?हिमालयातील एक रहस्यमयी मठ ….सिद्धाश्रम / ज्ञानगंज(गौरी शंकर पीठम्)भाग :- ७?
।। ॐ क्रिया बाबजी नमः ।।
।। ॐ क्रिया नागलक्ष्मी माताय नमः ।।
मित्रहो , गेली चार महीने ही लेखमाला नवनवीन गूढ़ रहस्यमय विषय तुमच्या पर्यन्त पोहोचवत आहे. या लेखमालेचा खरा उद्देश् श्री महावतार बाबाजी तथा क्रिया योग याचे महत्व जनसामान्य लोकांना समजण. आणि क्रिया योग सोबत श्री विद्या साधनेच महत्व समजण असा आहे. जसा जसा एक एक लेख म्हणा किंवा हा प्रत्यक्ष बाबाजीं चा संदेश तुमच्या पर्यन्त पोचत आहे , तसे महाराष्ट्रातील अनेक साधक जे वेगवेगळ्या साधनेत म्हणा किंवा देवाधर्माच्या विशिष्ट विचारात अडकून आहेत , पुढचा नेमका मार्ग ज्याना समजत नाही , कितीही उपासना करून ज्यांच मन अजुन अनेक प्रश्नानी भरलेल आहे. त्या सर्वाच्या प्रारब्धकर्माने अप्रत्यक्ष या लेखातून बाबाजी त्यांच्या पर्यन्त पोचले आहेत. नवीन तरुण पिढीला क्रिया योगाची आवश्यकता समजते आहे आणि अनेक गृहिणी , विविध क्षेत्रातील लोक क्रिया योगाकडे वळत आहेत. याचा अनुभव मी गेली काही महीने घेत आहेत.
मित्रांनो , लेख वाचून काही प्रश्न पडल्यास , आध्यत्मिक मदतीसाठी मला संपर्क करू शकता (निवृत्ती उबाळे. कणकवली 9860395985) बाबाजींच्या कृपेने जमेल तितकी मदत केली जाईल. हे सर्व लेखमाला या वेबसाइट वर वाचु शकता.
या ७व्या भागाचा विषय ‘ ज्ञानगंज ‘ हा होता आणि त्यातला बराच भाग लिहून ही झाला होता . पण बाबाजी काही न काही माहिती माझ्या पर्यन्त पोचवत असतात , त्यांच्या भक्तांपर्यन्त त्यांचे संदेश पोचवण्यासाठी. त्यामुळे या लेखात काही महत्वाचा भाग श्री बाबाजींच्या विषयी देत आहे. हा लेख दीड महिन्याच्या विलंबा नंतर पोहोचत आहे तुमच्या पर्यन्त , त्याचे कारण ही लेख वाचताना महत्व समजेल.
खरे तर मला कायम वाटत असायचे की बाबाजीं च वय अथवा अस्तित्व हे ३-४ हजार वर्ष अधिकच असल पाहिजे. बाबाजीं ची आजची मानलेली जन्मतारीख ३०/११/ई.स.२०३ ही जरी असली तरी मूळ काही वेगळच आहे , याची जाणीव होत असायची. तसेच क्रिया योग आणि श्री विद्या साधना यांच रहस्य काय? आज क्रिया योग शिकवणारे फक्त क्रिया योगाला एक पूर्ण योग म्हणतात , त्याला श्री विद्या साधनेची जोड़ दिल्याशिवाय आत्मयाचा प्रकाश दिसनारच नाही. आणि आज या दोन्ही साधना वेगवेगळ्या केल्या जातात. क्रिया योगी ना श्री विद्या साधना माहित नाही आणि श्री विद्या साधकानां क्रिया योग माहीत नाही. फारच कमी साधक या दोन्ही साधना एकत्रित करत आहेत. या प्रश्नाच् उत्तर बाबाजी नी माझ्या कड़े पोचवल , त्याबद्दल मी खुप धन्यवाद मानतो.
