारनाथ यांचे शिष्य झाले. एका प्रचंड वृक्षाखाली बसून त्यांनी खडतर योगिक साधना केली. हळू हळू बोगारनाथांच्याबरोबर समाधीचे अनुभव जास्त सखोल व गहिरे होत गेले. शेवटी तर या अनुभूतीने परमोच्च बिंदू गाठला तेव्हा कार्तिकेयाचे चिरकाल अवस्थेतील रूपाचे दर्शन त्यांना झाले. कार्तिकेय यांच्या शरीरात अवतीर्ण होत आहे असे बोगारनाथांना जाणवले. बोगारनाथांनी आपले शिष्य बाबाजींना सिद्धांत योग्याच्या उद्दिशांचा शोध घेण्याची स्फूर्ती दिली व पोठीगाई पर्वताच्या प्रदेशात अगस्ती सिद्धांकडे कुंडलिनी प्राणायामची दीक्षा घेण्यास पाठवले. अगस्ती ऋषीं कडून त्यांना योगातील रहस्यांची दीक्षा देई पर्यंत तेथेच राहण्याची पवित्र शपथ त्यांनी घेतली. त्याप्रमाणे ते अत्यंत खडतर साधना ४८ दिवस करत राहिले. शेवटी ४८ व्या दिवशी कोसळण्याच्या अवस्थेत असताना जंगलातून सुप्रसिद्ध सिद्ध अगस्तीमुनी आले. नागराजांचे त्यांच्यावरील प्रेम पाहून त्यांचे हृदय पूर्ण विरघळून गेले..त्यांनी नागराजाला दीक्षा दिली.. कुंडलिनी प्राणायामाची रहस्ये शिकवली. अगस्ती नी हे तंत्र आत्मसात करण्यासाठी कडक नियमावलीवर भर देऊन त्याचा सराव कसा करायचा हे विशद केले.. त्यानंतर बाबाजींना हिमालय पर्वतातील वरच्या भागात असलेल्या बद्रीनाथ येथे जाऊन जगातील सर्व श्रेष्ठ सिद्ध म्हणून राहण्याची आज्ञा केली. बाबाजींनी बद्रीनाथला खूप मोठमोठ्या प्रदीर्घ तीर्थयात्रा केल्या आणि त्यानंतर जवळ जवळ १८ महिन्यांचा प्रदीर्घ एकाकी अवस्थेतील काळात त्यांचे गुरु अगस्त्यार वर बोगार्नाथ यांनी शिकवलेल्या सर्व योगिक क्रीयातंत्राची अगदी खडतर व कसून साधना केली. १८ महिन्यांच्या खडतर तपश्चर्येनंतर नागराजांनी ” सौरभ समाधीत ” प्रवेश केला. सौरभ समाधी ही अतिशय उच्चकोटि तील आध्यत्मिक अवस्था आहे , प्रत्यक्ष परमेश्वर अवतारित होतो आणि साधकाच्या अध्यात्मिक, बौद्धिक, मानसिक महत्वपूर्ण इंद्रियांमध्ये व शरीरामध्ये अवतरीत होतो, विलीन होतो व त्याचे परिवर्तन करतो. त्याचे पार्थिव शरीर वृद्ध न होता दैवी चैतन्याच्या शुद्ध व सोन्याप्रमाणे तेजस्वी बनते. चमकू लागते. श्रीबाबाजींच्याशरीराचे सुद्धा अशा दिव्य, शुद्ध सोन्याप्रमाणे तेजस्वी शरीरात रुपांतरीत झाले.
