?हिमालयातील एक रहस्यमयी मठ …. सिद्धाश्रम / ज्ञानगंज (गौरी शंकर पीठ) भाग :- १?
मित्रांनो या विश्वात अनेक रहस्यमयी गोष्टी आहेत . बऱ्याच अश्या आहेत की त्यावर आजकाल लोकांचा विश्वास बसत नाही. हा लेख या अद्भुत विषयाची माहिती तुमालाही समजावी यासाठी लिहित आहे. असो , पण आज मी तुमाला अद्भुत आणि पूर्ण सात्विक अध्यात्मशक्ति ने पूर्ण भरलेला असा एक दिव्य ठिकाण म्हणा किंवा आश्रम म्हणा अस्तित्वात आहे. योगी कथामृत अथवा हिमालयातील गुरुंच्या सहवासात अश्या पुस्तकातुन तुमाला याची कल्पना येईल. हिमालयात अनेक जुने नवे आश्रम आहेत पण एकमेव असा आश्रम जो आज अस्तित्वात आहे , त्याची आयु कित्येक हजार वर्ष असेल , तिथे राहनारे सत्पुरुष , भैरवी , साध्वी यांची आयु ही काही शेकडो वर्ष तर काहींची हजार वर्ष अधिकच असेल. या आश्रमाचे महान गुरु महावतार बाबजी ……पण बाबाजी हे फक्त आश्रमा पुरते मर्यादित नाहीत. ते संपूर्ण चराचरात आहेत.
या बाबत सर्वात प्रथम लोकांमध्ये समजले ते बनारस चे गंधबाबा म्हणून ओळखले जाणारे स्वामी विशुद्धानंद जी कडून. मला आठवते की माझ्या एका गुरु बंधुनी एकदा त्यातील काही सत्पुरुष आहेत त्यांच्या बद्दल सांगितले होते , त्यापैकी एक महातपाजी स्वामी …ज्यांची आयु ही हजार वर्ष अधिक असेल. तसेच श्री भृगुराम परमहंस स्वामी आहेत. तसेच युक्तेश्वर गिरीं, लाहिरी महाशय , परमहंस योगानंद , महान गुरु तैलंग स्वामी ई.
हिमालय हा एक तसा मनुष्य जातिसाठी रहस्यमय राहिला आहे आणि आजही लोकांमध्ये त्याबद्दल गूढ़ आकर्षण आहे. हिमालय चे आकर्षण बर्फाळ प्रदेशामुळे नाही तर तिथे असनारे हजारो वर्ष तपस्यारत दिव्य संतामुळे , गंगा सिंधु या पवित्र नद्यांच्या उगम स्थळामुळे आणि निसर्गाची दैवी देणगी मुळे. काही ठिकाणी असे ऐकायला मिलते की ….हे तिन मठ त्या ठिकाणी आहेत , १)ज्ञानगंज मठ २) सिद्ध विज्ञान आश्रम व ३) योग सिद्धाश्रम . तसे हा सर्व भाग एकाच मठ अधिपत्याखाली येत असावा. या ठिकाणी दीर्घजीवी,कालंजयी योगी आपल्या आत्म शरीर स्वरुपात निवास करतात . सूक्ष्म शरीर मध्ये विचरण करतात आणि कधी कधी स्थूल शरीर ही धाारण करतात. स्वामी विशुद्धानन्द परमहंस जे सूर्य विज्ञान मध्ये पारंगत होते ते ज्ञानगंज मठ शी जुळलेले होते.
ज्या प्रकारे वायु मंडल मध्ये अनेक स्थान अशी आहेत तिथे वायु शून्य राहते. तश्याच प्रकारे आपल्या भूमिवर अशी स्थान आहेत जी भू हीनता प्रभावाखाली येतात. भू हीनता आणि वायु शून्यता असणारी ही स्थान चौथे आयाम द्वारे प्रभावित असतात. जर त्यात कोणती वस्तु वा व्यक्ति चुकून गेला तर या तीन आयाम असलेल्या स्थूल जगत मध्ये त्याच जे अस्तित्व आहे ते लुप्त होउन जाईल. जसे तुमी ऐकला असाल की बर्म्यूडा ट्रैंगल च्या भागात जर कोणी गेले तर ती वस्तु वा व्यक्ति गायब होते . ते स्थान भू हीनता क्षेत्र मध्ये मोड़ते. असेच एक स्थान आहे जे तिबेट अरुणाचल अश्या हिमालयीन भागात संग्रिला घाटी भागात येतो. परंतु भू हीनता आणि चौथा आयाम प्रभावित असल्याने हा भाग आजही रहस्यमय बनलेला आहे . अर्थात सामान्य व्यक्ति आपल्या नेत्राद्वारे तिथली गूढ़ अस्तित्व पाहू शकत नाही. या भागाचा संबंध अंतरीक्षातील विशिष्ट काही लोकाशी बांधलेला आहे. हाच भाग सिद्धाश्रम अर्थात ज्ञानगंज .
या विषया बाबत तवांग मठ यात एक प्राचीन पुस्तक काल विज्ञान जे आहे त्यात माहिती मिलते. त्यानुसार आपली तिन आयाम असणारा हा भाग प्रत्येक वस्तु देश काळ निमित्त अश्याने बांधलेला आहे पण वरील उल्लेख केलेल्या भागात काळ नगण्य आहे. तिथे प्राण, मन , आणि विचार शक्ति एक विशेष सीमे पर्यन्त वाढली जाते. शारीरिक क्षमता आणि मानसिक चेतना अनेक पटीने वाढते. काळ मर्यादे नुसार तिथे आयुष्य हे अत्यंत धीमे पनाने वाढते. प्रसिद्द योगी श्यामा चरण लाहिरी यांचे गुरु महावतार बाबाजी ज्यानी आदि शंकराचार्य याना पण या ठिकाणी दीक्षा दिली असे मानले जाते . आणि हे संग्रीला घाटी मध्ये सिद्ध आश्रम मध्ये आजही निवास करत आहेत. जेव्हा ते कधी आकाश मार्गे जातात तेव्हा आपल्या शिष्याना दर्शन पण देतात. असे हजारो वर्ष आयु असणारा आध्यात्मिक मठ व त्यात अनेक सिद्ध महापुरुष यांच दिव्य अस्तित्व त्या ठिकाणी आहे.
हे सिद्ध पुरुष संसार जीवनातील योग्य व्यक्ति शोधून , बऱ्याच वेळा हे त्यांचेच पुर्नजन्म घेतलेले शिष्य असतात , त्यांना शोधून स्वतकडे आनतात व योग्य शिक्षा देवून पुन्हा सांसारिक जीवनात त्यांना जनकल्याणास जाण्यास सांगतात . या व्यतिरिक्त त्या ठिकाणी तंत्र शक्ति अभ्यासक मठ ही आहेत . कपालिक आणि शाक्त साधक यांचा निवास त्या ठिकाणी असतो. तसेच एक बौद्ध मठ ही असण्याचा संभव आहे. ईथे असणारे दिव्य साधक स्वत: ला भौतिक गोष्टी पासून गुप्त ठेवतात.
( उपरोक्त माहिती अनेक ठिकाना वरुन मिळवली आहे. काही उत्तम साधकांशी चर्चे द्वारे मिळाली आहे. बाकी बाबाजींची कृपा. योगी कथामृत , हिमालयातील गुरुंच्या सहवासात पुस्तक वाचावे ही विनंती. )
|| Sri Matre Namah ||
Contact us to learn Sri Vidya Sadhna: 09860395985
Subscribe to our Youtube Channel !!
Join us on Facebook !!