वास्तविक पाहिले तर बाबाजीं विषयी ज्यानी आजपर्यन्त काही वाचल आहे त्याना आणखी काही तरी उणीव त्यात आहे किंवा काही तरी विषय आपल्यापासून चुकत आहे याची कुठे तरी जाणीव होत असेल. यासबन्धिच हा लेख आहे. या भेटलेल्या सन्देशा मुळे माझे मन अधिकच दृढ़ बनले बाबाजींच्या चरणी. कारण , काही कालावधी पूर्वी मी हट्टाने देवी कड़े बाबाजींच्या अनुकंपे विषयी मागणी केली होती , तेव्हा देवी ने एका शब्दात आमाला उत्तर देवून माझी बोलती बन्द केली , ” बेटा तुला बाबाजी हा शब्द उच्चारायला सोपा वाटला का ! बाबाजी शब्द समजायला ही भाग्य पाहिजे. ब्रम्हांड़ातील ही वैश्विक ऊर्जा अणु रेणु तुन किंचित तुझ्या पर्यन्त आली आहे हे सुद्धा पुष्कळ आहे.” ……. या शब्दांची प्रचिती मला हळू हळू यायला लागली.
बाबाजीं विषयी योगी कथामृत , हिमालयवासी गुरुंच्या सहवासात , क्रिया योग परंपरचे 18 सिद्ध ही पुस्तक आहेत. पण योगी कथामृत आणि श्री एम् यांच्या पुस्तकात काहीच शब्द लिहिले आहेत बाबाजीं बद्दल , आणि 18 सिद्ध पुस्तकात फक्त त्यांच्या ई. स.२०३ पासून च्या जन्म विषयक माहिती आहे. 18 सिद्ध या पुस्तकातील बराच भाग महाराष्ट्रातील काही जनानी घेवून आपली पुस्तक काढली ….खरी! …… पण बाबाजींचा खरा सन्देश कशातही नाही . एक पुस्तक( क्रिया योग 18 सिद्ध ) असताना इतर पुस्तकांची खरी गरजच नाही . वेगवेगळ्या लेखकानी या मूळ मजकुरात आणखी काही विषय ऐड केले . पण त्या सर्व मजकुरात काही तथ्य नाही आहे. उलट बाबाजीना जे लोक पूजतात त्यांच्या मनात बाबाजी बद्दल ठराविक कल्पनेत बांधल्या सारखे आहे. माझी सर्वाना विनंती आहे , बाबाजीं बद्दल चे अनावश्यक भ्रम काढून टाका.
बऱ्याच महिन्यांपूर्वी माझ्या आध्यात्मिक मानस बहिनीने सांगितले होते की श्री कृष्णचा मृत्यु कावेरी नदीच्या काठावर मैसूर मध्ये झाला होता आणि त्याच्या मृत्यु समयी श्री महावतार बाबाजी हे हजर होते . कृष्णाने त्यांच्याकडून वचन घेतले होते की कलियुगात तुला हे लोकांना सांगायचे आहे की माझा मृत्यु खरा ईथे झाला आहे . आणि आज बाबाजीं च्या आदेशा प्रमाणे मैसूर मधील हरिपुरा ठिकाणी गांधारी च मंदिर गुप्त रीतीने काम चालु आहे. (श्री बाबाजीं चे शिष्य स्वामी आनंदघन(तेलंगना) यांच्या मार्फत बाबाजीं च्या वरील माहिती ला आणखी पुष्टि भेटली. आज स्वामीजी हयात नसले तरी त्याना बाबाजीनि सांगितलेली माहितीतील काही मजकुर देत आहे.)
श्री कृष्ण मृत्यु होऊन बहुतेक 6हजार वर्ष अधिकच उलटून गेली. ही सर्व माहिती वाचून मनात संभ्रम निर्माण होईल. श्री बाबाजी हे 9 व्या आयमातील उच्च सिद्ध महापुरुष आहेत. ते एका जागी बसून कितीही देह धारण करू शकतात. त्यापैकी च छोटासा एक नागराज नामें धारण केलेला पेरिंगपट्ट येथील ई.स. 203 मधील देह आणि बाबाजी हे मूळ अयोनिज असल्याने ते कुणाच्या गर्भातून जन्म घेवुच शकत नाही आणि आजचे बहुतेक बाबाजींचे भक्त बाबाजीना या जन्मा पुरतेच बघत आहेत…………… नंतर या दोनशे वर्षात हेड़ाखान बाबाजी नावाने 2 देह धारण केले होते अस मानल जात , त्यापैकी एक 18 शे च्या काळातील अवतार आणि 1970 ते 1984 यात एक देह धारण केला नैनीताल मध्ये ………हेड़ाखान बाबाजी म्हणून. काही लोक त्याना गुप्त रुपात अश्वथामा च्या अवतार ही मानतात.