या सर्व प्रवासात जेव्हा बाबाजी कलकता येथे होते . तेथून ते बऱ्याच गोष्टी शिकल्यानंतर अधिक आध्यात्मिक उन्नति साठी बंगाल येथे एका होडीतून चितोगोंग या पहाड़ी ठिकानच्या काली मंदिरा कड़े पोहोचले. आज ते ठिकाना बांग्लादेश मध्ये आहे. तिथे काही काळ कड़क तपस्या केल्यावर काली मातेचा आशीर्वाद प्राप्त केला. ते तिथे काली मातेशी वार्तालाप करत असत. काली मातेकडूनच साधना शिकुन कौल मार्गात महारथ मिळवली. काली मातेच्या कृपेने ६४ योगिनीँचा अनुभव घेतला. त्यानंतर भारतात मग ६४ योगिनी ची मन्दिर स्थापन झाली , जी उत्तर भारतात आहेत बहुतांश. बाबाजी नी जिथे तपस्या केली ते नंतर भवानी मन्दिर बनले आणि ५२ शक्तिपीठामध्ये त्याचा समावेश झाला. यानंतर बाबाजी हे वाराणसी ला गेले आणि तिथून मग श्रीलंकेचा प्रवास सुरु झाला. बाबाजी या साधनेत असताना आपली बहिन जीला आपन नागलक्ष्मी किंवा अन्नाई माता या नावे ओळखतो , तीला ही साधनेत समावुन घेतले. श्री बाबाजी आणि श्री माताजी दोघानी ही वेदांत-सिद्धान्त सहित ६४ तंत्र ६४ योगिनी साधनांत महारथ मिळवली आहे. बाबाजींच्या योगसाधनेत आणि ६४ योगिनी मध्ये खेचरी मुद्रेस महत्व आहे. खेचरी यंत्र 64 योगिनी यंत्र जे आहे आणि श्री बाबाजींच यंत्र यात गूढ़ साम्य आहे. बाबाजींच्या यंत्रात एक बिंदु त्यावर त्रिकोण त्यावर चौकोन आणि त्यावर वर्तुळ …. हे एक प्रकारे मूलाधार शि संबंधित आहे.
बाबाजीनी मानव जातिला दिलेला क्रिया तंत्र योग हा नुसताच एक योग नाही तर संपूर्ण योग अस म्हटले जाते. कारण त्यात अंतर्भूत अनेक गुप्त गोष्टी आहेत , साधक एक एक स्टेप पुढे जातो तेव्हा त्याला मूळ साधनेतील प्रगती चा उपयोग होतो. पुढील उच्च साधने साठी जी उर्जेची आवश्यकता आहे , त्यासाठी क्रिया योग आवश्यक आहे. बाबाजींनी त्यांचे शिष्य योगी रामय्या याना क्रिया योग साधना दिली , त्यात १४४ सिद्ध योगिक तंत्र पद्धतीचा समावेश ही होता. ही सिद्ध योगिक क्रिया अतिशय उच्च कोटींची आहे , रामय्या यानी याची गुपित आपल्या जवळच्या शिषयांसमोर उघडली नाहीत. ते फक्त ६४ तंत्र साधने बद्दल सांगत असत. क्रिया तंत्र योग यासर्वांच मूळ काली माता आहे . क्रीयाच्या सरावाचे हजारो तंत्र आहेत त्यात क्रियाचा उदेश आपल्या आत्म्याच्या आतील स्वरूपाचे प्रगटीकरण हा आहे . आणि श्री बाबाजी याचे मुख्य आहेत.
श्री बाबाजींच्या कार्यातील काही महत्वाच्या गोष्टी म्हणजे , आदी शंकराचार्य याना क्रिया कुंडलिनी योग याची दीक्षा दिली. बाबाजी त्यांचे गुप्त योगिक गुरु होते. संत कबीर १५ वे शतकात यांनाही दीक्षा दिली. लाहिरी महाशय यांच्या बद्दल तुमाला माहीत असेलच. योगी रामय्या , निलकांतन यांनाही क्रिया योग दीक्षा दिली. बाबाजींनी विदेशात काही जनाना DNA activation ची क्रिया ही दिली आहे आणि केली आहे. श्री बाबाजींच्या कार्या बद्दल सांगावे तितके कमीच. या लेखात एक अतिशय महत्वाचा विषय तुमच्यासमोर आनावासा वाटतो.