आता मुख्य विषय ,… द्वापर युग समाप्ती होतांना , श्रीकृष्णाच्या मानवी देहाचा अंत होत असतांना हे घडले . (श्री कृष्ण देहत्याग तारीख ख्रिस्त पूर्व 3228 मानली जाते.) त्यांनी आपले मर्त्य आवरण पृथ्वीवर ठेवले आणि त्यांचा आत्मा अनंताकडे चालला होता . तेव्हा श्रीकृष्णाचे बहुतेक भक्त आणि स्वर्गात नारायण रुपात असलेले श्रीकृष्णाचे अनुयायी ,जे या सृजनाचे सरंक्षक आहेत , त्यांनी प्रार्थना केली , विनंती केली की द्वापार युगातच नव्हे तर कलियुगात जिथे पाप आपल्या सर्वोच्च पातळीवर असेल तेव्हा तुम्ही खाली उतरा . तुम्हाला याने काहीही फरक पडत नाही कारण आपण सर्वांचेच भगवंत आहात . तुम्ही पुन्हा खाली का उतरत नाही कारण कलियुगात दुर्देवाने विध्वंस होणार आहे . मुख्य प्रार्थना हि श्री कृष्णाची योग मायेची होती आणि त्या ‘आनंदमाई ‘ माता होय. तेच श्री कृष्णाचे तेज हे श्री बाबाजीं च्या स्वरुपात अवतरले. अशाप्रकारे महावतार बाबाजी हे कोणत्याही मानवाच्या गर्भाशयातून जन्मले नाहीत आणि दहापैकी एकमेव महावतार आहेत . बाबाजी हे ” अयोनिजा ” आहे . म्हणून त्यांना महावतार म्हणतात . इतर सर्व अवतार आले . त्यांनी आपली हजेरी लावली . चांगल्या लोकांचे संरक्षण केले आणि राक्षसाचा संहार केला , जेव्हा की बाबाजी जगासाठी पडद्या आड कार्यरत आहे . त्यामुळे त्यांचा जन्म हे मोठे गूढ आहे . त्यांचे पुढे चालू राहणे हे हि तेवढेच गूढ आहे . त्यांच्या शिष्यांसाठी त्यांचे मार्ग अनाकलनीय आहेत . पण हेच सर्वोच्च वास्तव आहे . मानवी देहात असलेले वास्तव हे बाबाजी चे वास्तव नव्हे , तर तो एक अंशात्मक भाग आहे. बाबाजी हे संपूर्ण अस्ट्राल जगाचे मुख्य आहेत . संपूर्ण वेगवेगळ्या आयामात असलेले सिद्धपुरुष यांचे मुख्य कार्य त्यांच्याकडे आहे.
आज कलियुगात बहुतेक नवीन योगी आणि बाबाजी चे अनुयायी बाबाजी ना पाहिल्याचे सांगतात आणि ते बाबाजींचे प्रत्यक्ष शिष्य असल्याचेही सांगतात. सत्य हे आहे की , हिमालयातील गुप्त स्वरुपात काही सिद्ध पुरुष-योगी आहेत आणि त्यांचा शिष्य समुदाय ही आहे. त्या सर्वाना ‘ बाबाजी ‘ हेच बोलताना संबोधन लावतात. त्यामुळे जे लोक म्हणतात की त्याना बाबाजी भेटले , तर हा भ्रम आहे. ते लोक या वरील पैकी एक सिद्ध योगिस भेटलेले असतात. बाबाजी च्या जवळच्या आणि प्रिय शिष्याणकडून बाबाजी ना आकाशी बाबा , शिव बाबा , त्र्यंबक बाबा , एकमुखी दत्त म्हणून ओळखले जाते आणि अत्यंत गुप्तपणे त्यांना *”आनंद घण “* म्हणतात.
(एक जुनी माहिती) आता बाबाजी च्या गटातील रचने बद्दल जी काही माहिती भेटली ती पुढील प्रमाणे. एक सत्य जे जगाला आतापर्यंत फार कमी माहिती आहे किवा माहिती नाही . ते नेहमी त्यांच्या २७ शिष्यांनी वेढलेले असतात. चार शिष्य त्यांच्या आकाशीय रुपात असतात आणि नेहमी महावतार बाबाजी च्या जवळ असत . फक्त २२ शिष्यांना ते निवडत जे वेगवेगळ्या देशातील , प्रदेशातील , संस्कृतीचे आणि जमातीतून असत . बाबाजी च्या पालकत्वा खाली १२ वर्षे त्यांना कडक साधना दिली जाई . १२ वर्षे संपल्यानंतर हे २२ लोक त्यांच्या त्यांच्या देशात ज्या ध्येया ची निवड बाबाजी नी त्यांच्यासाठी केली आहे त्या मार्गावर पाठवले जाई .
भूतकाळातील काही शिष्यांची माहिती येथे देत आहे जे खगोलशास्त्रीय गणनेनुसार अंदाजे काही हजार वर्षा पूर्वी पासून त्यांच्या या शिष्याञ्च अस्तित्व आहे. त्यापैकी जी काही नावे भेटली ती पुढे देत आहे. अघोरानंद , निरेश्वरानंद , प्रागज्योतिषानंद, सुगोशानंद, महेशानंद, निखिलेश्वरानंद , वेदानंद, चण्डीनाथ, मिथिलानंद, अनुग्रहानंद, मारपा, मेघनंदा, निर्घोषानंद, सुश्मितानंद, निर्विकल्पानंद, भैरवानंद, जैनेंद्रनाथ, श्रीविद्यानंद, गहनानंद , कुमारमंगलम, जन्मेजयानंद…. यात एक श्यामवधु म्हणून स्त्री शिष्या आहे. श्यामवधु ही आनंदमई मातेची मानलेली मुलगी , तीला माईने यमुनेच्या तिरावरून उचलून बाबाजी कड़े हिमालयातील गुप्त आश्रमात आणले. बाबाजी आणि आनंदमई माँ ने हिची मूली प्रमाणे सर्व काही केले. ( आनंदमई माँ चा अवतार जरी 18शे च्या काळातील असला तरी ती मूळ योगमाया असून तीच अस्तित्व कायम बाबाजीं च्या बरोबर पूर्वी पासून राहील आहे. )
आता एक महत्वाचा मुद्दा जो सर्वानीच लक्षात घ्यावा , मला अनेक प्रदेशातील बरेच क्रिया योगी अथवा चक्र साधना करणारे श्रींविद्या दीक्षित साधक भेटत असतात आणि मार्गदर्शनपर चर्चा असते. जेव्हापासून मी या मार्गात आहे तेव्हा पासून क्रिया योगाला श्री विद्या साधने ची आणि श्रींविद्या साधनेला क्रिया योगाची जोड़ आवश्यक आहे हे जानवायचे. त्यामुळे मी दोन्ही परंपरेतील साधकाना क्रिया योग- श्री विद्या साधना अशी जोड़ द्यावी असे माझे म्हणणे असे. मला या बाबतीत बाबाजीनी ही माहिती पोचवुन आणखी ज्ञानात भर पाडली. वरील शिषयांमध्ये श्री विद्यानंद यांचा उल्लेख आलेला आहे , त्यांच्यवर जेव्हा जगात परीक्षा देण्याची वेळ आली तेव्हा बाबाजी नी त्याना एक मिशन वर पाठवले होते. यात ४ चिरंजीवी ना भेटून एक महत्वपूर्ण मार्गदर्शन मिळवने हा हेतु होता. बाबाजी नी त्याना हे सर्वजन कुठल्या ठिकाणी भेटतील याचे मार्ग दाखवले , आदि शंकराचार्य-आंजनेय-अश्वथामा- नंतर अगस्ति मुनि हे ४ चिरंजीव. ( आदि शंकराचार्य हे श्री विद्या उपासक असून त्याना बाबाजी कडून क्रिया योग दीक्षा ही भेटली होती. आणि अगस्ति मुनी हे सुद्धा श्री विद्या उपासक आणि आचार्य आहेत. अगस्तिमुनी नी स्वतः श्री विद्या साधना त्यांची पत्नी लोपामुद्रा हिच्याकडून घेतली.) या चारही चिरंजीवी ना भेटवण्याचा उद्देश् इतकाच होता की ,…………. क्रिया योग आणि श्री विद्या षोडशी साधना हे दोन्ही साधना आज वेगवेगळ्या केल्या जातात. श्री विद्या साधना करणारे दीक्षित साधकांचा आज मोठा परिवार आहे अध्यतमात ! पण नुसत्या