या लेखमालेत 3 ऱ्या पार्ट मध्ये लिहिले होते की , हे सर्व दिव्य योगिक सिद्ध रहान्याची जागा अथवा आश्रम सर्व गुप्त आहे . तिथे कसलेही मनुष्य जातीची जी देश-काल-वय-धातु बन्धन नाही. ही स्थान सर्व पृथ्वीवरील चौथ्या आयाम असलेले भागात आहेत. आयाम याला डायमेंशन म्हणू शकता किंवा लोक म्हणू शकता जिथे दिव्य शक्ति आत्मे राहतात व तिथल वातावरण वेगळ् असत प्रत्येक आयामा नुसार. आणि आपन सर्वसामान्य मानव हे 3 ऱ्या आयाम / dimension मध्ये आहोत. मानवाला जशी चक्र आहेत तशीच भूमिला ही आहेत. जसे की पृथ्वीचे अमेरिका येथे मूलाधार चक्र आहे , साउथ अमेरिका येथे स्वाधिष्ठान , मणिपुर चक्र ऑस्ट्रेलिया मध्ये , थ्रोट चक्र इजिप्त , सहस्रार चक्र हिमालयात आहे. त्यामुळेच हिमालय अनेक रहस्यमय गोष्टीनी गुप्त आहे , अनेक सत्पुरुषांच्या तपस्येचि आवडती जागा आहे आणि बाबाजींचा आश्रम व काही गुप्त आश्रम येथे आहेत. ह्या सर्व भूमिवरील चक्र स्थानावर बाहेरील जगातील शक्ति रहायला होत्या आणि आहेत ही . अदैवी शक्तिनी या स्थानावरील ऊर्जा सील करण्याचे ही प्रयन्त केले आहेत , की जेने करून मनुष्य जातीची आध्यत्मिक प्रगती होता नए . ………… श्री बाबाजीना “महावतार” असे म्हटले जाते. अवतार म्हणजे कोणी ईश्वरीय दूत फ़रिश्ता अथवा स्वत ईश्वर भूमिवर येणे. ही भूमि 3D मध्ये असल्याने हे सर्व दिव्य शक्ति पूर्ण शक्तिनी शी उतरु शकत नाही. जसे की राम २१कलायुक्त होता आणि कृष्ण १८ कलायुक्त होता. दोन युगात विष्णु अवतार यांची शक्ति आकुंचन पावली.( कला हे मोजमाप आहे.) ही पृथ्वी अनेक आयाम / Dimension युक्त आहे. त्यात 1D ,2D, 3D,4D, 5D…. असे ऐकून 12D आहेत म्हणजे 12 पातळ्या. प्रत्येक आयाम मध्ये देश -काल- वय वातावरण यात बदल आहेत. आपल्या 3D मध्ये एक तास म्हणजे 60 मिनिटे तर , 4D मधील जगात तोच काल एखाद मिनिट असू शकतो किंवा 5D+ मध्ये सेकण्ड असू शकतो. प्रत्येक आयाम / डायमेंशन मध्ये कोणता भाग येतो , ते पुढे देत आहे……… १D(१ला आयाम): Non living Matter भाग येतो ,२D मध्ये :वनस्पतीचे साम्राज्य येते ,३D:प्राणी साम्राज्य(यात मानवांचाही समावेश होतो), ४D:प्रगत मानव(परिपूर्ण आरोग्य,प्रेमळ स्वरूप, संत)५D:गेलेले मानव(अमर असलेल प्रकाश तत्व )
६D/७D : मनुष्य /मानव ( वैयक्तिक आत्म्यांचा कळस )*८D:सार्वत्रिक आत्मा जो सर्वात वास करतो . (स्वत ईश्वर) ( जे १२D,७D आत्म्याचे निर्माण हे करू शकतात )*
९D /१०D /११D : प्रगत रचना आणि निर्मिती क्षमता असलेले दिव्य आत्मे शक्ति असतात.