श्री विद्येतुन सर्व चक्र-नाडी शुद्ध करने कठिन असते. आणि जर तुमी क्रिया योगी साधक असाल तर , त्याला श्री विद्या साधनेची जोड़ द्यावी. श्री विद्या ललिता परमेश्वरी ही मुख्य आद्यशक्ति आहे , तीच्या साधनेतून शक्ति मुलाधारतून जागृत होऊन अल्प काळातच सर्व चक्रांचे शोधन करून दशम द्वार खुले करते. ………अर्थातच क्रिया योगातुन पुनरुजीवन करून त्याचा सराव श्री ललिता परमेश्वरी श्री विद्या साधनेत करून मूळ प्रकाशाची आरधना होय. ( हा संपूर्ण कथा रूपी संदेश तुमाला पुढील लेखात देईन. )
श्री दत्तात्रेय, परशुराम , आदि शंकराचार्य हे श्री विद्या साधक व आचार्य आहेत. आपल्या महाराष्ट्रात मोठा वर्ग दत्त संप्रदायातील आहे , पण त्यातील अनेक जनाना दत्तात्रेय हे मूळ ललितांबा श्री विद्या उपासक आहेत हे माहीत नाही. अंतिम मार्ग प्राप्ति साठी त्याना ललिता मातेची उपासना करावी लागली. आज चारही शंकराचार्य पिठात श्री विद्येची उपासना होते. श्रीयंत्र हे स्वत् दत्तात्रेय यानी ज्यामितीय कले द्वारे शोधून त्याचे पुनरुज्जीवन केले. क्रिया योग सहित श्री विद्या साधना करने हे पूर्णत्व आहे.
यानंतर ग्रीस मध्ये सोक्रेटीस बाबाजी चे शिष्य होते .भारतात जिजस ख्रिस्त यांना वाराणसीला तीरावर बाबाजीनी दिक्षा दिली . अद्वैत ज्ञानाचे आदि शंकराचार्य यांनाही बाबाजी नी वाराणसी येथील गंगा नदीच्या तीरावर दिक्षा दिली. यानंतर लाहिरी महाशय, संत तुकाराम , सन्त कबीर , योगी रामय्या , श्री. निलकांतन , युक्तेश्वर गिरी , योगानंद , प्रणवानन्द, राम ठाकुर जी , डॉ. अरिपिराला विश्वम् आदि बद्दल तुमाला माहितच असेल. यातील काही जनाना क्रिया योगातील उच्च तंत्र ज्ञान साधनेची माहिती बाबाजी नी दिली होती , पण त्यानी आधुनिक युगात गुप्त ठेवली. येशुनच्या दीक्षे वरुन तुमाला समजले असेल की बाबाजीं चे अस्तित्व हे ई.स.203 च्या अगोदर चेच आहे.
सर्वात दुर्दैवी सत्य हे आहे कि भारतातील काही व्यक्ती बाबाजी चा शिष्य असल्याचे दावे करतात. त्यांनी बाबाजीच्या मूळ विषयी बनावट माहिती अशा प्रकारे बनवली की अनेक लोक त्यावर भरवसा करतात . पण ते सर्व खोटे आहे. तर काही जन असेही सांगतात कि बाबाजी मानवी देह आहेत आणि भोगराज पंडित चे शिष्य आहेत . भोगराज पंडित नि त्यांना योग शिकवला आणि ते महावतार बाबाजी बनले . नंतर महावतार बाबाजीनी हिमालयात प्रस्थान केले . हे साफ खोटे आहे . एक दिखाऊ असत्य . बाबाजी चे शिष्य असण्याच्या नावाखाली हे कृत्य अध्यात्मिक , नैतिक आणि सामाजिक दृष्टीने विश्वास घातकी आहे. श्री बाबाजीं च्या नावाने अनेक फसव्या लोकांनी त्यांची मंदिर आश्रम आणि क्रिया योगाची साधना केंद्रे काढली ……पण बाबाजींचा योगानंदानी चित्रित केलेला फ़ोटो हा जितका सहज प्रिंट काढून आश्रमात लावुन लोकांची सहानभूती मिळवन जीतक सहज सोप आहे तितकच किंवा त्यापेक्षा कठिन बाबाजींच्या हृदयात आपल स्थान बनवण आहे. असेही लोक आहेत की जे यु ट्यूब द्वारे आणि 15-20 हजार रूपये अधिक मोठ्या फि घेवून क्रिया योग शिकवतो सांगतात , खर तर असे लोक स्वतःच निर्माण केलेल्या भ्रमिष्ट मायेत अडकून आहेत जे बाबाजी ना धोका देत नाहीत तर ते आपल्या आत्म्याला धोका देवून पुढील अनेक जन्मांसाठी स्वतःच्या आत्म्याच् नुकसान करत आहेत.