१२D मध्ये येणाऱ्या शक्ति एखाद्या विश्वाची निर्मिती हे करू शकतात , जीवन स्वरुपाची रचना , अध्यात्मिक कायदे , आणि काहीही निर्माण करू शकतात . देवापेक्षाही अधिक जे काही सुंदर आणि नेत्रदीपक आहे ते निर्माण करू शकतात.
वरील 1D ते 12 D मधील दिव्य शक्ति भूमिवर आल्या होत्या , आपल्या मनुष्य जातीला त्यानी मदत ही केलि आणि ते आजही आपल्यात आहे. आपन जे संत पूजतो , म्हणजे स्वामी समर्थ , टेंबे स्वामी , रामकृष्ण परमहंस, नित्यानंद , निम करौली बाबा , गजानन महाराज , साईं बाबा , बामा क्षेपा , लाहिरी जी , योगानंद, युक्तेश्वर जी , त्यानंतर स्वामी प्रणवानन्द , महातपाजी स्वामी , स्वामी विशुद्धानंद , स्वामी लोकनाथतीर्थ , त्रैलंग स्वामी …ई हे सर्व याच उच्च आयाम मधिल भाग आहेत ज्यानी 3D मध्ये म्हणजे आपल्या सामान्य मनुष्य जातीत येवून मानावाचा उद्धार करण्याचा प्रयत्न केला. ………. आणखी विस्तृत सांगायच तर….. आपली भूमि आणि ब्रम्हांड यातील विशिष्ट आयाम असलेल्या अनेक शक्ति भूमिवर आहेत व येवून गेल्यात. यात विशष्ट नक्षत्र वासी हे 9D मध्ये मोड़तात, दिव्य आत्मयांचा समूह 8D(थियोसोफिकल सोसायटीच्या मॅडम ब्लाव्हात्स्की यानी याबद्दल सांगितले आहे.), परग्रहवासिय जीवनसमुह 7D मोड़तो, देवयानी सभा 7D to 9D आयाम मध्ये , यहूदी सभा 7D, विशिष्ट फ़रिश्ते दूत 7D-8Dआयाम मध्ये येतात , श्रीकृष्ण अवतार10D आयाम मध्ये येतो, सनद ऋषि 8D, भगवान बुद्ध 8D…….. आणि श्री महावतार बाबाजी 9D आयाम मध्ये मोड़तात………..
हे सर्व विस्तृत सांगण्याचे कारण की हे सर्व दिव्य उच्च आयाम असलेले आत्मे मानवाशी संवाद साधने , आध्यात्मिक उन्नती साठी भूमिवर येतात. श्री बाबाजी हे अतिशय उच्च चेतना असलेल्या 9 व्या आयाम मध्ये आहेत. त्यामुळेच त्याना महावतार असे म्हटले जाते. संपूर्ण मनुष्य जातीच्या आत्मिक आध्यत्मिक कल्याणासाठी त्यांचा हा अवतार. हेच मागे संगितल्याप्रमाणे मनुष्य जातीच्या DNA वर आणि भूमिच्या चक्रांवर जी सील आहेत , त्यामुळे मनुष्य जातीची म्हणावी तशी अध्यात्मात प्रगती होत नाही. मनुष्य अनेक वेगवेगळ्या साधना करतो , वेगवेगळे देव- संत यांच्या सानिध्यात जातो , नामस्मरण करतो पण पण जो आवश्यक आध्यत्मिक स्तर हवा तो लाभत नाही. यासर्वातून मार्ग देण्यासाठी बाबाजी नी क्रिया योग मानव जातिस दिला आहे. आपल्याला इतकेच माहीत आहे की मूलाधार ते सहस्रार पर्यन्त ७ चक्र आहेत , पण त्याही पुढे आणखी ५ चक्र डोक्याच्या वर आहेत. आठवे चक्र हे डोक्याच्या २ इंच वर आहे . ९ वे चक्र हे डोक्याच्या एक पाऊल वर आहे . १० वे चक्र हे डोक्याच्या २ फुट वर आहे . तर ११ वे चक्र हे डोक्याच्या २ मीटर वर आहे . १२ वे चक्र हे खूपच प्रकाशमय