या लेखात आणखी एक मुद्दा सांगावासा वाटतो. वर ज्या ठिकाणी गांधारीच्या मंदिराचा उल्लेख आलेला आहे. बहुतेक जनाना प्रश्न पडेल की तिचे मंदीर का बंधायला सांगितले? याला खर कारण अस की , या भूमी वर जितकी युद्ध होऊन रक्तपात झाला त्यापेक्षा कैक लक्ष पटीने स्त्री वर अत्याचार झाला आहे. स्त्री ही नुसती व्यक्ति नसून एक आदिमायेच रूप , शक्ति तत्व आहे. इतक्या हजारो वर्षात स्त्री वर वेगवेगळ्या पद्धतीने झालेल छळ आणि ते आजही आधुनिक युगात चालूच आहेत. त्यामुळे संपूर्ण सृष्टीतील शक्ति तत्व आणि भूमी माता दुखावली आहे. त्याचेच परिणाम दुष्काळ स्थिती येवून ठेप्ली आहे म्हणा , पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे , लोक भविष्यत भूमि अन्न पानी यावरून तँटे करतील किंवा राष्ट्रा राष्ट्रात अनवस्त्राची स्पर्धा होत आहे. पंचमहाभूत असो किंवा शिव विष्णु ब्रम्हा असो सर्वांमध्ये शक्ति तत्व मुख्य आहे. कलियुग सुरु झाले तेव्हा या तीनही देवतांनी आपले कार्य थांबवुन त्यांचेे सर्व अधिकार आदिमायेने आपल्या हातात घेतले. त्यामुळे न त्रिदेव न कोणी गुरु तत्व न स्वतः देवी …. पूर्णत्वाने यात हस्तक्षेप करत आहेत. जर या सर्वांतून मार्ग काढायचा असेल तरी पंचकन्या किंवा पतिव्रताना आवाहन करने आवश्यक आहे. अहिल्या अनुसया द्रौपदी गांधारी कुंती सुलक्षणा सावित्री तारा मंदोदरी या ………. यातील गांधारी द्रौपदी अनुसया आणि अहिल्या यांना तीव्रतम पतिव्रता आहेत. आणि आपल्या आध्यत्मिक जीवनात स्त्री चा सन्मान करने. श्री दत्तात्रेय आणि श्री बाबाजींच्या कृपेने मागील वर्षातील 3 रे महायुद्ध चे सावट दूर झाले. या सर्वातुन मार्ग काढण्यासाठी बाबाजींनी गांधारी ची स्थापना आवाहन करण्यास वर सांगितले.
हे सर्व सांगण्या उद्देश् मूळ असा की अनेक जन बाबाजीं च्या अध्यात्म मार्गात आहेत. बाबाजी ना एक विशिष्ट वयो मर्यादेत किंवा जन्मदिन किंवा एक मानवी शरीर यात मनातून बांधून नका . ते पूर्ण प्रकाश स्वरूप आहेत. हा दृष्टिकोण अंतबाह्य जाणवू दया. श्री विद्या साधना आणि क्रिया योग एकत्रित करून आत्म्याला प्रकाशित करा.
|| Sri Matre Namah ||
Contact us to learn Sri Vidya Sadhna: 09860395985
Subscribe to our Youtube Channel !!
Join us on Facebook !!