आहे . पण ते डोक्याच्या कितीतरी मीटर वर आहे . आणि त्याच्या आकारात हि बराच फरक पडतो . ह्या सर्व चक्राचे आकार , स्वरूप , रंग ,आणि तीव्रता यात भिन्नता आहे ……… अर्थातच हे १२ चक्र १२ D .N .A जोडयांशी आणि १२ आयामांशी संबंधित आहे . जेव्हा तुम्ही चक्राला जागृत करता तेव्हा आपोआपच त्या संबंधित D .N .A जोडी सक्रिय होते . यामुळे संबंधित आयामांच्या स्पंदनात वाढ होते . आणि तुमच्या शरीराच्या जागरूकतेत हि वाढ होते , चक्राप्रमाणे च आयमा नाही संस्कृत मध्ये लोक असे संबोधले आहे .
अस्तित्वाच्या १२ पातळ्या चा क्षणिक अनुभव कुणालाही घेणे शक्य आहे आणि शिस्तबद्ध अध्यात्मिक सरावाने कुंडलिनी जागृतीत वाढ होऊन तुमचे उच्च पातळी वरील अस्तित्व कायम स्वरूपी प्राप्त होईल . सुवर्ण युगासाठी आपण चवथ्या D .N .A जोडीला पूर्णपणे सक्रिय करण्याची आवश्यकता आहे. म्हणून क्रिया योगाची आवश्यकता आजच्या मनुष्य जातीला आहे. अनेक व्यक्ति वेगवेगळ्या साधना-उपासना करतो पण त्यात आत्मोन्नती कितपत साधता येते हे त्या व्यक्तीलाच माहीत, मला वाटते अश्या रीतीने साधना करने म्हणजे आत्मोन्नती मधील एक अंश प्राप्त करायला ही अनेक जन्म घ्यावे लागतील. जर या साधनेला क्रिया योगाची जोड़ दिली तर हीच साधना तुमाला तुमचे इच्छित प्राप्त करून देवू शकते व तुमच्या देवतेशी/संत तत्वाशि भेट घालुन देवू शकते….ते ही याच जन्मी शक्य आहे.
बाबाजीनी काही छोटे अवतार धारण केले होते कमी काळा साठी , त्यात हेड़ाखान बाबा हे एक मानले जातात. नैनीताल येथे त्यांचा आश्रम असून त्याचं कार्य 1970 ते 1984 इतकेच वर्ष होते. श्री बाबाजी आजही त्याना कोणी हाक मारल्यावर आपल्या भक्तानां ओ देतातच. बाबाजींना हाक मारण्याचा मंत्र म्हणजे … ।। ॐ क्रिया बाबाजी नमः ॐ ।।. त्याना ओळखन समजण इतक सोप नाही. मनुष्यास बाबाजी हे नाव घेण आणि समजण हे सुद्धा अतिशय मोठी गोष्ट आहे. बाबाजीं वेगवेगळ्या रुपात दृष्टांत देतात , त्याना ओळखायचे तर त्यांच्या एक अंगाला असलेली 6 बोटेच.
पुढील भागात ज्ञानगंज या दिव्य आश्रमाबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न राहील.
क्रमशः
धन्यवाद ……………………
Artical Publish Date : 05/06/2016

 || Sri Matre Namah ||

Contact us to learn Sri Vidya Sadhna: 09860395985

 Subscribe to our Youtube Channel !!

Join us on Facebook !!

Share

Written by:

186 Posts

View All Posts
Follow Me :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

sixteen − 11 =

error: Content is protected !!
× How can I help you?